Ravdi Janardan Dainik Gomantak
मनोरंजन

Vijay Devarakonda: कोकणवासियांनो! विजय देवरकोंडा आलाय तुमच्या गावात, 'रावडी जनार्दन' कोकणच्या प्रेमात

Ravdi Janardan shooting: महाराष्ट्राचे निसर्गरम्य रत्न असलेले कोकण, आता पुन्हा एकदा चित्रपटसृष्टीचे आवडते ठिकाण बनलेय.

Akshata Chhatre

Vijay Devarakonda Konkan Shoot: महाराष्ट्राचे निसर्गरम्य रत्न असलेले कोकण, आता पुन्हा एकदा चित्रपटसृष्टीचे आवडते ठिकाण बनलेय. निळाशार समुद्रकिनारा, नारळी-पोफळीच्या बागा, लाल माती आणि चिरेबंदी वाड्यांनी नटलेले कोकण, नेहमीच मराठी आणि हिंदी चित्रपटांच्या सौंदर्यात भर घालत आले आहे. मात्र, आता दक्षिण भारतीय सिनेसृष्टीही कोकणच्या प्रेमात पडली असून, सध्या 'रावडी जनार्दन' या साऊथ चित्रपटाचे भव्य चित्रीकरण कोकणातील सैतवडे गावात सुरू आहे.

सैतवडे गावात उभारला भव्य सेट

'रावडी जनार्दन' या चित्रपटाचे कथानक इ.स. १९०० मधील ब्रिटिश राजवटीच्या काळावर आधारित आहे. त्यामुळे त्या काळाचा अनुभव देण्यासाठी सैतवडे येथील 'द मॉडेल इंग्लिश स्कूल'च्या मैदानावर जिल्हाधिकारी कार्यालयाचा भव्य सेट उभारण्यात आला आहे.

आठवड्याभरापासून चित्रीकरण सुरू असल्याने सैतवडे गावात उत्साहाचे वातावरण आहे. गावकऱ्यांपासून ते शेजारच्या भागातील लोकही शूटिंग पाहण्यासाठी गर्दी करत आहेत. या चित्रपटातील अनेक दृश्ये समुद्रकिनाऱ्यावरही चित्रित केली जात आहेत. सैतवडे येथील चित्रीकरण पूर्ण झाल्यावर, पुढील शेड्यूल वरवडे गावात पार पडणार आहे.

कोकणचे 'सिनेमॅटिक' सौंदर्य

कोकणातील शांत, सुंदर आणि ऐतिहासिक वातावरण निर्मात्यांना अधिक आकर्षित करत आहे. अलीकडील काळात 'मुंजा', 'थ्री ऑफ अस' यांसारख्या बॉलिवूड चित्रपटांचे; तसेच 'उनाड', 'सुभेदार', 'शेरशिवराज', 'श्यामची आई', 'प्रीतम', 'पांघरुण' यांसारख्या अनेक मराठी चित्रपटांचे चित्रीकरण वेंगुर्ला, गुहागर, रत्नागिरी, दापोली, कणकवली, कुडाळ परिसरात झाले आहे. \

आता दक्षिण भारतीय निर्मात्यांचेही लक्ष कोकणाकडे वळल्यामुळे मराठी, हिंदी आणि साऊथ निर्माते शूटिंगच्या परवानगीसाठी रांगा लावत आहेत. कोकणात वाढलेले हे चित्रीकरण स्थानिक लोकांसाठी केवळ अभिमानाची बाब नाही, तर रोजगार आणि पर्यटन वाढीचे एक मोठे नवीन दालन ठरत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

हडफडे दुर्घटना; गर्दी आणि लहान दरवाज्यांमुळे लोक अडकले, पळून जाण्यासाठी मार्गच नव्हता; प्राथमिक तपासात धक्कादायक खुलासे

हडफडे दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना 5 लाख, तर जखमींना 50 हजारांची आर्थिक मदत; CM प्रमोद सावंतांची घोषणा

Goa Bread History: 1500च्या दशकात पोर्तुगिज आले, भारतात सर्वांत पहिला 'पाव' गोव्यात तयार झाला; इथून तो मुंबईत गेला..

VIDEO: LIVE सामन्यात 'हाय-व्होल्टेज' ड्रामा! बाचाबाचीनंतर संतापलेल्या आर्चरचा बाउन्सर, स्मिथनं थेट षटकार ठोकत दिलं उत्तर

30 कोटी रुपयांची फसवणूक, चित्रपट निर्माते विक्रम भट्ट यांना अटक; मनोरंजन विश्वात खळबळ!

SCROLL FOR NEXT