vivek oberoi new movie 
मनोरंजन

'हा' बॉलिवूड अभिनेता बनणार 'कांतारा' फेम ऋषभ शेट्टीचा औरंगजेब! 2027 मधील सर्वात मोठ्या चित्रपटाची चर्चा

vivek oberoi as aurangzeb: चित्रपटाच्या निर्मात्यांकडून अधिकृत घोषणा होणे बाकी असले तरी, या बातमीने चित्रपट जगतात मोठी खळबळ उडवून दिली आहे

Akshata Chhatre

Vivek Oberoi as Aurangzeb in The Pride of Bharat: 'द प्राईड ऑफ भारत: छत्रपती शिवाजी महाराज' या भव्य चित्रपटाची कास्टिंग सध्या चर्चेत आहे. कन्नड अभिनेता ऋषभ शेट्टी छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारत असताना, आता बॉलिवूड अभिनेता विवेक ओबेरॉय या चित्रपटात क्रूर मुघल सम्राट औरंगजेबाच्या भूमिकेत दिसणार असल्याची माहिती समोर येत आहे. चित्रपटाच्या निर्मात्यांकडून अधिकृत घोषणा होणे बाकी असले तरी, या बातमीने चित्रपट जगतात मोठी खळबळ उडवून दिली आहे.

'शक्तीशाली' भूमिकांचा संगम

दिग्दर्शक संदीप सिंग दिग्दर्शित करत असलेल्या या ऐतिहासिक ड्रामामध्ये दोन ऐतिहासिक ताकदींचा मोठा संघर्ष पाहायला मिळणार आहे.

छत्रपती शिवाजी महाराज: ऋषभ शेट्टी

औरंगजेब: विवेक ओबेरॉय

जिजामाता: शेफाली शाह

विवेक ओबेरॉयची खलनायकी भूमिका साकारण्याची क्षमता त्याने यापूर्वी साउथ सिनेमातील 'विवेगम' (२०१७), 'लुसिफर' (२०१९) आणि 'कडुवा' (२०२२) यांसारख्या ब्लॉकबस्टर चित्रपटांमध्ये दाखवली आहे. त्यामुळे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेतील ऋषभ शेट्टीसमोर विवेकचा औरंगजेब किती दमदार ठरणार, याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे.

यापूर्वी विकी कौशलच्या छावा या चित्रपटात अक्षय खन्ना याने औरंगजेबाची भूमिका गाजवली आणि ती प्रेक्षकांना भावली सुद्धा होती, आता या आगामी चित्रपटातून विवेक ओबेरॉय स्वतःची वेगळी ओळख बनवू शकेल का? असा प्रश्न निर्माण झालाय.

भव्य निर्मिती आणि ग्लोबल रिलीज

'द प्राईड ऑफ भारत: छत्रपती शिवाजी महाराज' हा केवळ भारतातील नव्हे, तर जागतिक स्तरावरील एक भव्य निर्मिती असणार आहे. संदीप सिंग यांनी दिग्दर्शित आणि निर्मित केलेल्या या चित्रपटासाठी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक नामवंत तंत्रज्ञ एकत्र आले आहेत.

या चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांचे शौर्य, रणनीतीचे चातुर्य आणि स्वराज्याच्या स्थापनेमागील त्यांची निष्ठा प्रभावीपणे दाखवली जाईल. हा चित्रपट २१ जानेवारी २०२७ रोजी एकाच वेळी हिंदी, मराठी, कन्नड, तेलुगू, तमिळ, मल्याळम, बंगाली आणि इंग्रजी अशा अनेक भाषांमध्ये जगभरातील ४० हून अधिक देशांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

व्यस्त वेळापत्रक

विवेकसाठी ही भूमिका त्याच्या व्यस्त करिअरमधील आणखी एक महत्त्वाचा टप्पा आहे. तो लवकरच संदीप रेड्डी वंगाच्या 'स्पिरिट' आणि नितेश तिवारीच्या 'रामायण' या बहुचर्चित चित्रपटांमध्येही दिसणार आहे. ऋषभ शेट्टी सध्या त्याच्या 'कांतारा: चॅप्टर १' च्या यशामुळे उत्साहात आहे. या मोठ्या भूमिकेमुळे 'कांतारा' नंतर ऋषभची ख्याती आणखी वाढण्याची शक्यता आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

मतदार याद्यांच्या कामास नकार, 'AE'ला घेतले ताब्यात; सरकारी ड्युटीवरून नवा वाद!

IND vs AUS: टीम इंडियाचा डबल धमाका; मालिका विजयाच्या दिशेने कूच, सोबतच मोठा वर्ल्ड रेकॉर्ड; 'गोल्ड कोस्ट'वर कांगारुंना पाजलं पराभवाचं पाणी VIDEO

IND vs AUS: यॉर्कर किंगचा 'विराट' रेकॉर्ड! जसप्रीत बुमराह ठरला ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी20 मध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज; सईद अजमलचा मोडला विक्रम

IND vs AUS: चौथ्या टी-20 मध्ये 'सूर्या ब्रिगेड' सरस! भारताचा 48 धावांनी दणदणीत विजय; भारतीय गोलंदाजांच्या भेदक माऱ्यासमोर कांगारु गारद VIDEO

Goa Crime: भाडेकरुनेच केला मालकाचा आणि मित्राचा खून? दुहेरी हत्याकांडाने हादरले साळीगाव! पोलिसांकडून तपास सुरु

SCROLL FOR NEXT