Wahab Ali Bugti Dainik Gomantak
मनोरंजन

Coke Studio चा गायक पाकिस्तानच्या पुरात झाला बेघर, इंटरनेटवर उठला मदतीचा आवाज

पाकिस्तानचा कोक स्टुडिओ (Coke Studio, Pakistan) जगात फेमस आहे. या वर्षी रिलीज झालेल्या त्याच्या सीझन 14 मधील पसुरी गाण्याने भारतीयांना वेड लावले आहे.

दैनिक गोमन्तक

पाकिस्तानचा कोक स्टुडिओ (Coke Studio, Pakistan) जगात फेमस आहे. या वर्षी रिलीज झालेल्या त्याच्या सीझन 14 मधील पसुरी गाण्याने भारतीयांना वेड लावले आहे. या गाण्यावर बनवलेले हजारो व्हिडिओ तुम्हाला सोशल मीडियावर पाहायला मिळतील. आता कोक स्टुडिओच्या एका गायकाचे छत पुरात वाहून गेल्याने त्याला घरोघरी भटकावे लागत आहे.

बलुचिस्तानमध्ये आलेल्या पुरामुळे घर उद्ध्वस्त झाल्याने वहाब अली बुगती (Wahab Ali Bugti) बेघर झाला आहे. या गायकाने कोक स्टुडिओ सीझन 14 मध्ये देखील काम केले आहे. "काना यारी" या गाण्याला त्याने आवाज दिला आहे. त्याचे आणि त्याच्या कुटुंबाचे फोटो सध्या सोशल मिडियावर व्हायरल झाले आहे. यानंतर त्याचे काही चाहते त्याच्या मदतीला धावून आले आहे.

पोस्ट मध्ये काय आहे

एका ट्विटर वापरकर्त्याने बलुचिस्तानमधील पुरामुळे वहाबला त्याच्या कुटुंबासह रस्त्यावर कसे राहावे लागते याची परिस्थिती शेअर केली आहे. पोस्टमध्ये वहाबचे त्याच्या कुटुंबासोबतचे फोटो देखील आहेत. एका फोटोमध्ये त्यांची मुले त्यांचे घर उद्ध्वस्त झाल्यानंतर संपुर्ण कूटुंब खाटेखाली ढिगार्‍यांमध्ये बसलेले दिसत आहेत. आवढेच नाही तर त्याला मदत करण्याचे आवाहन देखील करण्यात आले आहे.

कोक स्टुडिओमधील "काना यारी" हे प्रसिद्ध गाणे गायलेला पाकिस्तानी गायक वहाब अली बुगती यांचे बलुचिस्तानमधील पुरामुळे घर गमवावे लागल्याची परिस्थिती सोशल मिडियावर चांगलीच व्हायरल झाली. गायकाची असहाय स्थिती निशात नावाच्या युजरने ट्विटरवर शेअर केली होती आणि तेव्हापासून या गायकाचे फोटो सोशल मीडियावर सतत शेअर केले जात आहेत जेणेकरून लोक त्याच्या मदतीसाठी पुढे येतील.

दरम्यान, निशातची पोस्ट ट्विटरवर व्हायरल झाल्याने गायकाला मदत मिळू लागली आहे. या व्हायरल पोस्टने नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. युजर्सनी गायकाच्या दुर्दशेबद्दल खेद व्यक्त करत त्यांचे विचार देखील शेअर केले आहेत आणि लोकांना मदतीसाठी आवाहन केले आहे. या कोक स्टुडिओच्या सिंगरला त्याच्या परिस्थितीतून बाहेर काढण्यासाठी त्याचे चाहते काही नेटकरी प्रयत्न करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT