Tamanna Vijay Bhatia Dainik Gomantak
मनोरंजन

Tamannah - Vijay Varma Spotted: म्हणजे ऐकलं ते खरंय ! तमन्ना आणि विजय वर्मा डेटवर... व्हायरल व्हिडीओ पाहिलात का?

Rahul sadolikar

Tamannah and Vijay Varma Spotted Together: मनोरंजन विश्वातुन वरचेवर लिंक-अपच्या बातम्या समोर येत राहतात. कोण कधी कुणासमोर दिसेल आणि आणि कुणाची जोडी कधी वेगळी होईल हे सांगणं मुश्कील असतं.

आता एका कपलची सोशल मिडीयावर जोरदार चर्चा सुरू आहे. हे कपल दुसरे कोणी नसून विजय वर्मा आणि तमन्ना भाटिया आहेत. 

दोघेही बऱ्याच दिवसांपासून एकमेकांना डेट करत आहेत. या दोघांचा न्यू इयर पार्टीचा व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल झाल्यानंतर त्यांच्या डेटिंगच्या बातम्या येऊ लागल्या होत्या.

तेव्हापासून दोघेही अनेकदा एकत्र स्पॉट झाले आहेत. पुन्हा एकदा विजय आणि तमन्ना एकत्र डिनर डेट एन्जॉय करताना दिसले आहेत. 

विजय वर्मा (Vijay Varma) आणि तमन्ना भाटिया(Tamananah Bhatia) यांच्या अफेअरच्या बातम्यांमुळे अनेक दिवसांपासून सोशल मिडीया तापले होते.

गोव्यातील या दोन्ही स्टार्सचे काही फोटो व्हायरल झाले होते, ते पाहून चाहत्यांनी तमन्ना-विजयच्या नात्याबद्दल अंदाज बांधायला सुरुवात केली. एकीकडे दोघांनीही त्यांच्या नात्यावर मौन बाळगले असताना दुसरीकडे अनेकदा एकत्र स्पॉट होताना दोघेही मागे हटत नाहीत. 

पुन्हा एकदा दोघांनी असे काही केले ज्यानंतर पुन्हा त्यांच्या अफेअरच्या बातम्या चर्चेत आल्या आहेत. खरं तर, सोशल मीडियावर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तमन्ना भाटिया आणि विजय वर्मा एका रेस्टॉरंटमधून बाहेर पडताना दिसत आहेत.

समोर आलेल्या व्हिडिओमध्ये विजय वर्मा आणि तमन्ना डिनर डेटचा आनंद घेतल्यानंतर रेस्टॉरंटमधून बाहेर पडताना दिसत आहेत.

रेस्टॉरंटमधून बाहेर पडल्यानंतर दोघेही सोबत कारमध्ये बसले आणि एवढेच नाही तर दोघांनी पापाराझींच्या दिशेने पाहिले आणि अगदी व्यवस्थित कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. 

व्हिडिओमध्ये, तमन्ना पांढर्‍या क्रॉप टॉपसह राखाडी रंगाची पँट परिधान केलेली दिसत आहे, तर विजयने चेक शर्ट आणि हलक्या रंगाची पँट घातली आहे. हा व्हिडिओ समोर येताच चाहते त्यावर सातत्याने कमेंट करत आहेत आणि आपापल्या प्रतिक्रिया देत आहेत. 

हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर झाल्यापासून चाहते त्यावर आपल्या प्रतिक्रिया देताना दिसत आहेत. यावर कमेंट करताना एका चाहत्याने लिहिले की, 'दोघेही खूप प्रेमात दिसत आहेत.' तर दुसऱ्याने लिहिले, 'ते खरोखरच जोडप्यासारखे दिसतात.'

अनेकवेळा एकत्र स्पॉट झाले असूनही, तमन्ना आणि विजय यांनी त्यांच्या नात्याबद्दल कोणतेही अधिकृत वक्तव्य दिलेले नाही.

पण विजयसोबतच्या रिलेशनशिपच्या अफवांवर तमन्नाने नुकतीच प्रतिक्रिया दिली होती. अभिनेत्री म्हणाली होती की तिने विजयसोबत एक चित्रपट केला आहे त्यामुळेच अशा अफवा पसरत राहतात.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

बॉलीवूड, टॉलीवूडचा प्रसिद्ध नृत्य दिग्दर्शक जानी मास्टरला गोव्यात अटक, सहकारी महिलेचा 6 वर्षापासून लैंगिक छळ केल्याचा आरोप

Ratnagiri Crime News: स्वप्नात दिसला मृतदेह, सिंधुदुर्गातील तरुण पोहोचला पोलीस ठाण्यात; तपासात उघड झाली धक्कादायक माहिती

तम्नार प्रकल्प रखडणार! कर्नाटकचे शेपूट वाकडेच, सिद्धरामय्यांनी कळसा-भांडुराचा मुद्दा केला उपस्थित

रस्त्यांच्या अवस्थेवरुन काँग्रेस आक्रमक; दहा दिवसांत काम सुरु न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा

फोंड्यात 'हेडा गॅब्लर'चा प्रयोग; 125 वर्षापूर्वी लिहलेले नोर्वेजियन नाटककाराचे नाटक पाहण्याची संधी

SCROLL FOR NEXT