Thalpathi Vijay's Leo Dainik Gomantak
मनोरंजन

"आम्हाला खोटं सांगायची गरज नाही" लिओचा निर्माते ललित कुमार ट्रोलर्सवर भडकले

गेल्या काही दिवसांपासून बॉक्स ऑफिसवर एका साऊथ चित्रपटाने चांगलीच कमाई केली आहे. हा चित्रपट आहे थलपती विजयचा लिओ...

Rahul sadolikar

Thalpathi Vijay's Leo : गेल्या काही दिवसांपासून बॉक्स ऑफिसवर सुपरस्टार थलपती विजयच्या लिओ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घातला आहे. अगदी कमी वेळात या चित्रपटाने कमाईच्या बाबतीत मोठमोठे उच्चांक रचले आहेत.

लिओची आकडे जाहीर होताच काही ट्रोलर्सनी हे आकडे खोटे असल्याचा प्रचार करताच आता लिओच्या निर्मात्यांनी त्यांना चांगलेच झापले आहे.

लिओचे निर्माते ललित कुमार

दक्षिणेतील प्रसिद्ध दिग्दर्शक लोकेश कनागराज सध्या त्याच्या 'लिओ' या चित्रपटासाठी चर्चेत आहेत, ज्यामध्ये दलपती विजय मुख्य भूमिकेत दिसत आहेत. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. 

एवढेच नाही तर बॉक्स ऑफिसवरही या चित्रपटाने चांगली कमाई केली आहे. आता अलीकडेच, लिओचे निर्माते एसएस ललित कुमार यांनी बनावट बॉक्स ऑफिस कलेक्शन आणि प्रॉक्सी बुकिंगच्या वादांवर मौन सोडले आहे.

निर्मात्याचे सडेतोड उत्तर

थलपती विजयचा 'लिओ' हा या वर्षातील बहुप्रतिक्षित चित्रपटांपैकी एक आहे. लोकेश कनागराज दिग्दर्शित या चित्रपटात त्रिशा, संजय दत्त, अर्जुन सर्जा, गौतम वासुदेव मेनन, मायस्किन, मॅथ्यू थॉमस, प्रिया आनंद आणि इतर अनेक कलाकार आहेत.

 हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे. त्याचबरोबर काही लोक लिओच्या कलेक्शनला फेक म्हणत आहेत. आता चित्रपट निर्माते एसएस ललित कुमार यांनी ट्रोल्सना सडेतोड उत्तर दिले आहे.

नेमकं खरं काय?

काही दिवसांपूर्वी, जगभरातील बॉक्स ऑफिस कलेक्शनसाठी अधिकृत पोस्टर्स रिलीज करण्यात आले होते आणि त्यावर नमूद केलेले नंबर बहुतेक बॉक्स ऑफिस ट्रॅकर्सद्वारे शेअर केलेल्या संख्येपेक्षा किंचित कमी होते. कलेक्शन मॅनिप्युलेशनचे दावे पूर्णपणे फेटाळले गेल्याने निर्मात्यांनी या गोष्टीचे कौतुक केले.

निर्मात्यांवर आरोप काय?

बनावट कलेक्शनच्या आरोपाव्यतिरिक्त, काही लोकांनी लिओच्या प्रोड्युसरवर परदेशात प्रॉक्सी बुकिंग केल्याचा आरोप देखील केला आहे. आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर या चित्रपटाला उदंड प्रतिसाद मिळत असून ट्रोल्सच्या पचनी पडत नाही. 

या सर्व आरोपांवर निर्माते एसएस ललित कुमार यांनी नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत मौन सोडले आहे.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT