Vicky Kaushal Dainik Gomantak
मनोरंजन

Sam Bhadur Poster: विकी कौशलचा अनोखा अंदाज; पोस्ट शेअर करत चाहत्यांची मिळवली वाहवा

Sam Bhadur Poster: काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचा टीझर रिलिज झाला होता.

दैनिक गोमन्तक

Sam Bhadur Poster: 2023 मध्ये बॉलीवूडचे एकापेक्षा एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. त्यामध्ये जवान, पठाण यांसारख्या चित्रपटांचा समावेश आहे. आता आणखी मोठा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाला आहे. हा चित्रपट म्हणजे सॅम बहाद्दूर होय.

विकी कौशल या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसून येणार आहे. राझी चित्रपटानंतर तो पुन्हा एकदा डायरेक्टर मेघना गुलजार यांच्यासोबत चित्रपट करताना दिसत आहे. प्रेक्षकांमध्ये या चित्रपटाची उत्सुकता दिसून येत आहे.

आता चित्रपट प्रदर्शित होण्यासाठी १ महिना राहिला असताना विकी कौशलने सोशल मिडियावर एक जबरदस्त पोस्टर शेअर केले आहे. याबरोबरच हे पोस्टर शेअर करताना विकीने चित्रपट रिलिज होण्यासाठी एक महिना बाकी असेदेखील लिहले आहे. त्याच्या या पोस्टवर झोया अख्तर लुकिंग गुड( Looking Good ) असे म्हटले आहे आणि नेटकऱ्यांनी चित्रपट पाहण्यासाठी उत्सुक असल्याचे म्हटले आहे.

या चित्रपटात सान्या मल्होत्रा आणि सना शेख या अभिनेत्रीदेखील मुख्य भुमिकेत दिसून येणार आहेत. सान्या सॅम बहाद्दुर यांच्या पत्नीची भूमिका निभावताना दिसत असून सना शेख ही इंदिरा गांधी यांच्या भुमिकेत दिसणार आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचा टीझर रिलिज झाला होता. हा टीझर( Teaser ) प्रेक्षकांना भलताच आवडला होता.

आता १ डिसेंबरला हा चित्रपट चित्रपटगृहात रिलिज होणार असून रणबीर कपूरच्या अॅनिमल चित्रपटाबरोबर स्पर्धा करावी लागणार आहे. आता कोणता चित्रपट( Movie ) प्रेक्षकांचे मन जिंकून घेण्यास यशस्वी होणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

Duleep Trophy Winner 2026: 13 वर्षांनंतर चॅम्पियनशिपचा महासंग्राम जिंकला! ईस्ट झोनने जिंकली दुलीप ट्रॉफी; ईशान किशन ठरला विजयाचा 'हिरो' VIDEO

Canacona Coarse Farming: पावसाने ऐन पेरणीच्या काळात दिला दगा; काणकोणातील भरड शेतीला मोठा फटका, 2520 हेक्टरपैकी मोठ्या क्षेत्रावर पेरणीच नाही

Goa Politics: 'गोवा फर्स्ट' 2027चा नवा राजकीय पर्याय ठरणार? सरदेसाईंचे संकेत; काँग्रेससोबतची युतीची बोलणी सध्या स्थगित

Houthi Missile Attack Saudi Arabia: हुतींच्या सौदीवरील हल्ल्याने बिथरला पाकिस्तान, इराणला दिली तंबी; मुस्लीम जगतात खळबळ

SCROLL FOR NEXT