Jalsa: विद्या बालन दिसणार हटके भूमिकेत Instagram/@balanvidya
मनोरंजन

Jalsa: विद्या बालन दिसणार हटके भूमिकेत

या चित्रपटात उत्तम पात्र आणि अनोखी कथा आहे जी प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण करेल.

दैनिक गोमन्तक

बॉलीवुडमधील (Bollywood) प्रसिद्ध अभिनेत्री विद्या बालनच्या (Vidya Balan) आगामी चित्रपटाची (Film) शूटिंग मुंबईत सुरू आहे. 'तुम्हारी सुलू' या सुपरहिट (Superhit) चित्रपटानंतर दिग्दर्शक (Director) सुरेश त्रिवेणी यांचा आगामी 'जालसा' (Jalsa) या चित्रपटात विद्या बालनसह शेफाली शाह आणि रोहिणी हट्टंगणीही मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

सुरेश त्रिवेणीसह प्रज्वल चंद्रशेखर यांनी 'जालसा' चित्रपटाचे (Film) लेखन केले आहे. हुसेन आणि अब्बास दलाल यांच्या संवादासह या मानव कौलसह विधात्री बांदी, गुरपाल सिंग आणि सूर्य काशीभटला या चित्रपटात मुख्य भूमिका साकारणार आहेत. चित्रपटाच्या शूटींच्या पहिल्या दिवशी सुरेश त्रिवेणी म्हणाले, "विद्या आणि शेफाली विद्या बालनने स्वत: या चित्रपटाबाबत आपले मत व्यक्त केले आहे. ‘’अनुभवी कलाकार आणि तंत्रज्ञांच्या टीमशी जोडले जाणे माझ्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे. 'जालसा' चित्रपट मनोरंजक आणि रोमांचने परिपूर्ण असणार आहे. या चित्रपटात (Film) उत्तम पात्र आणि अनोखी कथा आहे जी प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण करेल आणि प्रेक्षकांच्या पंसतीस उतरेल.

'तुम्हारी सुलू' हा एक अनोखा, मजेदार अनुभव होता आणि मला आशा आहे की 'जालसा' आमच्यासाठीही एक वेगळा अनुभव असेल. मी शेफाली आणि उर्वरित कलाकार आणि अद्भुत क्रूसोबत काम करण्यासाठी खूप उत्साही असल्याचं विद्याने म्हंटल आहे. तर जेव्हा सुरेशने मला पहिल्यांदा याबद्दल सांगितले, तेव्हाच मला हा चित्रपट करायचा होता. विद्या बालनसारख्या अनुभवी अभिनेत्रीसोबत काम करण्यासाठी उत्सुक असल्याच अभिनेत्री शेफाली शाहने म्हटलं आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Shreyanka Patil Ruled Out: टीम इंडियाला मोठा धक्का! दुखापतीमुळे श्रेयंका पाटील टी-20 विश्वचषकातून बाहेर, कोणाची होणार एन्ट्री?

Sattari water Isuue: दूषित पाणीप्रकरणी आयोग सक्रिय; सत्तरीत स्वतःहून चौकशी, संबंधित विभागांना नोटीस

Goa Politics: "एनडीएला बळ देण्यासाठीच प्रवेश", 7 खासदारांच्या पक्षांतरावर कीर्तीकरांचे विधान

Padma Shri Prasad Sawkar: आठवणीत वसलेले प्रसाद सावकार

आगामी निवडणुकांमध्ये तरुणांसह महिलांना देणार संधी! 'जेनझी'शी राजकीय 'कनेक्ट' गरजेचा- विजय सरदेसाई

SCROLL FOR NEXT