Zakir Khan in KBC 15 Dainik Gomantak
मनोरंजन

KBC 15 मध्ये दिसला झाकीर खान... भावुक शायरीने 'बिग बींच्या डोळ्यात पाणी

Rahul sadolikar

Zakir Khan in KBC 15 : 'चाचा विधायक है हमारे' फेम आणि आपल्या शायरीने सोशल मिडीयावर तरुणांचा लाडका बनलेला झाकीर खान थेट केबीसीच्या हॉट सीटपर्यंत पोहोचला आहे. आपल्या शायरीने झाकीरने बिग बींनाही भावुक केल्याचं प्रोमोमध्ये दिसलं आहे.

 प्रोमोमध्ये अमिताभ बच्चन झाकीरला त्यांच्यासाठी एखादी कविता सादर कर असं सांगत आहेत आणि त्यानंतर झाकीरच्या कवितेने सर्वजण भावुक होताना दिसत आहेत.

KBC 15

KBC 15 हा सीझन भलताच लोकप्रिय होताना दिसत आहे. या सीझनमध्ये वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणारे स्पर्धक येऊन खेळाची रंगत वाढवताना दिसत आहे.

एकानंतर एक असे लाखोंचे आणि कोटींचे टप्पे पार करत जेव्हा स्पर्धक पुढे जातात तेव्हा रक्कम तर वाढतेच पण जोखीमही तितकीच वाढते.

झाकीर खान दिसणार

26 सप्टेंबर रोजी प्रसारित होणाऱ्या एपिसोडमध्ये 'चाचा विधायक है हमारे' फेम अभिनेता झाकीर खान दिसणार आहे. या एपिसोडमध्ये झाकीर खेळासोबतचे आपल्या भावनिक शायरीने प्रेक्षकांची मने जिंकणार आहे.

रिलीज झालेल्या प्रोमोमध्ये झाकीर आपल्या कवितांनी बिग बींनाही भावनिक करताना दिसतो.

झाकीरची कविता अन् सगळे भावुक

झाकीर खान यांनी एक कविता सर्व मातांना समर्पित केली आहे. प्रोमोमध्ये कॉमेडियन झाकीर खान त्याच्या आई-वडिलांसोबत दिसत आहे. अमिताभ बच्चन यांच्या विनंतीवरून त्यांनी सर्व मातांसाठी एक कविता ऐकवली. 

आई-मुलाची झाकीरची कविता

प्रोमोमध्ये अमिताभ बच्चन म्हणतात, 'तुम्ही आमच्यासाठी एक छोटासा परफॉर्मन्स केलात तर हा खूप मोठी कृपा होईल.' 

झाकीरची ही कविता एका आई आणि मुलाची भावबंधाची गोष्ट सांगणारी होती. आपल्या अडचणींना आपल्या आधी आपली आई कशी भिडते हे या कवितेचं सार आहे.

झाकिरच्या चाहत्यांच्या प्रतिक्रिया

झाकिरने सादर केलेल्या या कवितेवर त्याच्या चाहत्यांच्या तसेच काही यूजर्सच्या प्रतिक्रिया आल्या. एका चाहत्याने लिहिले, 'क्या बात है' (वाह). एका यूजरने लिहिले, 'लव्ह यू झाकीर भाई.' 

एका चाहत्याने कमेंट केली की, 'तुझ्याकडून नेहमीच खूप काही शिकण्यासारखे असते.' एकजण म्हणाला, 'झाकीर भाई, तुमच्या सुपर यशाने मला खूप आनंद झाला आहे.'

Rahul Gandhi: 'गोव्यात भाजप सांप्रदायिक तणाव निर्माण करतंय'; राहुल गांधींचा हल्लाबोल

St. Francis Xavier DNA Test Row: वेलिंगकरांविरोधात रस्त्यावर उतरलेल्या आंदोलकांची माघार! राजकीय मायलेजचा मुद्दा नडला

Leopard Trapped at Pissurlem: ..अखेर बिबट्या जेरबंद! पिसुर्ले ग्रामस्थांनी सोडला सुटकेचा नि:श्वास

CM Pramod Sawant: पोल्ट्री उद्योगातून 'स्वयंपूर्ण गोवा' करण्यासाठी सरकार करणार मदत

Viral Video : ‘तो’ व्हिडिओ गोव्याचा नव्हे, कांगोचा

SCROLL FOR NEXT