Urfi Javed  Dainik Gomantak
मनोरंजन

Urfi Javed - Chitra Wagh मी जेलमध्ये जायला तयार आहे ;पण आधी तुमची...ऊर्फी जावेदचं चित्रा वाघ यांना आव्हान..

भाजपच्या महाराष्ट्रातल्या नेत्या चित्रा वाघ आणि अतरंगी कपड्यांची राणी ऊर्फी जावेद यांच्यात जोरदार वाद सुरू आहेत.

Rahul sadolikar

आपल्या अतरंगी कपड्यांनी सतत चर्चेत असणाऱ्या ऊर्फी जावेदने आता थेट राजकीय नेत्यांशी वाद घालायला सुरूवात केली आहे. भाजपच्या महाराष्ट्राच्या नेत्या चित्रा वाघ यांच्याशी अलीकडे ऊर्फीचा वाद सुरू आहे.पण या वादाचं नेमकं कारण काय आहे? ऊर्फीला थेट राजकीय नेत्यांशी भिडावं लागतंय. चला तर पाहुया ऊर्फी आणि चित्रा वाघ यांच्या वादामागे नेमकं काय कारण आहे.

ऊर्फी जावेदच्या कपड्यांच्या स्टाईलबद्दल सगळ्यांनाच माहित आहे. अत्यंत अतरंगी कपडे घालुन ऊर्फी वावरत असते. या गोष्टीमुळे बऱ्याचदा ती ट्रोलही झाली आहे. सोशल मिडीयावर काही दिवसांपूर्वी हॉकी प्लेयर युवराज वाल्मिकी याच्याशी ऊर्फीची वादावादी झाली होती. बिग बॉस फेम हिंदुस्तानी भाऊशीही ऊर्फीचा वाद झाला आहे. आणि आता ऊर्फीचा वाद थेट भाजपच्या वरिष्ठ नेत्या चित्रा वाघ यांच्याशी झाला आहे.

चित्रा वाघ यांनी ऊर्फी जावेदच्या विरोधात मुंबई पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. मुंबईच्या रस्त्यावर अश्लिलता पसरवल्याचा आरोप ऊर्फीवर करण्यात आला आहे. आता अशी तक्रार केल्यावर शांत बसेल ती ऊर्फी कसली? चित्रा वाघ यांच्या या तक्रारीवर ऊर्फीने एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये ऊर्फीने थेट चित्रा वाघ यांना चॅलेंज केलं आहे.

ऊर्फी लिहिते की मी एक ट्रायल किंवा बकवास करणार नाही. तुम्ही फक्त तुमची आणि तुमच्या घरच्या मंडळींची संपत्ती जाहीर करा मी जेलमध्ये जायला तयार आहे. आधी लोकांना हे कळु द्या की एक राजकारणी पैसा किती कमावतो आणि कसा कमावतो? वेळोवेळी तुमच्या पार्टीच्या पुरूष नेत्यांच्या चुकीच्या वर्तनाची प्रकरणं बाहेर आली आहेत, त्याबद्दल बोलताना तुम्ही कधी दिसला नाहीत.

दुसऱ्या एका पोस्टमध्ये ऊर्फीने लिहीलं आहे, “माझं नवीन वर्ष दुसऱ्या एका राजकारण्याकडुन झालेल्या तक्रारीने सुरू झालंय. कारण या राजकारण्याजवळ काही काम उरलेलं नाही. हे राजकारणी, वकील मुर्ख आहेत का ? संविधानात अशी कोणतीही तरतूद नाही, ज्याआधारे मला जेलमध्ये जावं लागेल.

अश्लिलता आणि नग्नतेच्या प्रत्येक व्यक्तीच्या व्याख्या वेगळ्या असतात. जर माझ्या शरीराचा एखादा खास भाग दिसत नसेल तर तुम्ही जेलमध्ये पाठवू शकत नाही. हे फक्त मिडीयाचं आकर्षण मिळवण्यासाठी चाललं आहे".

पुढे ऊर्फी चित्रा वाघ यांना सल्ला देताना म्हणते "माझ्याकडे तुमच्यासाठी एक खुप चांगला विचार समजते. मुंबईत मानव तस्करी आणि सेक्स ट्रॅफिकिंगसारख्या घटना अजुन घडत आहे.तुम्हाला याबद्दल काही विचार करायला हवा.अनधिकृत डान्सबार बंद करायला हवेत जे अजुन सुरू आहेत". ऊर्फीच्या या एवढ्या बोलण्यावर चित्रा वाघ शांत बसतील असं वाटत नाही. आता बघुया चित्रा वाघ काय करतायत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT