Sukesh Chandrasekhar and Jacqueline Fernandez Dainik Gomantak
मनोरंजन

चंद्रशेखरचा जॅकलीनबद्दल मोठा खुलासा; आमच्या नात्यात प्रेम अन् आदर...

सुकेश चंद्रशेखरने हाताने लिहिलेली एक नोट जारी केली आहे. त्याच्या नोटमध्ये तो जॅकलिनचा बचाव करताना दिसून आला आहे.

दैनिक गोमन्तक

अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस (Jacqueline Fernandez) मनी लाँड्रिंग प्रकरणात ठग सुकेश चंद्रशेखरसोबतच्या (Sukesh Chandrasekhar) तिच्या नात्यामुळे प्रसिद्धीच्या झोतात आली होती. अभिनेत्रीचे सुकेशसोबतचे अनेक फोटो व्हायरल झाले आहेत. त्यानंतर अभिनेत्रीने एक पोस्ट शेअर केली आणि त्यांचे खाजगी फोटो व्हायरल करू नका असे आवाहन केले होते. त्याचवेळी सुकेश चंद्रशेखरने हाताने लिहिलेली एक नोट जारी केली आहे. त्याच्या नोटमध्ये तो जॅकलिनचा बचाव करताना दिसून आला आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या सुकेश चंद्रशेखरने हाताने लिहिलेल्या चिठ्ठीत लिहिले होते की, 'माझे वैयक्तिक फोटो प्रसारित होताना पाहून मला खूप वाईट खुप वाटले आहे. बातमीच्या माध्यमातून मला याची माहिती मिळाली. हे आमच्या वैयक्तिक अधिकारांचे उल्लंघन आहे. जॅकलीन आणि मी रिलेशनशिपमध्ये असल्याचे मी याआधी सांगितले आहे आणि आम्ही एकमेकांना डेट करत होतो. आमचे नाते पैशावर आधारित नव्हते, जसे बोलले जात आहे. आमच्या नात्यात खूप प्रेम आणि आदर होता. आम्हाला एकमेकांकडून काही अपेक्षा नव्हत्या.

विशेष म्हणजे सुकेश चंद्रशेखरने जॅकलीन फर्नांडिसला (Sukesh Chandrasekhar and Jacqueline Fernandez) 56 लाखांचा घोडा, 36 लाखांच्या चार मांजरी आणि अनेक महागड्या भेटवस्तू दिल्या होत्या, ज्यांची ईडी जप्तीची प्रक्रिया करत आहे. सुकेशच्या बाबतीत जॅकलीनलाही परदेशात जाण्यास बंदी घालण्यात आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांची लागणार लॉटरी? मूळ वेतनात 400 टक्क्यांपर्यंत वाढीचा फॉर्म्युला; रेल्वे संघटनेच्या प्रस्तावाने उडवली खळबळ

Vladimir Putin: व्लादिमीर पुतिन 150 वर्षे जिवंत राहणार? रशियन शास्त्रज्ञांच्या दाव्यानं जगभरात खळबळ; प्रयोगशाळेत तयार केले जातायेत मानवी अवयव

घर सुटलं, देश सुटला अन् आता आयुष्यही संपलं! पाकिस्तानातून मायदेशी परतणाऱ्या अफगाण निर्वासितांचा ट्रक उलटला; 18 मृत्यू, 35 जखमी

पूजेसाठी निघाले, पण वाटेतच काळाने गाठले! मध्य प्रदेशात भाविकांनी भरलेली ट्रॅक्टर-ट्रॉली दरीत उलटली; 6 जणांचा मृत्यू, 40 जखमी

Priti Yog 2026: वादविवाद संपणार, बँक बॅलन्स वाढणार! 3 राशींची लॉटरी लागणार; 8 जूनपासून सुरु होतोय अत्यंत दुर्मिळ 'प्रीति योग'

SCROLL FOR NEXT