Vicky Kaushal-Katrina Kaif Dainik Gomantak
मनोरंजन

Vicky Kaushal-Katrina Kaif: विकिने शेअर केले कॅटसोबतच्या सुखी संसाराचे रहस्य

विकी कौशलने एका मुलाखती दरम्यान कतरिना कैफसोबतच्या त्याच्या सुखी संसाराचे रहस्य सांगितले आहे.

Puja Bonkile

Vicky Kaushal-Katrina Kaif: बॉलिवूड अभिनेता विकी कौशल सध्या त्याच्या जरा 'हटके जरा बचके' या चित्रपटाच्या यशाचा आनंद घेत आहे. सारा अली खानसोबत त्याची जोडी पहिल्यांदाच रुपेरी पडद्यावर पाहायला मिळत आहे. प्रेक्षकांना ही जोडी खूप आवडली आहे. लक्ष्मण उतेकर यांचा हा चित्रपट 2 जून रोजी रिलीज झाला आहे.

अलीकडेच, चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान विकीने सांगितले की, तो कतरिना कैफसोबत त्याच्या चित्रपटाच्या प्रोजेक्ट्सवर चर्चा करत असतो. यासोबतच त्याने आपल्या सुखी संसाराचे रहस्यही सांगितले आहे.

विकी आणि कतरिना सध्या न्यूयॉर्कमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेत आहेत. टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना विकीने सांगितले तो चित्रपटाची निवड करतांना घरातील सदस्यांचे मत घेतो,कारण सर्वच चित्रपट उद्योगाशी संबंधित आहेत.

  • आईने घरात हा नियम बनवला आहे

पुढे बोलतांना विकी म्हणाला की एकदा घरातील सर्व सदस्य जेवत असतांना चित्रपटांबद्दल बोलत होते. चित्रपटांबद्दल एकमेकांचे मत घेत होते. पण त्याच्या आईने असा नियम केला की रात्रीच्या जेवणाच्या वेळी कोणीही त्यांच्या प्रोफेशनल लाइफ बोलणार नाही.

  • सुखी संसाराचे रहस्य

काही काळ डेट केल्यानंतर विकी-कतरिना डिसेंबर 2021 मध्ये लग्नबंधणात अडकले. मुलाखतीदरम्यान विकीला हॅप्पी मॅरिड लाइफसाठी टिप्स विचारण्यात आल्या होत्या. यावर तो म्हणाला - लग्नात संयमाची खूप गरज असते. 

एकाच गोष्टीवर दोन व्यक्तींचे एकमत होणे इतके सोपे नाही. समजदारी आणि मॅच्योरिटी  असणे गरजेचे असते. माझ्या दीड वर्षाच्या वैवाहिक जीवनात मला हे समजले आहे की, वैवाहिक जीवन नीट चालवण्यासाठी संयम खूप महत्त्वाचा आहे. माझे माझ्या पत्नीवर, कुटुंबावर प्रेम आहे. मी माझ्या आयुष्यावर प्रेम करतो. पण, इतरांप्रमाणे माझ्यातही दोष आहेत.

सारा अली खान आणि विकी कौशल यांचा 'जरा हटके जरा बचके' हा चित्रपट शुक्रवार 2 जून 2023 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे. लक्ष्मण उतेकर यांनी या रोमँटिक कॉमेडी चित्रपटाचे लेखन केले असून दिग्दर्शनाची खुर्चीही त्यांनीच सांभाळली आहे. दिनेश विजन आणि ज्योती देशपांडे यांनी संयुक्तपणे या चित्रपटाची निर्मिती केली आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करतांना दिसत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

ED Goa: गोव्यात ईडीची झाडाझडती; 'सडा अर्बन'ची 1.05 कोटींची मालमत्ता तर जमीन हडप प्रकरणी संदीप वझरकर 3.19 कोटींची जमीन जप्त

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

Goa News Live: अडवलपालमध्ये गढूळ पाण्याचा पुरवठा, 'फोमेंतो' कंपनीच्या रिजेक्शनमुळे समस्या

Pandharpur Wari: 1566 साली लोक जुने गोवेतील रस्त्यांतून, अभंग म्हणत वारीला जात असल्याची नोंद आहे..

SCROLL FOR NEXT