Melbourne Film Festival ':जगभरातल्या चित्रपट रसिकांसाठी आकर्षणाचा असणाऱ्या मेलबर्न फिल्म फेस्टिव्हलचे बिगूल वाजले असुन 'घूमर' या आर बाल्कि दिग्दर्शित या चित्रपटाने या महोत्सवाची सुरुवात होणार आहे.
अभिनेता अभिषेक बच्चन आणि सैयामी खेर अभिनीत चित्रपट निर्माता आर बाल्की दिग्दर्शित "घूमर", 12 ऑगस्ट 2023 रोजी इंडियन फिल्म फेस्टिव्हल ऑफ मेलबर्न (IFFM) मध्ये प्रदर्शित होणार आहे. मेलबर्नच्या भारतीय चित्रपट महोत्सवात 'घूमर' या चित्रपटाची निवड झाली आहे.
आर बाल्की यांचा बहुप्रतिक्षित चित्रपट 'घूमर' प्रेक्षकांना भुरळ घालण्यासाठी सज्ज झाला असून लवकरच प्रतिष्ठित 14 व्या भारतीय चित्रपट महोत्सव ऑफ मेलबर्न (IFFM) मध्ये चित्रपट प्रदर्शित होणार आहे.
निर्मात्यांच्या मते, हा चित्रपट 'एक पक्षाघाती खेळाडू (खेर) च्या विजयाची कहाणी सांगतो जो आपल्या प्रशिक्षकाच्या (बच्चन) मार्गदर्शनाखाली क्रिकेटपटू म्हणून उत्कृष्ट कामगिरी करतो.' 'चीनी कम' आणि 'की एंड का'साठी प्रसिद्ध असलेल्या बाल्की यांनी राहुल सेनगुप्ता आणि ऋषी विरमानी यांच्यासोबत चित्रपटाची कथा लिहिली आहे.
आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर भारतीय चित्रपटाचा उत्सव साजरा करण्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या या महोत्सवात यापुर्वी 'एमएस धोनी: द अनटोल्ड स्टोरी', 'नीरजा', 'कपूर अँड सन्स', 'दंगल', ‘ बाहुबली‘ यांसारख्या ब्लॉकबस्टर चित्रपट प्रदर्शित झाले आहेत.
दिग्दर्शक आर बाल्की म्हणतात " घूमर हा IFFM मधील ओपनिंग चित्रपट असेल ही आमच्यासाठी खरोखरच सन्मानाची आणि आनंदाची गोष्ट आहे. घूमर हा खेळावर आधारित चित्रपट असणार आहे."
एक दिग्गज फिल्ममेकर म्हणून बाल्की सध्या चर्चेत आहेत. दिग्दर्शक बाल्की यांच्याबद्दल बोलायचं झालं तर, त्यांनी भारतीय चित्रपट उद्योगात स्वतः च अनोखं स्थान निर्माण केलं आहे. याचे चित्रपट अनेकदा अपारंपरिक विषयांचा शोध घेतात आणि बौद्धिक आणि भावनिक अशा दोन्ही पातळ्यांवर प्रेक्षकांना प्रभावित करतात.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.