Salman Khan Aamir Khan  Dainik Gomantak
मनोरंजन

Salman Khan - Aamir Khan: सलमान खान 7 वर्षांनंतर का पोहोचला अमिरच्या घरी...

अभिनेता सलमान खान तब्बल 7 वर्षांनी अमिरच्या घरी पोहोचला आहे, एकेकाळी दोघांमध्ये मोठा वाद झाला होता

Rahul sadolikar

Salman Khan go to Aamir's house after 7 years सलमान खान आणि आमिर खान एकेकाळी खूप चांगले मित्र होते. मात्र, या दोघांमध्ये बरेच दिवस शीतयुद्ध पाहायला मिळत आहे. दंगल आणि सुलतान हे दोन्ही चित्रपट एकत्र प्रदर्शित झाल्यावर दोघांमधील हे कोल्डवॉर सुरू झाल्याचे बोलले जाते. सलमानने सांगितले की, त्याच्या आणि आमिरमध्ये कोणत्याही प्रकारची नाराजी नाही. 

असे असूनही, तेव्हापासून हे दोन्ही कलाकार एकत्र दिसले नाहीत. आणि आता सलमान खान काल रात्री म्हणजेच २४ जानेवारीला आमिर खानच्या घरी जाताना दिसला, त्यानंतर सगळेच आश्चर्यचकित झाले.

मिळालेल्या माहितीनुसार, सलमान खानशिवाय मुकेश भट्टही आमिर खानच्या घरी पोहोचले. दरम्यान, दोघे एकाच चित्रपटात एकत्र दिसणार का, असा अंदाज चाहत्यांकडून लावला जात आहे. सलमान खान इतक्या वर्षांनंतर आमिर खानच्या घरी कोणत्या कारणासाठी पोहोचला हा एक मोठा प्रश्न सध्या उपस्थित केला जात आहे.

खरं तर काही वर्षांपूर्वी एका पार्टीदरम्यान आमिर खानने सलमानच्या चित्रपटांबद्दल सांगितले होते की, त्याने त्याच्या चित्रपटांची चिंता करू नये. सलमानचे चित्रपट कुठलेही लॉजिक नसताना चालतात. यामुळे सलमान चांगलाच संतापला होता. याशिवाय सलमान आणि आमिरचा दंगल चित्रपट एकत्र प्रदर्शित झाला होता.

 सुलतान या चित्रपटाचे नाव आधी दंगल असे होते, पण आमिरच्या चित्रपटाचेही नाव दंगल होते आणि त्याने तो प्रदर्शित केला. सुलतान चित्रपटाचे दिग्दर्शक अली अब्बास यांनी सांगितले की, जेव्हा चित्रपटाची कथा लिहिली गेली तेव्हा त्यांनी त्याचे नाव दंगल ठेवले, जे नंतर सुलतान असे बदलले गेले.

यानंतर आमिर आणि सलमानमधील मतभेद वाढतच गेले. मात्र, दोघांनीही यावर कधीही प्रतिक्रिया दिली नाही. त्यानंतरही सलमान खान दंगल चित्रपटाचे कौतुक करताना दिसला सलमान खाननेही एका मुलाखतीदरम्यान स्पष्ट केले होते की, त्याचे आणि आमिरमध्ये कोणत्याही प्रकारचे भांडण नाही. अशा बातम्यांमध्ये काहीही तथ्य नाही. 
आता या भेटीमध्ये काय चर्चा झाल्या हे सांगणं कठीण आहे ;पण दोघांमध्ये सध्या काहीच वाद नाहीत असं म्हणायला हरकत नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Virat Kohli Viral Post: विराट कोहलीचा दोन वर्षांनंतर मोठा निर्णय; सोशल मीडियावरील 'त्या' पोस्टनं खळबळ!

Mandovi Bridge: मांडवी पुलावर 'नो एन्ट्री'! 11 जानेवारीला 'या' वेळेत नव्या आणि जुन्या पुलावरून वाहतूक पूर्णपणे बंद

Raia Fire News: ..आणि बघता बघता डोंगरच पेटला! राय येथील घटना; अग्निशामक दलाचे शर्थीचे प्रयत्न

Tara Sutaria Breakup: तारा सुतारिया आणि वीर पहाडियाचे ब्रेकअप? 'त्या' व्हायरल व्हिडिओनंतर नात्यात दुरावा Watch Video

Goa Nature Conference 2026: निसर्गाशी नाते करा घट्ट! गोव्यात रंगणार पहिले निसर्ग संमेलन; तारीख, वेळ जाणून घ्या..

SCROLL FOR NEXT