Shah Rukh Khan| mannat| bollywood Dainik Gomantak
मनोरंजन

Stranger Entered Mannat : 'मन्नत'मध्ये ते 8 तास लपून बसले होते, शाहरुखला धक्काच बसला...

अभिनेता शाहरुख खानच्या 'मन्नत'मध्ये 8 तास मेक-अप रूममध्ये ते 8 तास लपून बसले होते.

Rahul sadolikar

गेल्या आठवड्यात शाहरुख खानच्या मन्नत या बंगल्यात घुसल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी दोन जणांना अटक केली आहे. विशेष म्हणजे दोन्ही आरोपी पकडले जाण्यापूर्वी सुमारे आठ तास अभिनेता शाहरुख खानच्या मेकअपमध्ये लपून बसले होते. 

दोघेही शाहरुखचे चाहते होते आणि त्यांनी भेटीसाठी भिंत पाडून मन्नतच्या बंगल्यात प्रवेश केला. दोन्ही आरोपींवर भादंवि अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना २ फेब्रुवारीची आहे.

पठाण साहिल सलीम खान आणि राम सराफ कुशवाह अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे असून दोघेही गुजरातमधील भरुचचे रहिवासी आहेत. असे सांगितले जात आहे की हे दोन्ही अभिनेता शाहरुख खानचे चाहते आहेत आणि त्यांना एकदाच त्याला भेटायचे होते. 

शाहरुखला भेटण्याच्या इच्छेने ते गुपचूप बंगल्यात शिरले. दोन्ही आरोपींना सुरक्षा रक्षकाने पकडून नंतर पोलिसांच्या ताब्यात दिले.

मिळालेल्या माहितीनुसार, दोन्ही आरोपी अभिनेता शाहरुख खानच्या बंगल्याच्या तिसऱ्या मजल्यावर असलेल्या मेकरूममध्ये लपले होते. तब्बल 8 तास ते शाहरुख खानची वाट पाहत होता. दोन्ही आरोपी पहाटे 3 वाजता मन्नतमध्ये दाखल झाले, त्यांना सकाळी 10 वाजता पकडण्यात आले. 

मन्नत बंगल्याचे व्यवस्थापक कॉलीन डिसोझा यांनी पोलिसांना सांगितले की, दोन्ही आरोपींना हाऊसकीपिंग कर्मचारी सतीश यांनी पाहिले आणि त्यांना मेकरूप येथून लॉबीमध्ये आणले. दोन्ही अनोळखी लोकांना पाहून शाहरुखला धक्काच बसला. त्यानंतर मन्नतच्या सुरक्षा रक्षकाने त्याला पोलिसांच्या ताब्यात दिले.

दोन्ही आरोपींच्या चौकशीनंतर काहीही संशयास्पद आढळले नसल्याचे मुंबई पोलिसांनी सांगितले. दोघांच्या कुटुंबीयांना या प्रकरणाची माहिती देण्यात आल्याने ते पोलिस ठाण्यात आले आणि त्यांना जामीन मिळाला. दोन्ही आरोपींची १० हजार रुपयांच्या जामिनावर कोर्टातून सुटका करण्यात आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Colvale Central Jail: पाणीटंचाई, तुटलेली गटारे आणि डासांचा प्रादुर्भाव, कोलवाळ कारागृहात मानवाधिकार आयोगाची अचानक धडक; कैद्यांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर

Scrub Typhus Spread In goa: गोव्यात 'स्क्रब टायफस'चा धोका वाढला! 827 जण बाधित; तिसवाडी, मुरगावात सर्वाधिक रुग्ण

Sarmanas Villagers Protest: ‘वेदान्ता’ची खनिज वाहतूक रोखली! सारमानसवासीय पुन्हा आक्रमक; चार तास वाहतूक ठप्प

CENA IS BACK.... WWE चाहत्यांसाठी मोठी बातमी! जॉन सीनाच्या कमबॅकची घोषणा; RAW मध्ये दिसणार 16 वेळचा 'वर्ल्ड चॅम्पियन'

Prepaid Smart Meters: प्रीपेड स्मार्ट मीटर जोडणी कायमस्वरुपी बंद करा! अमित पाटकरांचा वीज खात्याला 15 दिवसांचा अल्टीमेटम

SCROLL FOR NEXT