Web Series on Veerappan Dainik Gomantak
मनोरंजन

Web Series on Veerappan : चंदन तस्करी, शेकडो लोकांचे बळी... कुप्रसिद्ध वीरप्पनवर वेबसिरीज, टिजर झाला रिलीज..

चंदनाच्या झाडांची तस्करी आणि हत्तींची कत्तल करणाऱ्या वीरप्पनची गोष्ट आता ओटीटीवर येणार आहे.

Rahul sadolikar

भारताच्या गुन्हेगारी जगताचा इतिहास लिहिला गेला तर त्यात अनेक मोठमोठ्या गुन्हेगारांची नावं समोर येतील, पण यात एक नाव नक्की समोर येईल आणि ते म्हणजे चंदन तस्कर वीरप्पन..वीरप्पन पुन्हा चर्चेत येण्याचं कारण म्हणजे या कुप्रसिद्ध गुन्हेगारावर एक माहितीपट सिरीज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्स द हंट फॉर वीरप्पन नावाची नवीन माहितीपट मालिका घेऊन येत आहे. ही मालिका दक्षिण भारतातील चंदन तस्कर वीरप्पनवर आधारित असणार आहे. नेटफ्लिक्सने गुरुवारी त्याचा ट्रेलर रिलीज केला आहे, ज्यामध्ये वीरप्पनच्या गुन्ह्यांची झलक पाहायला मिळत आहे.

असा आहे ट्रेलर

ट्रेलरची सुरुवात व्हॉईस-ओव्हरने होते, ज्यामध्ये वीरप्पनच्या गुन्ह्यांचा उल्लेख केला जात आहे. इतिहासात वीरप्पनसारखा गुन्हेगार कधीच घडला नसल्याचे बोलले जात आहे. या ट्रेलरमध्ये वीरप्पनने 119 लोकांची हत्या केल्याचे सांगण्यात आले होते. हा ट्रेलर शेअर करताना नेटफ्लिक्सने लिहिले की, "एका तस्कराची माफिया बनण्याची कहाणी."

वीरप्पन दक्षिण भारतातील तस्कर

वीरप्पन हा दक्षिण भारतातील तस्कर होता. आपल्या गुन्हेगारी कारवायांनी त्याने खळबळ उडवून दिली होती. शेकडो लोकांना ठार मारण्याबरोबरच त्याने 2000 हून अधिक हत्तींचीही शिकार केल्याचे सांगितले जाते. हत्तींची शिकार केल्यानंतर तो त्यांच्या दातांची तस्करी करत असे. तामिळनाडू स्पेशल टास्क फोर्सने वीरप्पनचा सामना केला होता.

या भाषांत होणार सिरीज

या मालिकेबद्दल बोलायचे झाले तर ही मालिका हिंदी, इंग्रजी, तमिळ, तेलुगू, मल्याळम आणि कन्नड भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. त्याची रिलीज डेट 4 ऑगस्ट आहे. ही पहिलीच वेळ नसली तरी याआधीही वीरप्पनची कथा पडद्यावर दाखवण्यात आली आहे. 

यापूर्वीही आली होती वीरप्पनची गोष्ट

2016 मध्ये वीरप्पनवर याच नावाने एक चित्रपट आला होता, ज्यामध्ये अभिनेता संदीप भारद्वाजने त्याची भूमिका साकारली होती. या चित्रपटाचे दिग्दर्शन राम गोपाल वर्मा यांनी केले होते. 

 शिव राजकुमार, सचिन जे जोशी, लिसा रे आणि जरीन खान सारखे स्टार्सही त्या चित्रपटात दिसले होते. हा चित्रपट OTT प्लॅटफॉर्म प्राइम व्हिडिओ आणि Disney Plus Hotstar वर उपलब्ध आहे. मात्र, द हंट फॉर वीरप्पन या वेब सीरिजबद्दल सांगितले जात आहे की, ही चार भागांची मालिका असणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT