New Release On OTT Dainik Gomantak
मनोरंजन

New Release On OTT: येत्या आठवड्यात 'हे' चित्रपट ओटीटीवर रीलीज होणार

तापसी पन्नू, समंथाच्या चित्रपटाचाही समावेश

Akshay Nirmale

New Release On OTT: ओटीटी प्लेटफॉर्म (OTT Platform) आवडणाऱ्या रसिकांसाठी आगामी आठवडा मनोरंजनाची मेजवानी घेऊन येणार आहे. या आठवड्यात कोणकोणते चित्रपट ओटीटीवर रीलीज होणार आहेत, ते जाणून घेऊया.

ब्लर (Blurr)

अभिनेत्री तापसी पन्नू हीचा आगामी चित्रपट 'ब्लर' 9 डिसेंबर रोजी थेट ओटीटी प्लॅटफॉर्मवर रीलीज होत आहे. हा चित्रपट झी 5 वर येत आहे. गेल्या काही काळात तापसीचे अनेक चित्रपट बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरले त्यामुळे हा चित्रपट थेट ओटीटीवर रीलीज होत आहे. हा चित्रपट सस्पेन्स थ्रिलर असून एका स्पॅनिश चित्रपटाची रीमेक आहे.

यशोदा (Yashoda)

साऊथ ब्युटी अभिनेत्री समंथा रूथ प्रभू (Samantha Ruth Prabhu) हीचा चित्रपट 'यशोदा' 11 नोव्हेंबर रोजी थिएटरमध्ये रीलीज झाला होता. त्यानंतर आता हा चित्रपट 9 डिसेंबरपासून अॅमेझॉन प्राईम व्हिडिओ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रीलीज होत आहे. बॉक्सऑफिसवर या चित्रपटाला फारसे यश मिळालेले नव्हते.

कॉफी विद कधल (Coffee with Kadhal)

तमिळ चित्रपट 'कॉफी विथ कधल' 4 नोव्हेंबर रोजी रीलीज झाला होता. या चित्रपटात तीन भाऊबहिणींची कहाणी आहे. हा चित्रपटदेखील 9 डिसेंबर रोजी झी 5 वर स्ट्रीम होणार आहे.

मासूम रागा (Monsoon Raaga)

सुप्रसिद्ध कलाकार धनंजय याचा 'मासूम रागा' हा चित्रपट 16 सप्टेंबर रोजी रीलीज झाला होता. या चित्रपटाला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद लाभला होता. हा चित्रपट 9 डिसेंबरपासून झी 5 वर दिसणार आहे.

दरम्यान, बॉक्सऑफिसवर सध्या अजूनही 'दृश्यम 2'ची हवा असून पुढील आठवड्यात सर्वांचे लक्ष्य जेम्स कॅमेरून दिग्दर्शित 'अवतार 2' या चित्रपटाकडे असणार आहे. हा चित्रपट 16 डिसेंबर रोजी रीलीज होत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Elvish Yadav: "अनेक घरे उद्ध्वस्त केली..." भाऊ गँगने एल्विश यादवच्या घरावर झाडल्या गोळ्या; पोस्ट करत दिली माहिती, हल्ल्याचे कारणही सांगितले

Asia Cup 2025: आशिया कपसाठी पाकिस्तान संघ जाहीर, बाबर-रिझवानला डच्चू; 'या' खेळाडूंना मिळाली संधी

Kshatriya Origins: बटाडोम्बा-लेना, फा-हियन गुहेतील 30000 ईसापूर्वीचे होमिनिन सांगाड्याचे अवशेष, वेदरांचा उल्लेख

Video Viral: मडगावच्या दहीहंडीत आला 'पुष्पा'! "झुकेगा नही" म्हणत त्याने काय केलं, बघा...

Opinion: 3500 ईसापूर्व काळात सुमेरियन लोकांनी ‘क्यूनिफॉर्म’ लिपी विकसित केली, छापखान्याच्या शोधामुळे वाचनकलेत क्रांती झाली

SCROLL FOR NEXT