Vijay's Leo Dainik Gomantak
मनोरंजन

Vijay's Leo : सुपरस्टार विजयच्या 'लिओ'चं युकेमध्ये जबरदस्त ॲडव्हान्स बुकींग...बॉक्स ऑफिसवर चित्रपट मारणार मोठी मुसंडी

Rahul sadolikar

Thalpathy Vijay Leo Advance Booking : साऊथचा सुपरस्टार थलपती विजयच्या आगामी चित्रपट लिओ सध्या चर्चेत आहे. रिलीजआधीच चित्रपटाने आपला जलवा दाखवायला सुरूवात केली आहे.

लिओने रिलीजआधीच अॅडव्हान्स बूकींगमध्ये चांगलीच मुसंडी मारली आहे. जगभरातल्या बॉक्स ऑफिसचा विचार करता लिओने युकेमध्ये सर्वात जास्त कमाई केली आहे.

19 ऑक्टोबरला लिओ जगभरात होईल प्रदर्शित

सुपरस्टार थलपती विजयच्या बहुचर्चित लिओमध्ये त्रिशा आणि संजय दत्त यांच्याही भूमिका आहेत. या चित्रपटासाठी जवान फेम अनिरुद्ध रविचंदरचे संगीत दिले आहे. 19 ऑक्टोबर रोजी लिओ जगभरात प्रदर्शित होणार आहे.

ॲडव्हान्स बुकींग

लिओचं आगाऊ तिकिट बुकिंग पाहता या चित्रपटाला यूकेमध्ये जबरदस्त ओपनिंग मिळण्याची अपेक्षा आहे. 

विशेष म्हणजे लिओने अॅडव्हान्स बुकींगमध्ये मणिरत्नमच्या पोन्नियिन सेल्वन I चा विक्रम मोडला काढला आहे. 

2021 च्या ब्लॉकबस्टर मास्टर नंतर विजय आणि चित्रपट निर्माते लोकेश कनागराज यांचे पुनर्मिलन हा चित्रपट चिन्हांकित करतो

पोन्नियन सेल्वनचा विक्रम मोडला

चित्रपटाच्या अ‍ॅडव्हान्स बुकिंग नंबर्सवरील नवीनतम अपडेट शेअर करताना, चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी शनिवारी ट्विट केले, “विजय: 'लिओ' नवीन बेंचमार्क सेट करत आहे...

तरण आदर्श यांनी लिहिले #ThalapathyVijay चा #Leo #Overseas #विक्रम मोडत आहे. #UK आणि #Europe मध्ये #AhimsaEntertainment द्वारे वितरीत केले गेले, 19 दिवस बाकी आहेत.

या चित्रपटाने यापूर्वीच्या #PS1 ला UK मधल्या कमाईच्या बाबतीत मागे टाकले आहे.  #Leo ला आता पठानचा विक्रम मोडायचा आहे."

त्रिशा कृष्णन आणि विजय

लिओ हिंदी, तेलुगू, मल्याळम आणि कन्नड भाषेतही रिलीज होणार आहे. त्रिशा कृष्णनने यापूर्वी विजयसोबत तामिळ हिट्स गिल्ली, कुरुवी, थिरुपाची आणि आथीमध्ये काम केले आहे. आता त्रिशा लिओमध्ये विजयसोबत दिसणार आहे.

संजय दत्तही लिओमध्ये दिसणार

संजय दत्त लिओ या चित्रपटातून तमिळ चित्रपटात पदार्पण करणार आहे. यात अर्जुन सर्जा, मन्सूर अली खान, प्रिया आनंद, मायस्किन आणि गौतम वासुदेव मेनन यांच्याही भूमिका आहेत. 

विजयच्या कठ्ठी, मास्टर आणि बीस्ट या हिट चित्रपटांना संगीत देणारे अनिरुद्ध रविचंदरनेच लिओसाठी संगीत दिले आहे.

Subhash Velingkar: सुभाष वेलिंगकरांची अटक अटळ? कोर्टाचा दिलासा नाही, जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

BKC ते आरे JVLR पंतप्रधान मोदींचा मेट्रोने प्रवास; शाळकरी विद्यार्थी, महिलांशी साधला संवाद पाहा Video

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

गिरीत बंदिस्त खोलीत आढळला मृतदेह , संशयास्पद मृत्यूचा कुटुंबियांचा अंदाज; गोव्यातील ठळक बातम्या

SCROLL FOR NEXT