Lal Salam Teaser release Dainik Gomantak
मनोरंजन

रजनीकांत पुन्हा एकदा ढासू लूकमध्ये...लाल सलामचा ट्रेलर रिलीज

साऊथचे सुपरस्टार थलैवा अर्थात रजनीकांत यांचा नव्या चित्रपटाचा टिझर नुकताच रिलीज झाला आहे.

Rahul sadolikar

Rajanikanth's Lal Salam's teaser release : साउथ सिनेसृष्टीतील सुपरस्टार रजनीकांत सध्या त्याच्या आगामी 'लाल सलाम' या चित्रपटामुळे चर्चेत आहेत. चाहते या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. 'लाल सलाम'ची घोषणा झाल्यापासून हा चित्रपट चर्चेचा विषय ठरला आहे. 

आज दिवाळीच्या मुहूर्तावर रजनीकांत यांनी त्यांच्या चाहत्यांना एक मोठी भेट दिली आहे. तो एका महत्त्वाच्या संदेशासह पडद्यावर परतला आहे. आज दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर लाल सलामचा पहिला टीझर रिलीज झाला आहे. या चित्रपटाची झलक त्याने चाहत्यांना दाखवली आहे. 

ऐश्वर्या रजनीकांतचे दिग्दर्शन

रजनीकांत यांची मुलगी ऐश्वर्या रजनीकांत हिने 'लाल सलाम' चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. या चित्रपटाबद्दल रजनीकांतचे चाहते खूप उत्सुक आहेत. 

दिवाळीच्या मुहूर्तावर आज या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे. या चित्रपटाचा टीझर चाहत्यांना खूप आवडला आहे. 'लाल सलाम'चा दोन मिनिटांपेक्षा कमी कालावधीचा टीझर चित्रपटाचे विश्व निर्माण करतो.  

टिझरमध्ये दिसणार अॅक्शन

'लाल सलाम'च्या टीझरची सुरुवात एका गावात क्रिकेट मॅचने होते, कारण सध्या खेळपट्टीवर खूप तणाव आहे. यानंतर जातीय चकमकी सुरू होतात, त्यात दंगलीसारखी दृश्येही पाहायला मिळतात. या चित्रपटात रजनीकांत मोईदीन भाईच्या भूमिकेत दिसणार आहेत. 

रजनीकांत या चित्रपटात धमाकेदार अॅक्शन करताना दिसत आहेत. चित्रपटाच्या टीझरमध्ये जबरदस्त अॅक्शन पाहायला मिळत आहे. व्हिडीओच्या शेवटी रजनीकांत म्हणतात, 'तुम्ही खेळात धर्म मिसळला आणि मुलांच्या मनात विष कालवले जाईल.' 

रहमानचे संगीत

'लाल सलाम'मध्ये विष्णू विशाल आणि विक्रांत मुख्य भूमिकेत आहेत, तर रजनीकांत चित्रपटात छोट्या भूमिकेत दिसणार आहेत. चित्रपटाचे संगीत ए आर रहमान यांनी दिले आहे. लायका प्रॉडक्शन निर्मित 'लाल सलाम' या चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या तारखेबद्दल सांगायचे तर हा चित्रपट पुढील वर्षी 2024 मध्ये पोंगलच्या मुहूर्तावर चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. 

सायंकाळी गोव्याचा एक मूड असतो! त्यांना जास्त वेळ थांबवणं योग्य नाही; भाषण उरकत घेत अमित शहांची मिश्किल टिप्पणी

Amit Shah In Goa: "2047 पर्यंत वाट पाहायची गरज नाही, 2037 पर्यंत गोवा 'विकसित राज्य' बनेल", गृहमंत्री अमित शहांचा विश्वास

Rohit Sharma Captaincy: 'राजकीय' खेळात 'हिटमॅन' रोहितची विकेट! टीम इंडियावर गंभीर आरोप, चाहत्यांनी व्यक्त केली नाराजी

अमित शहांच्या हस्ते 'म्हजे घर योजने'चा भव्य शुभारंभ! CM सावंतांनी दिली '6 महिन्यांत नोंदणी'ची ग्वाही

ओपा प्रकल्पातील दुरुस्ती पूर्णत्वाकडे; पणजीला 11 वाजेपर्यंत पाणीपुरवठा सुरु होण्याची शक्यता!

SCROLL FOR NEXT