Gayatri Joshi Dainik Gomantak
मनोरंजन

स्वदेस फेम अभिनेत्री 'गायत्री जोशी'चा इटलीत अपघात..भीषण दृष्यांचा व्हिडीओ व्हायरल

स्वदेस चित्रपटात मुख्य अभिनेत्री म्हणून शाहरुख खानसोबत स्क्रीन शेअर करणाऱ्या अभिनेत्री गायत्री जोशीचा इटलीत अपघात झाला आहे.

Rahul sadolikar

Actress Gaytri Joshi Accident News : मनोरंजन विश्वातून नुकतीच एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. शाहरुख खानच्य गाजलेल्या स्वदेस चित्रपटात शिक्षिकेच्या भूमीकेत दिसलेल्या अभिनेत्री गायत्री जोशीचा एका मोठा कार अपघात झाला आहे. 

'स्वदेस' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या गायत्री जोशीच्या कार अपघाताचा लाइव्ह व्हिडिओही समोर आला आहे, ज्यामध्ये मिनी ट्रक कोसळलेला दिसत आहे. मिळालेल्या माहितीनुसार या भीषण अपघातात एका जोडप्याला आपला जीव गमवावा लागला आहे.

गायत्रीसोबत पतीही

नवभारत टाईम्सच्या वृत्तानुसार बॉलिवूड अभिनेत्री गायत्री जोशीच्या कारला इटलीमध्ये अपघात झाला. गायत्री पती विकास ओबेरॉयसोबत लॅम्बोर्गिनी कारमधून प्रवास करत होती. रिपोर्ट्सनुसार, हा हृदयद्रावक अपघात इटलीच्या सार्डिनिया भागात घडला, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावरही पाहायला मिळाला आहे.

अपघाताचा व्हिडीओ

ही घटना घडली तेव्हा मागून येणाऱ्या कारमधून व्हिडिओ शूट करण्यात येत होता. या व्हिडिओमध्ये समोरून जाणाऱ्या मिनी ट्रकच्या मागे एकामागून एक आलिशान कार वेगाने जाताना दिसत आहे. 

गायत्रीही तिच्या पतीसोबत लॅम्बोर्गिनीमध्ये जात होती आणि त्यांच्या मागे काही आलिशान गाड्या एकमेकांमागुन एक जाताना दिसतायत.

अपघातात जोडप्याचा मृत्यू

अचानक, ओव्हरटेक करताना, गायत्रीची लॅम्बोर्गिनी कार फेरारीला धडकते आणि फेरारी ट्रकला धडकल्यामुळे ट्रक रस्त्यावर पलटी झाला. यानंतर फेरारी कारलाही आग लागली, त्यामुळे त्या कारमध्ये बसलेल्या स्विस जोडप्याचा जागीच मृत्यू झाला.

Ranji Trophy 2024: मोहितचा 'पंजा' अन् फलंदाजांचा जलवा, गोव्यानं उडवला मिझोरामचा धुव्वा; नोंदवला सलग चौथा विजय!

Goa Live Updates: एंटर एअरचे पहिले चार्टर गोव्यात दाखल!

Rajbagh Beach: राजबाग किनाऱ्याने घेतला 'मोकळा श्वास'! पर्यटन खात्याकडून सात बेकायदेशीर बांधकामे उद्ध्वस्त

Goa Onion Rates: कांद्याने आणले डोळ्यात पाणी! नासाडीमुळे दोन दिवसात दरांमध्ये तब्बल २० रुपयांनी वाढ, जाणून घ्या सध्याचा भाव

Margao News: स्वच्छतेसंदर्भात मडगाव पालिकेचा महत्त्वाचा निर्णय; या कारणासाठी नागरिक, पर्यटकांकडून वसूल केला जाईल दंड

SCROLL FOR NEXT