Mili Trailer Dainik Gomantak
मनोरंजन

Mili Trailer: अंगावर काटा येणारा जान्हवी कपूरच्या 'मिली' चित्रपटाचा ट्रेलर पाहिलात का?

चार नोव्हेंबर रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

जान्हवी कपूरच्या चित्तथरारक 'मिली' चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. चित्रपटाचा ट्रेलर तुमच्या अंगावर काटा आणल्याशिवाय राहणार नाही. मिली चित्रपटात जान्हवी कपूरने अतिशय कौतुकास्पद अभिनय केला आहे. जान्हवी आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी परदेशात जाते आणि अचानक घरातून गायब होते. जान्हवी कामाच्या ठिकाणी असलेल्या मायनस डिग्री तापमानाच्या फ्रीझरमध्ये अडकून पडते आणि तिचा जगण्यासाठी संघर्ष सुरू होतो.

'मिली' चित्रपटाचा ट्रेलर सध्या नेटवर धुमाकूळ घालत आहे. ट्रेलरची सुरुवात फ्रीझरमध्ये अडकलेल्या जान्हवी कपूरच्या दृश्याने होते. यात जान्हवी आपला जीव वाचवण्यासाठी धडपडत असताना दिसत आहे. मिली (जान्हवी कपूर) तिच्या वडिलांसोबत एकटी राहते. तिला परदेशी नोकरीची ऑफर येते, त्यासाठी ती सर्व तयारी करते. पण अचानक कथेत ट्विस्ट येतो. मिली फ्रीझरमध्ये अडकून पडते आणि तिचा तपास सुरू होतो.

पोलिसांत देखील याबाबत तक्रार दिली जाते. जान्हवी मरण यातना भोगत असताना तिच्या चेहऱ्यावर, हातावर रक्ताच्या खुणा दिसत आहेत. ट्रेलरच्या शेवटी तीने स्वतःला फॉइलने गुंडाळले आहे. चित्रपटाचा ट्रेलर सध्या प्रचंड व्हायरल होत असून, चित्रपट चाहते मिलीच्या ट्रेलरवरती चांगल्या प्रतिक्रिया देत आहेत.

मिली हा मल्याळम थ्रिलर चित्रपट हेलनचा रिमेक आहे. हेलन हा चित्रपट 2019 मध्ये प्रदर्शित झाला होता. राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक मथुकुट्टी झेवियर यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. तर, रितेश शाह या चित्रपटाचे लेखक आहेत. जान्हवी कपूरचे वडील बोनी कपूर यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. चार नोव्हेंबर रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cockroach Janata Party: 'झुरळ' शब्दाने भडकवला बेरोजगारांचा वणवा! 'कॉक्रोच जनता पार्टी'ने हादरवली दिल्ली

फेब्रुवारीतील इशारा ऐकला असता तर... सरकारवर नामुष्कीची आणि लाखो मुलांच्या जीव टांगणीला लागण्याची वेळ आली नसती; CBSE चा 'महा'घोटाळा चव्हाट्यावर!

Goa ST Reservation: गावडा, कुणबी आणि वेळीप समाजाचे डोळे दिल्लीकडे, गोव्यात आरक्षणाचा सर्वात मोठा सस्पेन्स; अमित शहा आठवडाभरात भूमिका करणार स्पष्ट?

Coal Exchange Rules 2026: मुरगाव बंदराबाबत सर्वात मोठी बातमी! केंद्र सरकारच्या 'या' निर्णयामुळे कोळसा व्यापाराला मिळणार गती

Diksha Parwadkar Accident: दीक्षा पारवडकर मृत्यू प्रकरणात नवा खळबळजनक ट्विस्ट! परवाना निलंबित तरीही गोव्यात आलिशान गाड्यांची विक्री सुरुच!

SCROLL FOR NEXT