Vicky Kaushal Dainik Gomantak
मनोरंजन

"म्हणून मी लष्करी अधिकाऱ्याची भूमीका करतो" विकी कौशलने सांगितले कारण

विकी कौशल लवकरच सॅम बहादूर या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात अभिनेत्री सान्या मल्होत्रा ​​आणि फातिमा सना शेख देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहेत

Rahul sadolikar

विकी कौशल लवकरच सॅम बहादूर या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात अभिनेत्री सान्या मल्होत्रा ​​आणि फातिमा सना शेख देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. 1 डिसेंबरला हा चित्रपट अॅनिमलसोबत मोठ्या पडद्यावर दाखल होणार आहे. 

आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत विकी कौशलने सांगितले आहे की, त्याला भारतीय लष्करी अधिकाऱ्याची भूमिका साकारण्यात जास्त आनंद का वाटतो.

विकी कौशल

 बॉलीवूड अभिनेता विकी कौशल हा सर्वोत्तम आणि प्रतिभावान अभिनेत्यांपैकी एक आहे. अनेक चित्रपटांमध्ये आपल्या दमदार अभिनयाने त्यांनी एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. विकीने त्याच्या करिअरमध्ये 'उरी: द सर्जिकल स्ट्राइक', 'सरदार उधम'सह अनेक सुपरहिट चित्रपट केले आहेत. आता तो लवकरच सॅम माणेकशॉ यांच्या जीवनावर आधारित 'सॅम बहादूर' या चित्रपटात दिसणार आहे .

विकीची मुलाखत

अलीकडेच विक्की कौशलने एका मुलाखतीत त्याच्या व्यावसायिक जीवनाशी संबंधित अनेक प्रश्नांबद्दल सांगितले आहे. त्याने हे देखील सांगितले आहे की त्याला भारतीय सैन्याची भूमिका साकारण्यात सर्वाधिक आनंद का येतो.

मी लष्करी अधिकाऱ्याची भूमिका का करतो

विक्की कौशलने पिंकविला मास्टरक्लासला दिलेल्या मुलाखतीत तो लष्करी अधिकाऱ्याची भूमिका का करतो हे सांगितले. अभिनेता म्हणाला, 'मला वाटते की जेव्हा मला माझ्या पात्रांसाठी भारतीय सैन्याचा गणवेश घालण्याची संधी मिळते, तेव्हा मला एक गोष्ट खूप आवडते ती म्हणजे मला भारतीय लष्कराशी खूप संवाद साधायला मिळतो.'

मराठा रेजीमेंटमध्ये घालवला वेळ

विकी कौशल पुढे म्हणाला की, 'लष्करातील लोक गंभीर दिसत असले तरी प्रत्यक्षात ते खूप खेळकर असतात. विकीने शेअर केले की, 'सॅम बहादूर'च्या शूटिंगपूर्वी तो पुण्याजवळ मराठा रेजिमेंटमध्ये ३ दिवस राहिला होता आणि तिथे त्याने खूप छान वेळ घालवला होता. 

ते मस्ती करायचे, पार्टी करायचे, रंजक किस्से शेअर करायचे आणि विनोदही करायचे. तो पहाटे ३ वाजेपर्यंत बाहेर फिरायचा आणि मग पहाटे ५ वाजता उठायचा आणि ३ किलोमीटर धावायचा, त्यानंतर तो बास्केटबॉलचा खेळ खेळायचा.

चित्रपटातले कलाकार

विकी पुढे म्हणाला की, 'या ट्रिपची सर्वात चांगली गोष्ट म्हणजे त्याला असे वाटले की त्याला बाहेरच्या व्यक्तीसारखे वागवले जात नाही, तर त्याच्याशी स्वतःच्या व्यक्तीसारखे वागले गेले'.

मेघना गुलजार दिग्दर्शित 'साम बहादूर' हा चित्रपट 1 डिसेंबरला चित्रपटगृहात प्रदर्शित होण्यासाठी सज्ज आहे .

या चित्रपटात विकी कौशलसोबत सान्या मल्होत्रा ​​आणि फातिमा सना शेख देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहेत . या चित्रपटाची मोठ्या पडद्यावर रणबीर कपूर स्टारर 'अॅनिमल' या चित्रपटाशी टक्कर होणार आहे .

IND vs AUS: शिखर धवन-युसूफ पठाणची वादळी खेळी निष्फळ, कांगारूंनी भारताचा 4 गडी राखून केला पराभव

Usgaon Bridge: उसगावात 62 वर्षे जुनाट पूल दुरावस्थेत; स्थानिकांची दुरुस्तीची मागणी

Valpoi: बाप रे... गायीच्या पोटात प्लास्टिकचा ढीग! शस्त्रक्रिया करून तब्बल 26 किलो प्लास्टिक काढलं

Viral News: प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत सापडली पत्नी, बेदम मार खाल्यानंतर नग्नच पळाला लव्हर Watch Video

Pusapati Ashok Gajapathi Raju: पुसापती अशोक गजपती राजूंनी गोव्याचे राज्यपाल म्हणून स्वीकारली सूत्रे; आंध्रवासीयांच्या आनंदाला भरते

SCROLL FOR NEXT