Saran Raj Passes Away Dainik Gomantak
मनोरंजन

Saran Raj Passes Away : साऊथ इंडस्ट्रीला झालंय तरी काय? 'असुरन' चित्रपटातल्या या अभिनेत्याचे अपघातात निधन...

असुरन चित्रपटात काम केलेल्या सरण राज या अभिनेत्याचा अपघातात मृत्यू झाला आहे.

Rahul sadolikar

साऊथ चित्रपटसृष्टीतून एक दु:खद बातमी येत आहे. दक्षिण चित्रपटांमध्ये सहाय्यक भूमिका करणाऱ्या अभिनेत्याचा रस्ता अपघातात मृत्यू झाला. सरण राज असे या अभिनेत्याचे नाव आहे. सरण राज हे दिग्दर्शक वेत्री रमन यांचे सहाय्यक दिग्दर्शक होते आणि त्यांनी चित्रपटांमध्ये सहाय्यक भूमिका केल्या होत्या. 

8 जून रोजी एका गंभीर कार अपघातात त्यांचा मृत्यू झाला.पलानीप्पन नावाच्या आणखी एका सहाय्यक अभिनेत्याने सरन राजच्या बाईकला कारने धडक दिल्याचे सांगितले जात आहे. यामुळे सरण राजला गंभीर दुखापत झाली आणि त्याचा मृत्यू झाला.

असुरन चित्रपटात केले होते काम

'इंडिया टुडे'च्या वृत्तानुसार, पलानीप्पन दारू पिऊन गाडी चालवत होते. ही घटना 8 जून रोजी रात्री 11.30 वाजता घडली. सरण राज हा मदुरावायल येथील धनलक्ष्मी स्ट्रीट येथे राहत होता. 

रात्री 11.30 वाजता केके नगरमधील अर्कोट रोडवरून ते दुचाकीवरून जात असताना कारने त्यांना धडक दिली. परिसरातील नागरिकांनी तत्काळ पोलिसांना माहिती दिली. धनुष स्टारर 'असुरन' आणि वाद चेन्नई व्यतिरिक्त, सरन राजने इतर काही तमिळ चित्रपटांमध्ये छोट्या भूमिका केल्या.

सरण राज यांच्या मृतदेहाचे पोस्टमार्टम

सरण राज यांचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला असून अभिनेता पलानीप्पनवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी तत्काळ या प्रकरणाचा तपास सुरू केला आणि आता पलानीप्पनला अटक केली आहे. 

पलानीप्पन मित्रांसोबत पार्टी करून परतत होते, असे सांगण्यात येत आहे.सरन राज यांच्या निधनाने संपूर्ण साउथ फिल्म इंडस्ट्रीला धक्का बसला आहे.

5 जूनला मल्याळम अभिनेते कोल्ली सुधी

काही दिवसांपूर्वी म्हणजेच 5 जून रोजी मल्याळम अभिनेते कोल्ली सुधी यांचा अपघाती मृत्यू झाला होता. प्रसिद्ध मल्याळम अभिनेता कोल्लम सुधी यांच्या कारला भीषण अपघात झाला होता. या अपघातात त्याचा मृत्यू झाला होता तर असून अन्य तीन कलाकार गंभीर जखमी झाले होते.

अमर उजालाने दिलेल्या वृत्तांनुसार,पोलिसांनी सांगितले की, सुधी, उल्लास अरूर, बिनू आदिमाली आणि महेश ज्या कारमध्ये प्रवास करत होते ती पहाटे 4.30 च्या सुमारास कपमंगलम येथे एका ट्रकला धडकली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

PAK Fan Controversy Statement: पाकिस्तानचा 'सनकी' चाहता! हारिस रौफला भेटला अन् म्हणाला, "बदला लेना, इंडिया को छोड़ना नहीं..." Watch Video

Goa Children Court: पोटच्या 20 वर्षीय मुलीचा खून करणाऱ्या बापाला जन्मठेप, आठ वर्षानंतर लागला निकाल

आम्ही देशप्रेमी, तू देशद्रोही! गोव्यात आणखी एका सामाजिक कार्यकर्त्याला धमकी, BJP नेत्याने धमकीचा फोन केल्याचा आरोप

Goa Live Updates: साखळीत वृद्ध भाजीविक्रेत्या महिलेला लुबाडले

E-Waste: प्रत्येक नव्या खरेदीमागे जुन्या उपकरणांचा कचरा वाढतो, तोच ढीग गंभीर समस्या म्हणून उभा राहतो; ई-कचऱ्याचा विळखा

SCROLL FOR NEXT