The Railway Men Dainik Gomantak
मनोरंजन

The Railway Men : भोपाळ गॅस दुर्घटनेची भीषणता दाखवणाऱ्या 'द रेल्वे मेन'चा टीझर रिलीज

भोपाळ गॅस दुर्घटनेवर आधारित 'द रेल्वे मेन' या वेब सिरीजचा ट्रेलर रिलीज झाला आहे.

Rahul sadolikar

The Railway Men Teaser OUT : 2 डिसेंबर 1984 ही रात्र भोपाळच्या नागरिकांसाठी काळरात्र ठरली होती. याच दिवशी भारतातली सर्वांत मोठी दुर्दैवी घटना घडली होती. गॅस गळतीमुळे पसरलेल्या विषारी वायूने कित्येक निष्पाप जीव घेतले होते.

भारताच्या इतिहासात एक वाईट घटना म्हणून नोंदवलेल्या या घटनेवर आधारित वेब सिरीजचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला आहे. चला पाहुया याबाबतचे सविस्तर वृत्त.

सत्यघटनेवर आधारित

एका सत्य घटनेवर आधारित The Railway Men या वेबसिरीजचा बहुप्रतिक्षित टीझर रिलीज झाला आहे. धमाकेदार टीझरसोबत मालिकेची रिलीज डेटही जाहीर करण्यात आली आहे. पुन्हा एकदा दिवंगत अभिनेता इरफान खानचा मुलगा बाबिल खान आपल्या अभिनयाची जादू दाखवताना दिसला. त्याच्यासोबत आर. माधवनही दिसणार आहे.

टीझर रिलीज

2 डिसेंबर 1984 रोजी भोपाळमधील रासायनिक कारखान्यातून विषारी वायूची गळती झाली. ही घटना इतकी भयंकर होती की हजारो लोकांचे प्राण गेले आणि लाखो लोक बाधित झाले.

 ही गॅस गळतीची घटना जगातील सर्वात मोठ्या औद्योगिक आपत्तींपैकी एक आहे. या घटनेवर ' द रेल्वे मेन' ही वेब सिरीज बनवण्यात आली आहे , ज्याचा टीझर आज रिलीज करण्यात आला आहे.

द रेल्वे मेन वेब सिरीज

यशराज फिल्म्सच्या बॅनरखाली बनवलेल्या ' द रेल्वे मेन ' या वेब सिरीजमध्ये आर. माधवन, केके मेनन, बाबिल खान आणि 'मिर्झापूर' फेम दिव्येंदू मुख्य भूमिकेत आहेत . 28 ऑक्टोबर 2023 रोजी या वेब सीरिजचा अधिकृत टीझर रिलीज झाला, जो पाहून तुमचा आत्मा हादरून जाईल. 

धडकी भरवणारा टिझर

टीझरची सुरुवात मध्यरात्री कारखान्यातून गॅस गळतीने होते. बॅकग्राऊंडला आवाज ऐकू येतो, "एक दुर्घटना घडली आहे, एक मोठी दुर्घटना. जुन्या भोपाळमधील रासायनिक कारखान्यातून गॅस गळती झाली आहे. त्यामुळे शहराचा गळचेपी होत आहे.

या क्षणी भोपाळ जंक्शन नकाशावरून गायब झाले आहे." गॅस गळतीमुळे त्रस्त झालेल्या लोकांचे प्राण वाचवण्यासाठी अनेक जण आले आणि त्यांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता त्यांना वाचवले. 'द रेल्वे मेन' त्या नायकावर आधारित कथा सांगते.

आर माधवन अन् इरफान खानचा मुलगा

या सिरीजमध्ये आर. माधवन मध्य रेल्वेच्या जीएम रती पांडेची भूमिका साकारत आहे. केके मेनन स्टेशन मास्टर, बाबिल खान लोको पायलट आणि कॉन्स्टेबल दिव्येंदू बनले आहेत. 

चौघांनी मिळून भोपाळच्या लोकांना त्यांचा जीव वाचवण्यासाठी शहराबाहेर पाठवण्याची योजना आखली. या टीझरमध्ये असे अनेक सीन्स आहेत, जे तुम्हाला थक्क करतील.

या दिवशी रिलीज होणार ही सिरीज

शिव रवैल दिग्दर्शित ' द रेल्वे मेन ' ही मालिका 18 नोव्हेंबर 2023 रोजी OTT प्लॅटफॉर्म Netflix वर प्रदर्शित होणार आहे. या मालिकेचे चार भाग असतील. मालिकेत चारही कलाकारांनी उत्तम काम केले आहे. 'काला' नंतर बाबिल खान पुन्हा एकदा वेगळ्या भूमिकेत दिसला. 

Vice President Candidate: ठरलं! एनडीए’चे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून सी.पी. राधाकृष्णन यांच्या नावाची घोषणा

Goa Film Festival 2025: ज्येष्ठ अभिनेत्री वर्षा उसगावकर जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित, ‘जुझे’ ठरला सर्वाधिक पुरस्कार विजेता चित्रपट

'...नाहीतर देशाची माफी मागा’, राहुल गांधींच्या आरोपांवर मुख्य निवडणूक आयुक्तांचे थेट प्रत्युत्तर; दिली 7 दिवसांची मुदत

Viral Video: 'सापांचा राजा'! जगातील सर्वात लांब विषारी सापाचा व्हिडिओ व्हायरल, एका हल्ल्यात घेऊ शकतो हत्तीचाही जीव

Weekly Health Horoscope: आरोग्याच्या दृष्टीने आव्हानात्मक आठवडा! 'या' 5 राशींनी निष्काळजीपणा टाळावा

SCROLL FOR NEXT