Facebook/@SushantSinghRajput
मनोरंजन

सुशांत सिंह राजपुतचे Facebook Account पुन्हा अ‍ॅक्टिव

सुशांतच्या मृत्यूनंतरही लोक त्याला सोशल मिडियावर (Social Media) फॉलो करतात.

दैनिक गोमन्तक

आजसुद्धा लोक बॉलीवुडमधील दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) याच्या आकस्मित निधनाला विसरू शकले नाहीत. त्याच्या जाण्याला एक वर्षापेक्षा जास्त काळ लोटला गेला तरी तो अजूनही लोकांच्या आठवणीमध्ये आहे. सुशांतच्या मृत्यूनंतरही लोक त्याला सोशल मिडियावर (Social Media) फॉलो करतात. तसेच अनेकदा त्याच्या जुन्या पोस्ट पाहून भावुकसुद्धा होतात. नुकतेच सुशांतचे फेसबुक अकाऊंट (facebook Account) एका वर्षांनंतर सक्रिय (Active) झाल्याने लोक आश्चर्यचकित झाले आहेत.

Sushant Singh Rajput

सुशांत सिंह राजपुतच्या (Sushant Singh Rajput) निधनाला एक वर्षापेक्षा अधिक काळ उलटून गेला आहे. नुकतेच या दिवंगत अभिनेत्याचे फेसबुक अकाऊंट अचानक सक्रिय झाल्याने त्याच्या चाहत्यांमध्ये गोंधळ निर्माण झाला आहे. सुशांत सिंह राजपुतच्या फेसबुक प्रोफाईलचा फोटो (Facebook Profile ) बदलण्यात आल्याचे पाहून त्याचे चाहते पुन्हा भावुक झाले आहेत आणि त्यांनी सोशल मीडियावर (Social Media) श्रद्धांजली वाहण्यास सुरुवात केली आहे.

सुशांत सिंह राजपुत 14 जून 2020 रोजी त्याच्या वांद्रे फ्लॅटमध्ये मृतावस्थेत आढळला होता. सुरुवातीच्या तपासात पोलिसांनी याला आत्महत्या म्हटले होते, तर रियाचा दावा आहे की सुशांत डिप्रेशनमध्ये होता. तर दुसरीकडे, सुशांतचे कुटुंब आणि चाहते म्हणतात की सुशांतची हत्या झाली आहे. सध्या या प्रकरणात तपास सीबीआय करत आहे. गेल्या एका वर्षांपासून त्याचे चाहते सुशांतला न्याय देण्याची मागणी करत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Bike Stunt Video: काळजाचं पाणी करणारा थरारक स्टंट! पठ्ठ्याचा डोकं चक्रावणारा व्हिडिओ व्हायरल; जीवाची लावली बाजी

Shani Gochar 2026: शनिदेव देणार 5 राशींना श्रीमंतीचं वरदान! हाती लागणार कुबेराचा खजिना; करिअरला मिळणार नवा बूस्ट

Colvale Jail Employee Stress: अभद्र युतीमुळे प्रामाणिक कर्मचाऱ्यांचा गुदमरतोय जीव! सुधारगृह गुन्हेगारांचा अड्डा; मानसिक आरोग्य कक्ष व छळविरोधी समित्यांची तातडीची मागणी

Crime News: आधी विषारी कोल्ड्रिंक पाजले, मग गळा आवळून केला खून! 20 वर्षांच्या संसारानंतर बायकोनेच नवऱ्याचा काढला काटा; कारण ऐकून व्हाल अवाक

Jitesh Kamat Colvale Jai: कोलवाळ मध्यवर्ती कारागृहाची सद्यस्थिती पाहता, 'गुन्हेगारांना आलिशान सुविधा पुरवणारे हॉलिडे होम' - जितेश कामत

SCROLL FOR NEXT