Swara Bhasker Dainik Gomantak
मनोरंजन

Swara Bhasker : मेरे घर आयी एक नन्ही परी...स्वरा भास्कर झाली आई

अभिनेत्री स्वरा भास्करने आपल्या लाडक्या लेकीचं स्वागत केलं आहे. चला पाहुया सविस्तर रिपोर्ट...

Rahul sadolikar

Swara Bhasker's newborn Baby Photos: गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री स्वरा भास्कर सोशल मिडीयावर चांगलीच चर्चेत होती. लग्नाच्या दिवसापासून स्वरा कित्येकदा धार्मिक कट्टरतावाद्यांचं लक्ष बनली.

स्वराने सुरुवातीला शेअर केलेल्या फोटोनंतरही ती गरोदर आहे की नाही याबद्दलही नेटीजन्समध्ये बऱ्याच चर्चा झाल्या.

आता मात्र स्वराने चाहत्यांना खुशखबर दिली आहे. नुकतंच स्वराने आणि पती फहादने गोंडस बाळाचं स्वागत केलं आहे. स्वराने सोशल मिडीयावर स्वत:च ही गोड बातमी दिली आहे.

स्वराने शेअर केले फोटो

स्वरा भास्कर नुकतीच एका मुलीची आई बनली आहे. स्वराने तिच्या इन्स्टाग्रामवर तिच्या बाळासोबतचे काही फोटो शेअर करून चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली आहे. या फोटोंसोबत स्वराने एक गोड संदेशही लिहिला आहे. 

आपल्या पोस्टमध्ये फोटोंसोबत स्वराने कॅप्शनमध्ये लिहिले," एक प्रार्थना ऐकली, आशीर्वाद देण्यात आला, एक गाणे कुजबुजले, एक रहस्यमय सत्य. आमची मुलगी राबिया हिचा जन्म 23 सप्टेंबर 2023 रोजी झाला. कृतज्ञ आणि आनंदी अंतःकरणाने, तुमच्या प्रेमाबद्दल धन्यवाद. हे संपूर्ण नवीन जग आहे".

मुलीचं नाव ठेवलं राबिया

या पोस्टमध्ये स्वराने सांगितले आहे की तिने तिच्या मुलीचे नाव राबिया ठेवले आहे, परंतु अद्याप तिचा चेहरा दाखवलेला नाही.

फोटोंंमध्ये स्वराने (Swara Bhasker's baby photos) तिच्या मुलीला तिच्या मांडीवर घेऊन खूप आनंदी दिसत आहे. स्वरासोबत तिचा पती फहाद अहमद देखील दिसत आहे.  

स्वरा - फहादची लव्हस्टोरी

स्वरा भास्कर आणि फहाद अहमद 2023 च्या मार्चमध्ये एकमेकांचे जीवनसाथी बनले. सुरुवातीला स्वरा- फहादने कोर्ट मॅरेज केले होते, त्यानंतर त्यांचे फोटो सोशल मीडियावर बरेच दिवस व्हायरल होत होते. दोघे 2020 पासुन रिलेशनशीप मध्ये होते. 

स्वराने एका रॅलीला क्रांतिकारी शैलीत संबोधित केलं होतं. या रॅलीत फहाद अहमदही उपस्थित होता. साहजिकच दोन समविचारी तरुण प्रेमात पडायला फारसा वेळ लागला नाही.

भेटीगाठी सुरू

यानंतर ते काही रॅलींमध्येही सोबत आले आणि मार्च 2020 मध्येच फहादने स्वराला त्याच्या बहिणीच्या लग्नाचे निमंत्रण दिले होते, परंतु अभिनेत्री लग्नाला आली नव्हती. 

यानंतर स्वराने त्याची माफी मागितल्याची बातमी व्हायरल झाली होती. यादरम्यान दोघांची मैत्री आणखी घट्ट झाली आणि मग दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले. आता या दोघांचं जग आणखी विस्तारलं आहे. राबियाच्या जन्माने दोघेही खूप आनंदी आहेत.

TVS Orbiter: टीव्हीएस करणार मोठा धमाका! ओला-चेतकला तगडी टक्कर देण्यासाठी येतेय 'ऑर्बिटर' VIDEO

Goa Police: खून प्रकरणातील आरोपी, कुख्यात गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या सहकाऱ्याला गोवा पोलिसांनी कशी अटक केली?

US Mass Shooting: अमेरिकेत कॅथलिक शाळेवर गोळीबार; लहान मुले, शिक्षक अडकले, शूटरला अटक

Asia Cup 2025: यूएईमध्ये भारताची कामगिरी कशी? पाकिस्तानविरुद्ध लाजिरवाणा रेकॉर्ड, तरीही टीम इंडिया विजेतेपदाची दावेदार

Viral Video: डॉगेश भाई से पंगा नहीं… ! जंगलाच्या राणीला दिली जबरदस्त टक्कर; सोशल मीडियावर व्हिडिओ तूफान व्हायरल

SCROLL FOR NEXT