The Gray Man|Dhanush Twitter
मनोरंजन

South actor: साऊथचा सुपरस्टार धनुष 'द ग्रे मॅन' या हॉलिवूड चित्रपटामुळे चर्चेत

Tollywood: आम्हाला साऊथ किंवा नॉर्थ अभिनेते म्हणण्याऐवजी प्रत्येकजण आपल्या सगळ्यांना भारतीय अभिनेता म्हणेल

दैनिक गोमन्तक

Dhanush: साऊथचा सुपरस्टार धनुष सध्या त्याच्या आगामी 'द ग्रे मॅन' या हॉलिवूड चित्रपटामुळे चर्चेत आहे. अलीकडेच, चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान तो म्हणाला मला 'दक्षिणात्य अभिनेता' म्हणून मला ओळखले जावू नये तर साऊथ, नॉर्थ किंवा रिजनल ऐवजी राष्ट्रीय चित्रपट बनवून आपण एकत्र एक मोठी इंडस्ट्री बनवावी असे मला वाटते.

'दक्षिण अभिनेता' म्हणून संबोधल्याबद्दल धनुष म्हणाला,आम्हाला साऊथ किंवा नॉर्थ अभिनेते म्हणण्याऐवजी प्रत्येकजण आपल्या सगळ्यांना भारतीय अभिनेता म्हणेल, तेव्हा मला आनंद होईल. आपण सर्वांनी एकत्र येऊन मोठा काहीतरी उभारण्याची हीच वेळ आहे. आपण सर्वांनी एकत्र काम करून केवळ दक्षिण, उत्तर किंवा प्रादेशिक नव्हे तर राष्ट्रीय चित्रपट बनवण्यासाठी काम केले तर चांगल होईल.

OTT प्लॅटफॉर्मबद्दल बोलताना धनुष म्हणाला,प्रत्येक चित्रपट प्रत्येकासाठी बनवला जातो, विशेषतः डिजिटल प्लॅटफॉर्मवर. आता प्रत्येकजण प्रत्येकाचे काम पाहू शकतो आणि त्याच्या अभिनयाची माहिती मिळते. अभिनेता म्हणून आमच्यासाठी हा खूप चांगला काळ आहे. तुम्ही चांगले काम करत असाल.

तर तुमच्या कामाची दखल घेतली जाते. त्यामुळे आता मला किंवा इतर कुणाला साऊथचा अभिनेता म्हणावं असं काही वाटत नाही. आम्ही फक्त भारतातील कलाकार आहोत.

धनुष व्यतिरिक्त 'द ग्रे मॅन' चित्रपटात ख्रिस इव्हान्स आणि रायन गोसलिंग यांच्याही भूमिका आहेत. हा चित्रपट 22 जुलै रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला आहे. 'द ग्रे मॅन' हा धनुषचा दुसरा हॉलिवूडचा चित्रपट आहे. यापूर्वी, धनुष 2018 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'द एक्स्ट्राऑर्डिनरी जर्नी ऑफ फकीर' या प्रेषकांनी गाजलेल्या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसला होता. रोमन प्युर्टो लास यांच्या 'द एक्स्ट्राऑर्डिनरी जर्नी ऑफ द मिस्टिक' या कादंबरीवर हा चित्रपट आधारित आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IPL Jersey Stolen: BCCI च्या ऑफिसमध्ये 6.52 लाखांची चोरी; मुंबई, चेन्नईसह अनेक IPL संघांच्या जर्सी गायब, सुरक्षा व्यवस्थापकाविरोधात गुन्हा दाखल

Tigers In Goa: माणसाच्या उत्पत्तीपूर्वीपासून पृथ्वीवर असलेले, वाघुर्मे गावात देवासारखे पुजले जाणारे 'वाघ' आम्हाला नकोसे झालेत का?

Goa Assembly Session: बाहेर जाणार्‍या दारूच्या बाटल्यांवर आता 'होलोग्राम'!

Love Horoscope: मनातल्या भावना व्यक्त करायची हीच योग्य वेळ, तुमची 'चंद्र रास' काय सांगते? वाचा

Goa Opinion: कोण म्हणतंय पत्रकारिता संपली?

SCROLL FOR NEXT