Sukesh Chandrashekhar took names of Shilpa Shetty, Shraddha Kapoor

 

Dainik Gomantak

मनोरंजन

सुकेश चंद्रशेखरचा मोठा खुलासा, शिल्पा शेट्टी अन् श्रध्दा कपूर ईडीच्या रडारावर!

सुकेश चंद्रशेखरच्या (Sukesh Chandrashekhar) 200 कोटींच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात बॉलिवूड सेलिब्रिटींसोबतचे कनेक्शनही समोर येत आहे.

दैनिक गोमन्तक

सुकेश चंद्रशेखरच्या (Sukesh Chandrashekhar) 200 कोटींच्या मनी लाँड्रिंग (Money laundering) प्रकरणात बॉलिवूड (Bollywood) सेलिब्रिटींसोबतचे कनेक्शनही समोर येत आहे. आतापर्यंत या प्रकरणात जॅकलिन फर्नांडिस आणि नोरा फतेही (Nora Fatehi) यांच्या नावानंतर आणखी अभिनेत्रींची नावे समोर येत आहेत. टाईम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार, या प्रकरणाची चौकशी करत असलेल्या अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) सांगितले की, त्याचे श्रद्धा कपूर (Shraddha Kapoor) आणि शिल्पा शेट्टीसह (Shilpa Shetty) अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींशीही संबंध आहेत. वेबसाइटनुसार, 2020 च्या सुरुवातीला, जेव्हा सुकेश तुरुंगात होता, तेव्हा 8-10 बॉलिवूड सेलिब्रिटी त्याला भेटायला गेले होते. मात्र, त्यांच्या भेटीची वेळ आणि इतर तपशील अद्याप समजू शकलेले नाहीत.

एएनआयच्या वृत्तानुसार, सुकेशने आपल्या वक्तव्यात सांगितले आहे की, तो श्रद्धा कपूरला 2015 पासून ओळखतो आणि NCB प्रकरणात अभिनेत्रीला मदतही केली होती. बाकीच्या सेलिब्रिटींबद्दल बोलताना, सुकेशने ईडीला सांगितले की तो हरमन बावेजाला ओळखतो आणि तो त्यांच्यासोबत त्याचा पुढचा चित्रपट, कॅप्टन सह-निर्मिती करणार आहे, ज्यामध्ये कार्तिक आर्यन मुख्य भूमिकेत आहे. सुकेशच्या वक्तव्यात असेही म्हटले आहे की, पती राज कुंद्राच्या प्रकरणाबाबत त्याने शिल्पा शेट्टीशीही संपर्क साधला होता.

मात्र, अहवालानुसार सुकेशने केलेले सर्व दावे खोटे असल्याचे ईडीचे म्हणणे आहे. याआधी ईडीने जॅकलिन फर्नांडिस आणि नोरा फतेही यांची सुकेशशी संबंधाबाबत चौकशी केली होती. केंद्रीय एजन्सीने सांगितले की, जॅकलिन आणि नोरा यांना आरोपींकडून टॉप मॉडेल लक्झरी वाहनांसह अनेक महागड्या भेटवस्तू मिळाल्या आहेत.

जॅकलीन अडचणीत अडकली आहे का?

या प्रकरणात जॅकलिनचे (Jacqueline Fernandez) नाव आल्यापासून अभिनेत्री अडचणीत सापडली आहे. अभिनेत्रीला भारताच्या बाहेर जाण्यासही बंदी घालण्यात आली आहे. या कारणामुळे ती भारताबाहेर जाऊन चित्रपटाचे शूटिंग करू शकणार नसल्याचे बोलले जात आहे. जॅकलिनच्या प्रोफेशनल लाईफबद्दल बोलायचे झाले तर ती शेवटची भूत पोलिस या चित्रपटात दिसली होती.

सध्या अभिनेत्रीचे अनेक चित्रपट रिलीजसाठी तयार आहेत ज्यात अटॅक, बच्चन पांडे, सर्कस आणि राम सेतू यांचा समावेश आहे. अटॅकचा टीझर नुकताच रिलीज करण्यात आला असून, त्याला खूप पसंती मिळाली. या चित्रपटात जॅकलिनसोबत जॉन अब्राहम आणि रकुल प्रीत सिंह मुख्य भूमिकेत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

King Momo 2026: कार्निव्हल 2026 चे बिगुल वाजले! सेड्रिक डी कोस्टा यांची 'किंग मोमो' म्हणून घोषणा

IND vs NZ: विजेच्या वेगाने आला चेंडू अन्... श्रेयस अय्यरच्या 'रॉकेट थ्रो'ने उडवले स्टंप्स; ब्रेसवेलची डायव्हही ठरली अपयशी Watch Video

Viral Video: 'धूम' स्टाईल स्टंट अन् थेट जमिनीवर लोळण! दिल्ली पोलिसांचा रीलवाल्यांना दणका; स्टंटबाजांचं मीम बनवून केलं ट्रोल

IND vs NZ: किवी सलामीवीरांचा धमाका! 27 वर्षांनंतर भारतीय भूमीवर रचला ऐतिहासिक रेकॉर्ड; कॉन्वे आणि निकोल्स जोडीची कमाल

लग्नाला गेले कुटुंब अन् एकटी मुलगी, खिडकीचे ग्रिल कापताना चोरट्यांना रंगेहाथ पकडले; पर्रा येथे दरोड्याचा मोठा डाव फसला

SCROLL FOR NEXT