निसर्गाचा एकटेपणा टिपणारा ‘सुनपट’  Dainik Gomantak
मनोरंजन

निसर्गाचा एकटेपणा टिपणारा ‘सुनपट’

उत्सव किंवा जत्रा संपल्यावर रिकाम्या मैदानाकडे (Ground) पाहून जी पोकळी जाणवते, ती म्हणजेच ‘सुनपट’.

दैनिक गोमन्तक

पणजी: आसपासचे लोक जेव्हा आपल्याला सोडून दूर जातात तेव्हा केवळ आपल्यालाच नव्हे, तर आणि निसर्ग आणि डोंगरदऱ्यांनाही जो एकटेपणा वाटतो, त्यालाच ‘सुनपट’ (Sunpat) असे म्हणतात. उत्सव किंवा जत्रा संपल्यावर रिकाम्या मैदानाकडे (Ground) पाहून जी पोकळी जाणवते, ती म्हणजेच ‘सुनपट’.

उत्तराखंडातील (Uttarakhand) गावागावांतून माणसं जेव्हा नोकरीच्या (Job) शोधात शहरांमध्ये स्थलांतरीत झाली , तेव्हा त्या गावांत हाच एकटेपणा आणि पोकळी जाणवू लागली, याचेच चित्रण दिग्दर्शक राहुल रावत (Director Rahul Rawat) यांनी आपल्या गढवाली चित्रपट ‘सुनपट’ (Sunpat) मध्ये केले आहे.

उत्तराखंडातील गावांमध्ये पुरेशा रोजगाराच्या संधी नसल्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून माणसे गावे सोडून शहरांकडे धावत आहेत. याच्या मागे अनेक सामाजिक, आर्थिक कारणे असतात. मोठ्या प्रमाणावर झालेल्या अशा स्थलांतरामुळे तिथली सुमारे 1500 गावे ओसाड पडली आहेत, तर चार हजार गावांमधून हाताच्या बोटांवर मोजता येण्याएवढीच माणसे शिल्लक उरली आहेत. यामुळे तिथली संस्कृती (Culture) , परंपरा (Tradition) आणि समाज आता नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. माझ्या राज्यात स्थलांतरामुळे काय अनर्थ होत आहे, हे या गोष्टीच्या माध्यमातून मला सर्वांना सांगायचे होते.” असे रावत म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: मैदानात फटकेबाजी, गॅलरीत 'ब्लॅक मॅजिक'? चाहत्यानं लिंबू फिरवला अन् चेन्नईला पाजलं पाणी; ललित मोदीने विचारले गंभीर प्रश्न

Japan Earthquake: जपानमध्ये 7.5 रिश्टर स्केलचा शक्तिशाली भूकंप; उत्तर-पूर्वी किनारपट्टीवर त्सुनामीचा हाय-अलर्ट VIDEO

IPL 2026 Points Table: पंजाबचा 'पंजा' भारी! डबल हेडरनंतर गुणतालिकेत 'टॉपर'; मुंबई-चेन्नई अन् कोलकाताच्या गोटात चिंतेचं सावट

Israel Lebanon Map: युद्धविरामानंतर इस्रायलचा मोठा 'गेम'! नकाशाद्वारे लेबनॉनच्या भूभागावर वर्चस्व सिद्ध; हिजबुल्लासाठी धोक्याची घंटा

Vaibhav Suryavanshi Crying: टोपीने तोंड लपवले, डोळे पुसले पण हुंदका थांबेना! राजस्थानचा 'वंडर बॉय' ढसाढसा रडला; '16 सेकंदांचा' व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT