This cute dance video of Salman Khan and Genelia D'Souza is going viral on the internet

 

Dainik Gomantak

मनोरंजन

Video: सलमान खान आणि जेनेलियाचा 'हा' क्यूट डान्स व्हिडिओ होतोय व्हायरल

बॉलिवूडचा दिग्गज अभिनेता सलमान खानने 27 डिसेंबर रोजी त्याचा 56 वा वाढदिवस साजरा केला.

दैनिक गोमन्तक

बॉलिवूडचा दिग्गज अभिनेता सलमान खानने 27 डिसेंबर रोजी त्याचा 56 वा वाढदिवस साजरा केला. यावेळी त्यांनी त्याच्या जवळच्या मित्रांसाठी त्याच्या पनवेल फार्महाऊसवर पार्टीचे आयोजन केले होते. या पार्टीत अनेक सिनेतारकांनीही सहभाग घेतला होता. त्याचबरोबर अनेक बॉलिवूड स्टार्सनी सलमान खानला वाढदिवसाच्या खास शुभेच्छा दिल्या. बॉलीवूड अभिनेत्री जेनेलिया डिसूझानेही त्याला वाढदिवसाच्या खास शुभेच्छा दिल्या.

जेनेलिया डिसूजाने (Genelia D'Souza) सलमान खानसोबतचा (Salman Khan) स्वतःचा एक खास व्हिडिओ सोशल मीडियावर (Social Media) शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये ती दिग्गज अभिनेत्यासोबत डान्स करताना दिसत आहे. जेनेलिया डिसूझा प्रसिद्ध अभिनेत्री आणि अभिनेता रितेश देशमुखची पत्नी आहे. जेनेलिया डिसूझा सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ती अनेकदा तिच्या चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. जेनेलिया डिसूजाने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर सलमान खानसोबत डान्स करतानाचा एक व्हिडिओ शेअर केला आहे.

व्हिडिओमध्ये जेनेलिया डिसूजा आणि सलमान खान जोरदार डान्स करताना दिसत आहेत. दोघेही डान्स करताना जोरजोरात ओरडत आहेत. व्हिडिओमध्ये जेनेलिया डिसूजा आणि सलमान खान एकाच रंगाच्या ड्रेसमध्ये दिसत आहेत. हा व्हिडिओ शेअर करत जेनेलिया डिसूजाने सलमान खानला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. तिने व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले की, 'सर्वात मोठ्या मनाच्या माणसाला वाढदिवसाच्या शुभेच्छा. देव तुम्हाला जगातील सर्व सुख देवो. तुम्हाला प्रेम आणि उत्तम आरोग्यासाठी शुभेच्छा. आम्ही सर्व तुमच्यावर खूप प्रेम करतो. आज भावाचा वाढदिवस आहे.

जेनेलिया डिसूझा आणि सलमान खानच्या डान्सचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. दोन्ही कलाकारांच्या चाहत्यांना हा व्हिडीओ चांगलाच आवडला आहे. तसेच कमेंट करून ते प्रतिक्रिया देत आहते. सलमान खानने त्याचा 56 वा वाढदिवस त्याच्या पनवेल फार्महाऊसवर साजरा केला. या सेलिब्रेशनसाठी अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी भाईजानच्या फार्महाऊसवर पोहोचले आहेत. बॉबी देओल, संगीता बिजलानी, सैफ अली खानचा मुलगा इब्राहिम अली खान, निखिल द्विवेदी, रजत शर्मा, वत्सल सेठ, अतुल अग्निहोत्री, अलविरा खान अग्निहोत्री यांसारख्या सेलिब्रिटींनी हजेरी लावली.

त्याचवेळी, सलमान खानला त्याच्या 56 व्या वाढदिवसाच्या एक दिवस आधी एका मोठ्या अपघाताला सामोरे जावे लागले होते. रविवारी सलमान खानला साप चावला. ही घटना अभिनेत्यासोबत त्याच्या पनवेल फार्महाऊसवर घडली. दुसरीकडे, सलमान खानच्या चाहत्यांना आणि जवळच्या मित्रांना त्याच्यासोबत झालेल्या या अपघाताची माहिती मिळताच सर्वांनी त्याच्या आरोग्यासाठी प्रार्थना करण्यास सुरुवात केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

घरात भांडण करुन पळाले, कच्छच्या जंगलात गाववाल्यांनी पकडले, अल्पवयीन पाकिस्तानी जोडप्याने प्रेमासाठी पार केली देशाची सीमा

Fishing Boat Accident: काणकोणातील राजबाग किनाऱ्यावर पुन्हा बोट उलटली, स्थानिक मदतीसाठी धावले!

Viral Video: बिहारमधून दिसू लागला हिमालय आणि माऊंट एव्हरेस्ट; मनमोहक व्हिडिओ आला समोर Watch

Goa Politics: आमदार भाजपमध्ये जाणार नाहीत याची गॅरंटी द्या! ‘आप’चा काँग्रेससोबत युतीस स्पष्ट नकार

Shubhman Gill: "त्यांनी भारताला स्वबळावर अनेक सामने जिंकून दिले, आम्हाला त्यांची गरज..." नवा कर्णधार शुभमन गिलचे रोहित-विराटबाबत मोठं वक्तव्य

SCROLL FOR NEXT