Swara Bhasker Viral Photo Dainik Gomantak
मनोरंजन

Swara Bhasker Viral Photo : प्रेग्नंसीच्या त्या अफवा नव्हत्या, स्वराने स्वत:च शेअर केले फोटो

अभिनेत्री स्वरा भास्करच्या प्रेग्नंसीच्या बातम्या काही दिवसांपुर्वी आल्या होत्या ;पण आता स्वत: स्वरानेच काही फोटो शेअर केले आहेत

Rahul sadolikar

सोशल मिडीयावर सतत चर्चेत असणाऱ्या अभिनेत्रींमध्ये स्वरा भास्करचं नाव सर्वात आधी घ्यायला हवं. आपल्या बिनधास्त मतांनी स्वरा नेहमीच चर्चेत असते. काही दिवसांपुर्वी लग्नासाठी आणि त्यानंतर प्रेग्नंसीच्या बातम्यांमुळे स्वरा चर्चेत होती. स्वराच्या प्रेग्नंसीच्या बातम्या म्हणजे अफवा आहेत असंही सांगितलं जात होतं पण आता स्वरानेच फोटो शेअर करत ही बातमी खरी असल्याचं अप्रत्यक्ष सांगितलं आहे.

अभिनेत्री स्वरा भास्करने लग्नाच्या सुमारे साडेतीन महिन्यांनंतर चाहत्यांना मोठी खुशखबर दिली आहे. स्वतःचे आणि पती फहाद अहमदचे काही खास फोटो ट्विटरवर शेअर करताना स्वराने सांगितले की, ती लवकरच आई होणार आहे. फोटोंमध्ये स्वराचा बेबी बंपही दिसत आहे.

स्वराच्या प्रेग्नंसीची ती बातमी

एक स्क्रीनशॉट सोशल मीडियावर व्हायरल झाला. एका न्यूज पोर्टलने ही बातमी दिली होती  ज्यामध्ये असे सांगण्यात आले होते की, 'बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर प्रेग्नंट झाली, पती फवाद अहमदने स्वतः याची पुष्टी केली आहे. अभिनेत्रीची प्रसूती जुलै महिन्यात होऊ शकते. या नायिकेने फेब्रुवारीमध्येच ८ वर्षांनी लहान फवादशी लग्न केले

स्वरा एक्सायटेड

स्वराने शेअर केलेल्या या फोटोंवर विश्वास ठेवला तर तिच्या प्रेग्नंसीची बातमी खरीच होती असं म्हणावं लागेल. शेअर केलेल्या फोटोत स्वरा एक्सायटेड असल्याचं म्हणतेय. साहजिकच ती आपल्या येणाऱ्या बाळासाठी उत्सुक असल्याचा अंदाज बांधला जाऊ शकतो.

ते ट्वीट खोटं होतं?

आता ज्या पोर्टलच्या नावाने ही फेक न्यूज चालवली जात होती, त्याच वृत्तवाहिनीने ट्विटरवर अधिकृत पोस्ट केली आहे. त्यांनी हे वृत्त खोटे आणि मूर्खपणाचे असल्याचे स्पष्ट केले. अधिकृत न्यूज पोर्टलने ट्विट केले की, 'अभिनेत्री स्वरा भास्करशी संबंधित हे बनावट ट्विट न्यूज 24 च्या नावाने सोशल मीडियावर शेअर केले जात आहे, जे पूर्णपणे बनावट आहे. आम्ही असे कोणतेही ट्विट केलेले नाही. न्यूज पोर्टलने हे ट्विट केले कारण स्वरा भास्करकडून या संदर्भात कोणतीही अपडेट आली नव्हती.

लग्नामुळे स्वरा ट्रोल झाली होती

स्वरा या वर्षाच्या सुरुवातीला 6 जानेवारीलाच विवाहबद्ध झाली होती. काही दिवसांपूर्वी स्वराने स्वतःचा आणि फहादचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता, पण या फोटोत दोघांचेही चेहरे दिसत नव्हते.

स्वराने जानेवारीत झालेल्या लग्नाची घोषणा केली होती. 16 फेब्रुवारीला स्वराने लग्न केल्याचं जाहीर केलं. समाजवादी पक्षाचे नेते फहाद अहमद यांच्याशी आंतरधर्मीय विवाह केल्याने स्वराला काही यूजर्सनी ट्रोलही केलं होतं. बिनधास्त स्वराने ट्रोलर्सना आपल्या नेहमीच्या तिखट शब्दात उत्तरही दिले होते. स्वरा सुरूवातीपासूनच बिनधास्त विचारांसाठी प्रसिद्ध आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ashadhi Ekadashi: ..जातां पंढरीसी सुख वाटे जीवा। गोव्यातील लाखो वारकऱ्यांनी गाठले पंढरपूर

Sanguem Rathotsav: विठ्ठल, विठ्ठल! सांगेत भाविकांचा पूर, रथोत्सवानिमित्त होणार विठूनामाचा गजर

Goa Live News Updates: ऑनलाईन फ्रॉडमधून ३ लाख ३५ हजार रुपयांचा गंडा

Goa Crime: अनैतिक संबंधातून पतीचा खुन! संशयितेला व्‍हिडिओ कॉन्‍फरन्‍सिंगमध्‍ये आणण्यात अपयश; कोलवाळ तुरुंग अधीक्षकाला नोटीस

Criminals In Goa: पोलिसांवर हल्ला, अनेकदा फरार! दिल्लीतील ‘गोगी टोळी’च्या गुंडास गोव्यात अटक; गुन्हेगारांसाठी बनतेय ‘आश्रयस्थान’?

SCROLL FOR NEXT