South actor Thalapathy Vijay Dainik Gomantak
मनोरंजन

Thalapathy Vijay on Instagram: इन्स्टाग्रामवर येताच थलपती विजयचा जलवा, पहिली पोस्ट टाकताच...

अभिनेता थलपती विजयची चाहत्यांमध्ये खूपच क्रेझ आहे, विजयने एक पोस्ट टाकताच त्याचे चाहते वेडे झाले आहेत

Rahul sadolikar

South Actor Thalapathy Vijay on Instagram: तमिळ सुपरस्टार थलपती विजयचे चाहते फक्त दक्षिणेतच नाहीत तर देशभरात त्याच्या अभिनयाची क्रेझ आहे. आणि आता हे पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे. तमिळ चित्रपट स्टार थलपथी विजय आतापर्यंत फोटो शेअरिंग अॅप इंस्टाग्रामपासून दूर होता. 

आता विजयने इन्स्टाग्रामवरही डेब्यू केला आहे. आणि ही एन्ट्री काय धमाकेदार झाली आहे. थलपथी विजयने 3 एप्रिल रोजी इन्स्टाग्रामवर आपले अकाऊंट तयार करण्यासाठी पोस्ट केली आणि त्यामुळे खळबळ उडाली.

 थलपती विजयच्या या पोस्टला काही तासांतच चार लाखांहून अधिक लाईक्स आणि साडेचार लाखांहून अधिक कमेंट्स मिळाल्या. 

ही बातमी लिहिपर्यंत थलपथी विजयचे इंस्टाग्रामवर ४ मिलियन फॉलोअर्स झाले आहेत. इतकंच नाही तर थलपथी विजय इंस्टाग्रामवर येताच अभिनेत्री रश्मिका मंदनाने लगेचच त्याला फॉलो करायला सुरुवात केली.

थलपथी विजयने अभिनेता विजयच्या नावाने त्याचे इंस्टाग्राम खाते तयार केले आणि त्यावर 'लिओ' चित्रपटाच्या सेटवरील स्वतःचा एक फोटो शेअर केला. फोटोमध्ये थलपथी विजय 'सॉल्ट अँड पेपर' लूकमध्ये दिसत आहे आणि तो खूपच सुंदर दिसत आहे.

थलपथी विजयने हा फोटो शेअर करत 'हॅलो नानबाज आणि ननबीज' असा संदेश चाहत्यांना लिहिला.

असे सांगितले जात आहे की इंस्टाग्रामवर आल्यानंतर 99 मिनिटांच्या आत थलपथी विजयचे 10 लाखांहून अधिक फॉलोअर्स होते, जे आतापर्यंत भारतात कोणत्याही सेलिब्रिटीच्या इंस्टाग्राम हँडलवर झाले नाही. हा स्वतःच एक विक्रम आहे.

थलपथी विजयची ही पोस्ट पाहिल्यानंतर चाहत्यांकडून कमेंट्स आणि प्रतिक्रियांचा पूर आला. थलपथी विजयच्या इंस्टाग्राम पदार्पणाबद्दल सर्वांनी अभिनेत्याचे केवळ अभिनंदनच केले नाही तर त्याचे हार्दिक स्वागतही केले. थलपथी विजयची ही पोस्ट काही मिनिटांतच सोशल मीडियावर व्हायरल झाली. 

थलपथी विजय हे अनेक दिवसांपासून ट्विटर आणि फेसबुकवर असल्याची माहिती आहे, मात्र तो इन्स्टाग्रामपासून दूर होता. पण आता तो इंस्टाग्रामवरही चाहत्यांशी कनेक्ट होऊ शकतो. येथे आता चाहत्यांना अभिनेत्याच्या वैयक्तिक आयुष्यापासून ते चित्रपटांपर्यंतचे सर्व अपडेट्स मिळतील.

साऊथच्या सगळ्याच स्टार्सचं त्यांच्या फॅन्ससोबत एक चांगलं बाँडिंग आहे. आपल्या चाहत्यांनाही हे स्टार्स तितकाच आदर देतात जितका ते फॅन्स आपल्या स्टारला देतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kalidasa Pride Story: महाकवी कालिदासाचा गर्व उतरला, आजच्या साहित्यिकांचा कधी? पुरस्कार, सत्कार अन् अहंकारावर परखड भाष्य

PM Kisan 24th Installment: दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट? पीएम किसानचा 24वा हप्ता 'या' दिवशी जमा होणार; पाहा काय आहे अपडेट

VIDEO: समुद्रात तरंगू लागले आयफोन अन् लक्झरी परफ्यूमचे बॉक्सेस! होर्मुझ सामुद्रधुनीत भीषण अपघात; जहाजावरील 21 जणांचा जीव थोडक्यात वाचला

DA Hike: कॅबिनेट बैठकीत DA बाबत मौन! केंद्रीय कर्मचाऱ्यांना आता दिवाळीची प्रतीक्षा; महागाई भत्त्यावर अजूनही सस्पेन्स कायम

Pakistan School Tragedy: निष्पाप चिमुकल्यांचा टाहो! पाकिस्तानात शाळेचे छत कोसळून 20 हून अधिक मुलांचा मृत्यू; हॉस्पिटलबाहेर पालकांचा हंबरडा

SCROLL FOR NEXT