Taapsee Pannu Upcoming Movie Dainik Gomantak
मनोरंजन

Taapsee Pannu Upcoming Movie: तापसी पन्नूच्या 'ब्लर' या सायकॉलिजकल थ्रिलर चित्रपटाचा टीझर रीलीज

दृष्टी कमी होणाऱ्या महिलेच्या भुमिकेत तापसी; स्पॅनिश चित्रपटाचा आहे रीमेक

Akshay Nirmale

Taapsee Pannu's Upcoming Movie Blurr Teaser Out: बॉलीवूड अभिनेत्री तापसी पन्नू हिच्या आगामी 'ब्लर' या चित्रपटाचा अंगावर काटा आणणारा टीझर रीलीज झाला आहे. 'ब्लर' हा एक सायकॉलॉजिकल थ्रिलर चित्रपट असणार आहे. यात एक मर्डर मिस्ट्री पाहायला मिळणार आहे. हा चित्रपट येत्या 9 डिसेंबर रोजी झी 5 या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रीलीज होणार आहे. या चित्रपटात तापसीसह गुलशन देवैया हा देखील मुख्य भूमिकेत आहे.

या वर्षी तापसीचे दोन चित्रपट रीलीज झाले होते. एक म्हणजे महिला क्रिकेटपटू मिताली राज हिचा बायोपिक असलेला 'शब्बाश मिट्ठू' आणि टाईम ट्रॅव्हल संकल्पनेचा वापर असलेला 'दोबारा'. तथापि, हे दोन्ही चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरफ्लॉप ठरले. त्यामुळे आता 'ब्लर'कडून तापसीला खूप आशा असणार आहेत. काही दिवसांपुर्वीच या चित्रपटाचे मोशन पोस्टर रीलीज करण्यात आले होते.

टीझरलमध्ये पाहायला मिळते की, तापसीच्या कॅरेक्टरचे नाव गायत्री असे आहे. तिला स्पष्ट काहीही दिसत नाहीय. जे काही दिसते आहे ते अंधुक, अस्पष्ट दिसते आहे. पण, घरात कुणीतरी आहे, याची तीला जाणीव झाली आहे. ती तसे विचारतेही, पण तिला काहीच उत्तर मिळत नाही. ती ओरडून विचारते तरीहीत तिला उत्तर मिळत नाही.

इन्स्टाग्रामवर हा टीझर शेअर करत तापसीने लिहिले आहे की, संकटाची चाहूल चहुबाजूंनी येते आहे, पण गायत्रीला ते संकट दिसेल का? तिच्या डोळ्यांनी तिचे जग पाहायला तयार राहा..

या चित्रपटात तापसीचे कॅरेक्टर हे तिच्या जुळ्या बहिणीच्या मृत्यूचा तपास करताना पाहायला मिळणार आहे. पण, हे करत असताना तिला हळहळू स्वतःची दृष्टी गमवावी लागत आहे. तापसी या चित्रपटाची निर्मातीदेखील आहे. स्पॅनिश चित्रपट 'ज्युलियाज आईज' या चित्रपटाचा हा हिंदी रीमेक आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

Viral Post: 'मला नवरा हवाय, पण माझ्या अटींवर...' तरूणीने 'Google Form'वरून घेतली मुलांची परीक्षा! 240 हून अधिक पोरांनी दाखवला इंटरेस्ट, प्रश्न वाचून व्हाल थक्क

SCROLL FOR NEXT