Diamond Name Plate On Mannat
Diamond Name Plate On Mannat Dainik Gomantak
मनोरंजन

Diamond Name Plate On Mannat: शाहरूख खानचा बंगला 'मन्नत'वरील डायमंट नेमप्लेटविषयी काय म्हणाली गौरी खान...

Akshay Nirmale

Diamond Name Plate On Mannat: गेल्या काही दिवसांपासून बॉलीवूडचा बादशाह अभिनेता शाहरूख खान याच्या मुंबईतील 'मन्नत' या घरावरील नेमप्लेट चर्चेत आली आहे. ही नेमप्लेट हिऱ्यांची असल्याची चर्चा सोशल मीडियात रंगली होती. त्यानंतर या नेमप्लेटचे अनेक फोटोज व्हायरल झाले आहेत.

दरम्यान, आता खुद्द किंग खानची पत्नी गौरी खानने याबाबत माहिती दिली आहे. गौरीने तिच्या इन्स्टाग्राम हँडलवर तिची भूमिका मांडली आहे. गौरीने म्हटले आहे की, ही नेमप्लेट डायमंड नाही तर ग्लास क्रिस्टलपासून बनलेली आहे.

गौरीनेच मंगळवारी, 22 ऑक्टोबर रोजी मन्नत च्या नेमप्लेटसह स्वतःचा फोटो सोशल मीडियात शेअर केला होता. तिने त्या पोस्टमध्ये म्हटले होते की, घराचे मुख्य गेट तुमच्या कुटूंबासाठी, मित्रांसाठी सर्वात खास पॉईंट असतो. ग्लास नेमप्लेट पॉझिटिव्ह वाईब्स आकर्षित करत असतात. आम्ही आमच्या घराच्या नेमप्लेटसाठी ग्लास क्रिस्टल आणि इतर मटेरियलचा वापर केला आहे. जो पॉझिटिव्ह वातावरम आणि शांत वातावरणाला स्वतःकडे आकर्षून घेतो.

गौरीच्या या पोस्टनंतर मन्नतची नेमप्लेट डायमंड पासून बनलेली नसल्याचे स्पष्ट झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून तशा चर्चा सोशल मीडियात व्हायरल झाल्या होत्या. या नेमप्लेटमध्ये एलईडी लाईट्स आणि हीरे लावल्याचे त्या पोस्टमध्ये म्हटले होते. त्यामुळे शाहरूखचा मन्नत बंगला ट्रेंडिंगमध्ये आला होता. तथापि, यात काहीही तथ्य नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

गौरीच्या या स्पष्टीकरणानंतर किंग खानच्या अनेक चाहत्यांनी गौरीचे आभारही मानले आहेत. अनेकांनी गौरीच्या डिझाईनबद्दल तिचे कौतूकही केले आहे. गौरी ही इंटेरियर डेकोरेटर आहे. तिने अनेक सेलिब्रिटींची घरे अत्यंत सुंदररित्या सजवून दिली आहेत. दरम्यान शाहरूखचे आगामी वर्षात, पठाण, जवान आणि डंकी असे तीन चित्रपट रीलीज होणार आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bardez Water Shortage : बार्देशवासीयांच्या पाचवीला पूजलेलेच पाण्याचे दुर्भिक्ष्य; टॅंकरवरच भिस्त

Bicholim Factory Explosion : कारखाना मालकाला अटक करा; स्फोट प्रकरणी स्थानिकांत संताप

Goa Public Service Commission: सरकारी नोकरीची संधी, गोवा लोकसेवा आयोगामार्फत 24 पदांची भरती

United Nations: पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ ‘भारत’; UN सदस्यत्वाच्या बाजूने केले मतदान

Margao News : ‘साळावली’त जूनपर्यंत पुरेल इतका जलसाठा

SCROLL FOR NEXT