Amrish Puri Dainik Gomantak
मनोरंजन

Amrish Puri B'day: अमरीश पुरी यांना भावाने काम देण्यास का दिला होता नकार

जेव्हा जेव्हा बॉलीवूडमधील खलनायकाच्या व्यक्तिरेखेचा उल्लेख केला जातो तेव्हा दिवंगत अभिनेते अमरीश पुरी यांचे नाव सर्वप्रथम आपल्या डोळ्यासमोर येते.

दैनिक गोमन्तक

जेव्हा जेव्हा बॉलीवूडमधील (Bollywood) खलनायकाच्या व्यक्तिरेखेचा उल्लेख केला जातो तेव्हा दिवंगत अभिनेते अमरीश पुरी (Amrish Puri) यांचे नाव सर्वप्रथम आपल्या डोळ्यासमोर येते. जेव्हा ते खलनायकाच्या भूमिकेत पडद्यावर यायचे तेव्हा लोक घाबरायचे. भारतीय चित्रपटसृष्टीतील ते सर्वात प्रतिभावान अभिनेत्यांपैकी एक होते. बॉलीवूडमध्ये हिरो बनण्याची स्वप्ने त्यांनी आणली होती, पण नशिबामध्ये वेगळंच होतं. आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त एका दमदार खलनायकाची पदवी कशी मिळाली. (Why did Amrish Puri brother refuse to give him a role in the film)

प्रसिद्ध खलनायक अमरीश पुरी यांचा जन्म या दिवशी म्हणजेच 22 जून 1932 रोजी पंजाब राज्यातील जालंधर मध्ये झाला. बॉलीवूडमध्ये हिरो बनण्याचे स्वप्न घेऊन आलेले अमरीश पुरी हे मदन पुरी यांचे भाऊ असून त्यांनी 430 चित्रपटांमध्येही काम केले होते. सुरुवातीला अमरीश पुरी यांनी भावाकडे काम मागितले तेव्हा त्यांनी स्पष्टपणे सांगितले की त्यांचा चेहरा हिरोसारखा नाहीये.

यानंतर अमरीश पुरी यांनी आपल्या करिअरला रंगभूमीपासून सुरुवात केली. 1967 साली त्यांचा पहिला मराठी चित्रपट 'शंततु! कोर्ट चालू आहे'. तसेच चित्रपटात त्यांनी अंध व्यक्तीची भूमिका साकारली होती. आणि त्याचवेळी त्यांनी 1971 मध्ये 'रेश्मा और शेरा' मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.

अमरीश पुरी हे त्यांच्या अनेक पात्रांसाठी ओळखले जातात, परंतु त्यापैकी सर्वात मजेदार आणि सर्वात नेत्रदीपक पात्र म्हणजे मोगॅम्बोचे, मिस्टर इंडिया या चित्रपटाचे नाव ऐकल्यावर जर कोणती गोष्ट प्रथम मनात आली तर ती म्हणजे मोगॅम्बोचे नाव. मोगॅम्बोचे संवाद, 'मोगैम्बो खुश हुआ, अमर हो चुके हैं'. मोगॅम्बोच्या पात्राने अमरीश पुरी यांनाही अमर केले म्हणायला हरकत नाही. 2005 मध्ये ब्रेन हॅमरेजमुळे अमरीश पुरी यांचे निधन झाले.

बॉलिवूडशिवाय अमरीश पुरी यांनी हॉलिवूडमध्येही खलनायकाच्या भूमिकेतून आपली छाप सोडली आहे. 1989 मध्ये, ते स्टीव्हन स्पीलबर्गच्या इंडियाना जोन्समध्ये मुला रामच्या भूमिकेत दिसून आले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: पाहावं ते नवलंच!! 21 लाखांचा गंडा घातलेल्या माणिकरावचं हार घालून स्वागत; मित्र म्हणतोय "वेलकम टू गोवा सिंघम"

Goa Congress: खासदार विरियातो, प्रदेशाध्यक्ष पाटकर पोलिसांच्या ताब्यात; काँग्रेसचे कॅश फॉर जॉब विरोधात आंदोलन

Goa Today's News Live: मालपे पेडणे येथे आढळला अज्ञात व्यक्तीचा मृतदेह, पोलिस घटनास्थळी दाखल

IFFI Goa 2024: "आलीयाच्या सुरक्षेसाठी मी त्याला हाकललं होतं" काही तासांतच 'ते' विधान फिरवल्याने इम्तियाज अली वादाच्या भोवऱ्यात

National Cashew Day: गोव्यात काजूचे पीक घेणे का बनत आहे कठीण? कारणे जाणून घ्या..

SCROLL FOR NEXT