Swara Bhaskar & Fahad Ahmed Dainik Gomantak
मनोरंजन

Swara Bhasker: 'श्रद्धासोबत जे घडलं ते स्वरासोबतही...', विश्व हिंदू परिषदेच्या महिला नेत्याचं वक्तव्य

Swara Bhasker Fahad Ahmad Wedding: बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्करचे लग्न सध्या चर्चेत आहे. या लग्नाबाबत समाजातील एक घटक सातत्याने तिच्यावर टीका करत आहे.

Manish Jadhav

Swara Bhasker Fahad Ahmad Wedding: बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्करचे लग्न सध्या चर्चेत आहे. या लग्नाबाबत समाजातील एक घटक सातत्याने तिच्यावर टीका करत आहे. टीका करणाऱ्यांमध्ये विश्व हिंदू परिषदेच्या (Vishwa Hindu Parishad) नेत्या साध्वी प्राचीही आघाडीवर आहेत. स्वराने नुकतेच समाजवादी पार्टीचे नेते फहाद अहमदशी लग्न केले आहे.

स्वराच्या लग्नाबाबत पत्रकारांशी बोलताना साध्वी प्राची म्हणाली की, 'स्वरा भास्कर (Swara Bhasker) नेहमीच हिंदू धर्माच्या विरोधात राहिली आहे. तिने तिच्या धर्माच्या बाहेर कोणाशी लग्न केले हे आश्चर्यकारक नाही.' श्रद्धा वालकर खून प्रकरणाचा संदर्भ देत साध्वी प्राची म्हणाल्या की, 'जर तिने (स्वरा) सावधगिरी बाळगली नाही, तर स्वरासोबतही श्रद्धासारखी घटना घडू शकते.'

दरम्यान, श्रद्धा वालकरचा लिव्ह-इन पार्टनर आफताब पूनावाला याने तिची निर्घृणपणे हत्या केली. श्रद्धाच्या मृतदेहाचे 35 तुकडे त्याने केले. त्याने हे तुकडे फ्रीजमध्ये ठेवले होते. त्यानंतर मृतदेहाचे तुकडे जंगलात फेकून दिले.

एवढा मोठा निर्णय घेण्यापूर्वी तिने (स्वरा भास्कर) एकदा फ्रिज बघायला हवा होता, असे साध्वी प्राची यांनी म्हटले आहे. ही तिची व्यक्तीगत निवड आहे. माझ्याकडे सांगण्यासारखे फार काही नाही. पण जे श्रद्धाचे झाले ते स्वरासोबतही होऊ शकते, असेही त्या पुढे म्हणाल्या.

तसेच, स्वरा भास्करने 16 फेब्रुवारी रोजी सोशल मीडियावर (Social Media) समाजवादी पक्षाचे नेते फहाद अहमदसोबत लग्नाची घोषणा केली. टीकेला सामोरे जाताना स्वराने हा निर्णय घेतला. फहाद वयाने स्वरापेक्षा लहान आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT