Twinkle Khanna Dainik Gomantak
मनोरंजन

Twinkle Khanna: पत्नीला 'सुपरवुमन' म्हणत अक्षयने ट्विंकल खन्नाचे केले कौतुक!

Twinkle Khanna: ट्विंकलच्या अभ्यासाप्रती असलेल्या समर्पणाचेही त्याने कौतुक केले.

दैनिक गोमन्तक

Twinkle Khanna: बॉलीवूडचे कलाकार हे नेहमीच चर्चेचा विषय असतात. त्यांच्या चित्रपटांची, चित्रपटातील व्यक्तीरेखेची जितकी चर्चा होते तितकीच त्यांच्या वैयक्तिक आयुष्याचीदेखील होते, त्यांच्या कुटुंबाचीदेखील तितकीच चर्चा होताना दिसते.

आता या चर्चांचा बॉलीवूडचा खिलाडी अक्षय कुमार भाग झाला आहे. याचे कारण त्याची पत्नी ट्विंकल खन्ना ठरली. प्रसिद्ध लेखिका ट्विंकल खन्ना हिने वयाच्या ५० व्या वर्षी मास्टर्स पूर्ण केले आहे. तिने लंडन विद्यापीठातून पदव्युत्तर पदवी घेतली आहे. तिच्या या यशाचा अक्षय कुमारलादेखील खूप आनंद झाल्याचे पाहायला मिळाले आहे. सोशल मिडियावर तिला सुपरवुमन म्हणत त्याने ट्विंकल खन्नाचे कौतुक केले आहे.

अक्षय कुमारने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर ट्विंकल खन्नासोबतचा एक फोटो शेअर केला आहे. यामध्ये ट्विंकलने ग्रॅज्युएशन गाऊनसोबत हिरव्या रंगाची साडी परिधान केली आहे. अक्षयने पत्नीच्या या यशाची बातमी मोठ्या थाटामाटात चाहत्यांशी शेअर केली. ट्विंकलच्या अभ्यासाप्रती असलेल्या समर्पणाचेही त्याने कौतुक केले.

अक्षयने लिहिले की, 'दोन वर्षांपूर्वी जेव्हा तू मला पुन्हा अभ्यास करायचा आहे असे सांगितले तेव्हा मला प्रश्न पडला की तू खरोखरच याबाबत गंभीर आहेस का? पण ज्या दिवशी मी पाहिलं की तू खूप मेहनत करत आहेस. घर आणि करिअरसोबतच तू संपूर्ण विद्यार्थी जीवनही जगत होतीस हे पाहून मला आश्चर्य वाटले. मला माहित आहे की मी एका सुपरवुमनशी लग्न केले आहे. अक्षयने पुढे लिहिले की, 'आज तुझ्या ग्रॅज्युएशनच्या दिवशी, मलाही वाटते की मी अजून थोडा अभ्यास केला असता, तर टीना, मला तुझा किती अभिमान आहे हे सांगण्यासाठी माझ्याकडे पुरेसे शब्द आहेत. खूप अभिनंदन, टीना!

ट्विंकल खन्नाने लंडन विद्यापीठातील गोल्डस्मिथ्समधून फिक्शन लेखनाचा अभ्यास पूर्ण केला आहे. आता ट्विंकलने तिचा अभ्यास पूर्ण केल्याने तिच्या आनंदाला पारावार उरला नाही. विशेष म्हणजे ट्विंकलने तिचा मुलगा आरव ज्या विद्यापीठात शिकतो त्याच विद्यापीठात अर्ज केला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Zilla Panchayat Election: जिल्हा पंचायतींची निवडणूक 13 डिसेंबरला? राज्य सरकार करणार घोषणा; प्रभाग फेररचना होणार पूर्ण

Goa Rain: पावसाबाबत नवी अपडेट! पुढच्या आठवड्यात कोसळणार सरी; वाचा ताजा अंदाज

Goa Politics: 'युतीतील पक्षांचे खच्चीकरण हेच काँग्रेसचे ध्‍येय'! आतिषी यांचा स्‍वबळावर लढण्याचा नारा; निवडणुकीत नवे चेहरे उतरवणार

Codar IIT Project: ‘आयआयटी आमका नाका'! कोडार ग्रामस्थ आक्रमक; सत्तरी, सांगे, केपेनंतर राज्य सरकारला मोठा झटका

Rashi Bhavishya 09 September 2025: नोकरीत उत्तम संधी मिळेल, आरोग्याची थोडी काळजी घ्या; मानसिक तणाव टाळण्यासाठी शांत राहा

SCROLL FOR NEXT