Twinkle Khanna Dainik Gomantak
मनोरंजन

Twinkle Khanna: '...तर माझ्या मुलांनी पळून जावे' ट्विंकल खन्नाचे स्वत:च्याच लेकरांबद्दल अजब वक्तव्य

Twinkle Khanna: मी 'तम्मा तम्मा' या गाण्यावर डान्स करण्याचा प्रयत्न केला तेव्हा देवालाही माझा तो डान्स पाहवला नाही.

दैनिक गोमन्तक

Twinkle khanna talking about her chiIdren's wedding

नुकताच अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा प्री-वेडिंग सोहळा पार पडला. महत्वाचे म्हणजे, जगभरातील उच्चपदावर असलेल्या, प्रसिद्ध आणि लोकप्रिय असलेल्या व्यक्ती या सोहळ्याला हजर राहिल्या होत्या. या ग्रँड सोहळ्याची चर्चा आजही रंगताना दिसत आहे. बॉलीवूडच्या जवळपास सगळ्याच कलाकारांनी या प्री-वेडिंग सोहळ्याला हजेरी लावली होती. आता ट्विंकल खन्नाने यावर भाष्य केले आहे.

ट्विंकल खन्नाने अलीकडेच टाइम्स ऑफ इंडियाच्या कॉलममध्ये लिहियला सुरुवात केली आहे. यामध्ये तिने अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांनी लग्न करण्याचे स्टँडर्ड खूप उंचावले आहेत आणि त्यामुळे माझ्या मुलांनी म्हणजेच आरव आणि निताराने पळून जावून लग्न करावे कारण मला आणि अक्षयला २० लोकांपेक्षा जास्त लोकांसाठी पार्टीचे आयोजन करताना नाकीनऊ येते. त्यामुळे एवढा मोठा कार्यक्रम करणे शक्य होईल की नाही माहित नाही, असे अभिनेत्रीने म्हटले आहे.

अक्षय दहानंतर जागत नाही, त्यामुळे आमची मुले खूष राहणार असतील त्यांनी पळून जाऊन लग्न केले तरी आमची काही हरकत नाहीए, असे तिने आपल्या ब्लॉगमध्ये म्हटले आहे. पुढे ती म्हणते की, ठीक आहे, मला नीता वहिणींसारखा डान्स करता येत नाही. पण लॉकडाऊनच्यावेळी जेव्हा मी 'तम्मा तम्मा' या गाण्यावर डान्स करण्याचा प्रयत्न केला तेव्हा देवालाही माझा तो डान्स पाहवला नाही. त्यामुळेच माझा पाय फॅक्र्चर झाला.

दरम्यान, ट्विंकल खन्ना आपल्या लिखाणामुळे आणि आपल्या शिक्षणामुळे मोठ्या चर्चेत असते. सुरुवातीच्या काळात अभिनय क्षेत्रात नाव कमावणारी ही अभिनेत्रीने अक्षय कुमारसोबत लग्नानंतर तिने करिअर सोडून लेखनाच्या दुनियेत प्रवेश केला. तिची आतापर्यंत 'मिसेस फनीबोन्स', 'द लीजेंड ऑफ रायटिंग वर्ल्ड' आणि 'पायजामा आर फॉरगिव्हिंग' ही तिची तीन पुस्तके प्रकाशित झाली आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Shiroda: संतापजनक! दरवाजा फोडून केली चोरी, नंतर दुकानच दिले पेटवून; 12 लाखांचे नुकसान

Water Flow Meter: 'मतांसाठी मोफत पाणी देणार नाही'! गोव्यात वॉटर फ्लो मीटर’चा होणार वापर; पाणी चोरी, गळतीवर येणार नियंत्रण

Zilla Panchayat Election: जिल्हा पंचायतींची निवडणूक 13 डिसेंबरला? राज्य सरकार करणार घोषणा; प्रभाग फेररचना होणार पूर्ण

Goa Rain: पावसाबाबत नवी अपडेट! पुढच्या आठवड्यात कोसळणार सरी; वाचा ताजा अंदाज

Goa Politics: 'युतीतील पक्षांचे खच्चीकरण हेच काँग्रेसचे ध्‍येय'! आतिषी यांचा स्‍वबळावर लढण्याचा नारा; निवडणुकीत नवे चेहरे उतरवणार

SCROLL FOR NEXT