मनोरंजन

Jaya Bachchan: जया बच्चन यांची मिमिक्री करणाऱ्या 'या' मुलीचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होतोय!

गोमन्तक डिजिटल टीम

सोशल मीडियावर अनेकजण बॉलीवूड स्टार्सची नक्कल करतात किंवा त्यांना कॉपी करण्याचा प्रयत्न करतात. सोशल मीडियावर अलिकडे एका मुलीचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. अॅनाली सेरेजोचा असे या मुलीचे नाव आहे. तिचा 'ब्रह्मास्त्र'मधील आलिया भट्टची नक्कल करतानाचा व्हिडिओ प्रचंड गाजला. नुकताच तिचा नवीन व्हिडीओ आला असून, यात ती जया बच्चन यांची नक्कल करताना दिसत आहे.

जया बच्चन यांचा यापूर्वी एक व्हिडिओ समोर आला होता, ज्यामध्ये त्या मिडियावर रागावताना दिसत आहेत. या व्हिडिओमध्ये जया बच्चन त्यांची नात नंदासोबत एका फॅशन शोमधून बाहेर पडत आहेत. त्यानंतर त्यांना अनेक मिडिया कर्मचाऱ्यांनी घेरले. यावेळी जया बच्चन मिडिया कर्मचाऱ्यांवर रागवताना दिसत आहेत. दरम्यान, त्यांची नात नंदा आपल्या आजीला शांत करताना दिसत आहे.

अन्नाली सेरेजोने याच घटनेतील जया बच्चन यांची नक्कल करणारा व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये अन्नालीने जया बच्चन यांच्यासारखा मेकअप करण्याचा प्रयत्न केला आहे. या व्हिडिओमध्ये जया बच्चन मिडिया कर्मचाऱ्यांना जे काही म्हणाल्या त्याच ओळी अन्नाली व्हिडिओत बोलताना दिसत आहे. इतकंच नाही तर ती तिच्या चेहऱ्यावरचे हावभाव सारखे करण्याचा प्रयत्न करत आहे.

अन्नाली सेरेजोचा हा व्हिडिओ सोशल मीडियावरील चाहत्यांना खूप आवडला असून, हा व्हिडिओ आतापर्यंत 94 हजारांहून अधिक लोकांनी पाहिला आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाला पाहिजे, अशी कमेन्ट एका यूजरने या व्हिडिओवर दिली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

Duleep Trophy Winner 2026: 13 वर्षांनंतर चॅम्पियनशिपचा महासंग्राम जिंकला! ईस्ट झोनने जिंकली दुलीप ट्रॉफी; ईशान किशन ठरला विजयाचा 'हिरो' VIDEO

Canacona Coarse Farming: पावसाने ऐन पेरणीच्या काळात दिला दगा; काणकोणातील भरड शेतीला मोठा फटका, 2520 हेक्टरपैकी मोठ्या क्षेत्रावर पेरणीच नाही

Goa Politics: 'गोवा फर्स्ट' 2027चा नवा राजकीय पर्याय ठरणार? सरदेसाईंचे संकेत; काँग्रेससोबतची युतीची बोलणी सध्या स्थगित

Houthi Missile Attack Saudi Arabia: हुतींच्या सौदीवरील हल्ल्याने बिथरला पाकिस्तान, इराणला दिली तंबी; मुस्लीम जगतात खळबळ

SCROLL FOR NEXT