वीरेंद्र सेहवागने अभिषेक बच्चन आणि सैयामी खेरच्या घूमर या चित्रपटावर आपला अभिप्राय देताना एक खंत व्यक्त केली आहे. चित्रपटाबद्दल बोलताना सेहवागने एक व्हिडिओ शेअर केला. त्याच्या या ट्विटवर अमिताभ बच्चन यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवागने घूमर या चित्रपटाचा रिव्ह्यू सेहवागने शेअर केला आहे, ज्यात सैयामी खेर एक पॅराप्लेजिक क्रिकेटर आहे आणि अभिषेक बच्चन तिचे प्रशिक्षक आहेत.
सेहवागने चित्रपटाबद्दल मत व्यक्त करताना असेही सांगितले की त्याने कधीही फिरकीपटूंचा आदर केला नाही किंवा त्याच्या प्रशिक्षकांचे ऐकले नाही परंतु त्याला अभिषेकचे ऐकणे आणि सैयामीच्या कामगिरीचा आदर करणे भाग पडले.
सेहवागचा व्हिडीओ आपल्या इंस्टाग्राम पेजवर शेअर करताना अमिताभ यांनी लिहिले, “सेहवाग जी... एवढी मोठी गोष्ट इतक्या सोप्या शब्दात सांगितली आहेस. मी यासाठी कृतज्ञता आणि प्रेम व्यक्त करतो.
घूमरचे रिव्ह्यू शेअर करताना सेहवागने व्हिडिओमध्ये म्हटले आहे की, “काल मी घूमर चित्रपट पाहिला . चित्रपट खूपच सुंदर होता. खूप दिवसांनी क्रिकेटवरचा चित्रपट पाहताना बरं वाटलं. कारण यात क्रिकेट तर आहेच ;पण त्यासोबतच इमोशन सुद्धा आहेत.
एका खेळाडूचा संघर्ष काय असतो? याचा अंदाज तुम्हाला या चित्रपटात येईल, खासकरुन जेव्हा जखमी खेळाडूला पुन्हा परतताना काय संघर्ष करावा लागतो हेही कळेल.
सेहवाग पुढे म्हणाला, मी स्पिनरचा कधीच आदर करत नाही पण सैयामीने ज्या पद्धतीने चेंडू फिरवला तो अप्रतिम होता. मी माझ्या प्रशिक्षकाचे कधीच ऐकले नाही पण अभिषेकने ज्या प्रकारे अभिनय केला आहे, तुम्हाला त्याचे ऐकावे लागेल.
घूमर पहा आणि प्रेरणा घ्या. आणि अमिताभ बच्चन यांनी म्हटल्याप्रमाणे, मी देखील म्हणत आहे, 'मला हा खेळ आवडतो'. हा चित्रपट तुम्हाला आवडेल तुम्हाला तो रडवेल.
अभिषेक घूमरमध्ये प्रशिक्षकाच्या भूमिकेत आहे, ज्याच्या आयुष्याला अनपेक्षित वळण लागते जेव्हा तो पॅराप्लेजिक खेळाडू, सैयामीला पाहतो. त्यांचा एकत्रित प्रवास सामाजिक आव्हाने आणि वैयक्तिक संघर्षांतून उलगडतो. 'पा' फेम आर बाल्की यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. या चित्रपटात अमिताभ यांचीही भूमिका आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.