Pongal Thalapathy Vijay Ajith  Dainik Gomantak
मनोरंजन

Pongal Weekend And South Cinema: पोंगलच्या सुट्ट्यांमध्ये या दोन साऊथ सुपरस्टारचे तगडे चित्रपट येणार...

सध्या पोंगलचा वीकेंड सुरू आहे, आणि दोन तगडे चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. या सुट्ट्यांचा फायदा या चित्रपटांना होईल असे चित्र आहे

Rahul sadolikar

दक्षिण भारतीयांना आपली संस्कृती आणि भाषेचा वाटणारा सार्थ अभिमान वेळोवेळी दिसतो. दक्षिणेकडच्या राज्यात सामान्य नागरीकापासुन ते मोठमोठ्या सेलिब्रेटींपर्यंत सगळेच आपल्या मातृभाषेचा आग्रह धरताना दिसतात.

सध्या पोंगल हा दक्षिण भारतीयांचा अत्यंत महत्त्वाचा सण सुरुय, त्यानिमीत्ताने सुट्ट्या सुरूयत दक्षिण भारतातील मोठ्या पोंगल वीकेंडमुळे चित्रपट व्यवसायासाठी वर्षाची सुरुवात चांगली होईल अशी शक्यता आहे.

वर्षातला हा सर्वात मोठा विकेंड सुरु असताना , दोन मोठे चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीसाठी तयार आहेत. सुपरस्टार थलपती विजयचा 'वारिसू' आणि अभिनेता अजितचा 'थुनिवू' हा दोन चित्रपट तगडी टक्कर देणार हे नक्की.

साऊथच्या चित्रपटांतले हे महत्त्वाचे चेहरे आता आपले चित्रपट घेऊन पोंगलच्या सुट्ट्यांमध्ये येत आहेत. शनिवार रविवार आणि पुढच्या काही सुट्ट्यांमध्ये चित्रपट चांगला व्यवसाय करतील अशी अपेक्षा आहे.

तेलुगू सिनेमातही दोन चित्रपट पोंगलच्या आनंदात भर टाकायला येत आहेत. यात चिरंजीवीचा 'वॉलटेर वीरैया' आणि बालकृष्णाचे 'वीरा सिम्हा रेड्डी' हे चित्रपट रिलीज होतील . 

या काळात एकही मोठा हिंदी चित्रपट रिलीज होणार नाही. त्यामुळे साऊथच्या डब केलेल्या हिंदी चित्रपटांना चांगला प्रतिसाद मिळेल अशी आशा व्यक्त केली जात आहे.

“पोंगल वीकेंड हा 2023 मध्ये चित्रपट रिलीज होण्यासाठी एक चांगली वेळ मानली जात आहे.  सुपरस्टार अजित आणि विजय यांचे दोन तगडे तमिळ चित्रपट नऊ वर्षांच्या अंतरानंतर वीकेंडला एकमेकांना टक्कर देतील. 

दोन्ही अभिनेत्यांच्या चाहत्यांची संख्या मोठी आहे. त्यामुळे साहजिकच चित्रपटाच्या कलेक्शनमध्ये चढाओढ असणार हे नक्की. 

अभिनेता अजित आणि थलपती विजय या दोघांचेही चित्रपट जबरदस्त अ‍ॅक्शन,तगडा अभिनय या जोरावर ब्लॉकबस्टर ठरण्याची शक्यता आहे.

विशेषतः दक्षिणेकडील राज्यांमधील थिएटर्समध्ये मोठ्या प्रमाणात स्पर्धा होण्याची शक्यता आहे," असं , 'बुक माय शो'( Book My Show)चे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष सक्सेना, यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT