Hemant Biswa Shah Rukh Khan  Dainik Gomantak
मनोरंजन

Shahrukh Khan-Hemant Biswa: कोण शाहरुख खान? आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा यांच्या प्रश्नावर फॅन्सनी काढली लाज..

आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा यांनी कोण शाहरुख खान? असा प्रश्न विचारत नवा वाद ओढावुन घेतला आहे.

Rahul sadolikar

शाहरुख खानच्या पठाण चित्रपटाचा वाद आता संपेल असं वाटलं होतं ;पण ते थांबतील अशी शक्यता सध्या दिसत नाही. आता आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा यांनी या वादात आता उडी घेतली आहे.

अलीकडेच एका पत्रकार परिषदेत आसामचे मुख्यमंत्री हेमत बिस्वा यांना पठाणबद्दल प्रश्न विचारण्यात आला होता. यावर त्यांनी कोण शाहरुख खान? असा प्रश्न केला आहे. पठाण आणि शाहरुख खानला ओळखत नसल्याचं त्यांनी सांगितलं. यावर भडकलेल्या फॅन्सनी ट्विटरवर मुख्यमंत्री हेमंत बिस्वा यांना शाहरुख खान कोण आहे? हे सांगितले आहे.

बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान पाच वर्षांनंतर मोठ्या पडद्यावर पुनरागमन करत आहे. सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित पठाण या चित्रपटातून शाहरुख खान बॉक्स ऑफिसवर कमबॅक करत आहे. 

पठाणमध्ये शाहरुख खानसोबत दीपिका पदुकोण आणि जॉन अब्राहम दिसणार आहेत. प्रजासत्ताक दिनानिमित्त हा चित्रपट २५ जानेवारीला प्रदर्शित होत आहे. 

पठाणचे बेशरम रंग गाणे रिलीज झाल्यापासून हा चित्रपट केवळ चर्चेतच नाही तर वादातही अडकला आहे. दीपिका पदुकोणच्या भगव्या बिकिनीवर जेव्हा प्रश्न उपस्थित केले गेले तेव्हा अश्लीलतेबाबतही अनेक प्रश्न उपस्थित केले गेले. 

आता पुन्हा एकदा ट्विटरवर #WhoisShahrukhkhan ट्रेंड करत आहे. होय, कोण आहे शाहरुख खान?  या हॅशटॅगवर लोक सतत का प्रतिक्रिया देत आहेत. चला पाहुया हेमंत बिस्वा यांची प्रतिक्रिया आणि लोकांच्या त्यावर आलेल्या कमेंटस.

काही दिवसांपूर्वी पठाण वादावरून बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी अहमदाबादमध्ये एका मॉलमध्ये तोडफोड केली होती. या चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घालण्याची मागणीही त्यांनी केली. 

या संपूर्ण वादावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांना प्रश्न विचारण्यात आला होता. याप्रकरणी त्यांना जाब विचारण्यात आला.

पठाण वादावर प्रतिक्रिया देण्याच्या प्रश्नावर सीएम हिमंता बिस्वा संतापले. पत्रकार परिषदेत अशा प्रश्नांवर ते संतापले आणि त्यांनी कोण शाहरुख खान? असा प्रतिप्रश्न केला. मला त्याच्याबद्दल किंवा पठाणबद्दल काहीही माहिती नाही असंही ते म्हणाले.

साहजिकच शाहरुख खानचे फॅन्स या प्रश्नावर शांत बसणं शक्यच नव्हतं. त्यांनी ट्विट्टरवर हेमंत बिस्वास यांच्याशी थेट पंगा घेतला आणि शाहरुख खान नेमका कोण आहे? हे सांगायला सुरूवात केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kabul Bus Accident: काबूलमध्ये भीषण अपघात, प्रवासी बस उलटून 25 जणांचा मृत्यू; 27 जखमी

Love Horoscope: जोडीदाराला थोडा वेळ द्या! अनुभवा 'मोठे' बदल; वाचा प्रेम राशीफळ

Michael Clarke Cancer: विश्वचषक जिंकवून देणाऱ्या स्टार क्रिकेटपटूला कर्करोग, पोस्ट करत दिली माहिती

तवडकरांना मिळाली गावडेंकडे असलेली सर्व खाती, 'आदिवासी कल्याण'ही पाहणार; कामतांकडे PWD, आणखी 2 मंत्र्यांना मिळाली 2 खाती

Bicholim: डिचोलीत झाली 4 टन फुलांची विक्री, भाव वाढल्याने विक्रेते आनंदी; चतुर्थीच्या पूर्वदिनी 'अच्छे दिन'

SCROLL FOR NEXT