Bollywood actor Vineet Sharma Dainik Gomantak
मनोरंजन

खाकीतला सुपरस्टार आता ‘नौदला’त

‘सिंघम’ या चित्रपटाने एकेकाळी बॉलिवूडमध्ये (Bollywood) धमाल उडवली.

दैनिक गोमन्तक

‘सिंघम’ या चित्रपटाने एकेकाळी बॉलिवूडमध्ये (Bollywood) धमाल उडवली. या चित्रपटात (Films) अजय देवगन याच्यासोबत सहकलाकाराची भूमिका बजावणारा विनित शर्मा (Vineet Sharma) हासुद्धा एक कर्तबगार पोलिस अधिकारी म्हणून घराघरांत पोहोचला. यामुळे पोलिस दलातही विनितला सन्मानाचे स्थान मिळत आहे. त्याची शरीरयष्टीही या खात्याला शोभणारी आहे. कलाकार नव्हे, तर अस्सल पोलिस अधिकारी म्हणून त्याच्या चेहऱ्याची ओळख झाली आहे. आता विनित नव्या भूमिकेत झळकणार आहे. भारतीय नौदलातील एका अधिकाऱ्याच्या भूमिकेत तो रितेश देशमुखसह पडद्यावर दिसेल. चित्रपटाचे नाव न सांगण्याच्या अटीवर त्याने ही माहिती ‘गोमन्तक’शी बोलताना दिली.

विनितचे गोव्यावर विशेष प्रेम आहे. ‘सिंघम’ चित्रपटाचे शुटिंगही गोव्यातच झाल्याने हे राज्य त्याच्यासाठी परिचित आहे. आपले आवडते ठिकाण म्हणूनही विनित गोव्याचेच नाव घेतो. ‘सिंघम’मुळे माझी वेगळी ओळख निर्माण झाली. आजही पोलिसांमध्ये मला खूप आपुलकीची वागणूक दिली जाते. त्यांच्याकडून मिळत असलेला मान खूप प्रेरणा देतो. पोलिस अधिकाऱ्याची भूमिका लोकप्रिय ठरल्याने माझ्याकडेही एका अधिकाऱ्याला मिळणाऱ्या सन्मानपूर्वक दृष्टीने लोक पाहातात. त्यामुळे आता पोलिसानंतर नौदल अधिकाऱ्याची नवी भूमिका पार पाडण्याचे आव्हान माझ्यासमोर आहे. आगामी चित्रपटात मी अभिनेता रितेश देशमुख याच्यासोबत झळकणार आहे, असे विनितने सांगितले.

इफ्फीचे कौतुक

सिनेरसिकांना आंतरराष्ट्रीय चित्रपट पाहण्याची संधी मिळवून देणारे इफ्फी हे मोठे व्यासपीठ आहे. पर्यटन क्षेत्रात गोवा जगप्रसिद्ध आहेच, त्यातच आता इफ्फीचीही भर पडली आहे. इफ्फीचे आकर्षण सर्वसामान्य रसिकांसह आमच्यासारख्या कलाकारांनाही असते, असे विनित म्हणाला.

ज्यांच्याकडून अभिनयाची प्रेरणा मिळते, अशी व्यक्ती म्हणजे अमिताभ बच्चन. मी त्यांचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवूनच काम करतो. ते चित्रपटसृष्टीतील माझे गुरू आहेत, असे विनितने सांगितले. विनितने दिलवाले, काल, क्रिश-३ आणि सिंघम रिटर्न या चित्रपटांतही उत्कृष्ट अभिनय केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Donald Trump: 'नोबेल मिळाला नाही, आता मी शांततेचा विचार करणार नाही'; ट्रम्प यांचं नॉर्वेला खळबळजनक पत्र, ग्रीनलँडवर ठोकला दावा!

Bicholim Mining Protest: पैरातील लोकांचा खाणीविरोधात पुन्हा एल्गार! साळगावकर खाणीचे कामकाज पाडले बंद; प्रलंबित मागण्यांसाठी ग्रामस्थ आक्रमक

Pakistani Actress Video: "भारतीय पुरुष पाकिस्तानी मुलींसाठी वेडे...", पाक अभिनेत्रीच्या दाव्याने सोशल मीडियावर वाद, व्हिडिओ VIRAL

Viral Post: "आता तरी गंभीर व्हा!" विजयाचा पत्ता नाही अन् पराभवांचे रेकॉर्ड्स; नेटकऱ्यांनी गौतम गंभीरला धरलं धारेवर

Goa Crime: मांद्रेत धक्कादायक प्रकार, 6 जणांच्या टोळक्याकडून वृद्ध पती-पत्नीसह मुलाला मारहाण; प्रॉपर्टीच्या वादातून राडा!

SCROLL FOR NEXT