Smriti Irani's daughter Dainik Gomantak
मनोरंजन

स्मृती इराणींच्या मुलीचे राजस्थानमध्ये होणार ग्रॅन्ड लग्न, गोव्यातील सिली सोल्समुळे सापडली होती वादात

स्मृती इराणी यांची मुलगी 9 फेब्रुवारीला अर्जुन भल्लासोबत लग्नगाठ बांधणार आहे.

Pramod Yadav

सिद्धार्थ मल्होत्रा-कियारा अडवाणीनंतर आता केंद्रीय मंत्री आणि अभिनेत्री स्मृती इराणी यांची मुलगी शनेल इराणी (Shanelle Irani) हि देखील लग्न बंधनात अडकणार आहे. राजस्थानमधील विशाल फोर्ट येथे हा शाही विवाह होणार आहे.

स्मृती इराणी यांनी आपल्या मुलीच्या लग्नासाठी नागौर जिल्ह्यातील खिंवसार किल्ला बुक केला आहे. स्मृती इराणी यांची मुलगी 9 फेब्रुवारीला अर्जुन भल्लासोबत लग्नगाठ बांधणार आहे. दरम्यान, गोव्यातील वादग्रस्त सिली सोल्स रेस्टॉरंटवरून ती वादात सापडली होती.

मिळालेल्या माहितीनुसार, खिंवसार किल्ला 7, 8 आणि 9 फेब्रुवारी असे तीन दिवसांसाठी बुक करण्यात आला आहे. किल्ला सुंदर सजवला आहे. मनोरंजनासाठी थ्रीडी लाईट आणि साउंडची व्यवस्था करण्यात आली आहे. कुटुंबीय आणि खास लोकांच्या उपस्थितीत हा विवाह होणार आहे.

हा किल्ला 500 वर्ष जुना आहे

राजस्थानच्या नागौर जिल्ह्यातील हा किल्ला 500 वर्षे जुना आहे. महाराजा राव जोधा यांच्या आठव्या मुलाने हा किल्ला बांधला होता. हा किल्ला 1523 मध्ये बांधला होता, जो सध्या राजस्थानचे माजी मंत्री गजेंद्र सिंह खिंवसर यांच्या मालकीचा आहे.

या लग्नस्थळाची खास गोष्ट म्हणजे याच किल्ल्यात शनेलच्या होणाऱ्या पतीने तिला लग्नासाठी प्रपोज केले होते. आता हाच किल्ला दोघांनी लग्नासाठी निवडला आहे. शनीलने तिचा दीर्घकाळ बॉयफ्रेंड अर्जुन भल्लासोबत 2021 मध्ये दुबईमध्ये एंगेजमेंट केली होती. ज्याचा फोटो स्मृती इराणींनी शेअर करून त्यांना खूप आशीर्वाद दिले.

दरम्यान, गोव्यातील सिली सोल्स या कॅफे अँड बार प्रकरणात केंद्रीय मंत्री आणि अभिनेत्री स्मृती इराणी यांच्या कुटुंबाचा सहभाग असल्याचा आरोप  ॲड. आयरिश रॉड्रिग्ज यांनी केला होता. इराणी यांची मुलीवर देखील याप्रकरणी आरोप झाले होते. बारला देण्यात आलेला परवाना बेकायदेशीर पद्धतीने आणि मृत व्यक्तीच्या नावाने देण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणाशी आपला काहीच संबध नसल्याचे स्मृती इराणी यांनी वारंवार म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

ED Goa: गोव्यात ईडीची झाडाझडती; 'सडा अर्बन'ची 1.05 कोटींची मालमत्ता तर जमीन हडप प्रकरणी संदीप वझरकर 3.19 कोटींची जमीन जप्त

Video: अप्रतिम अन् शानदार...! भर पावसात मुलांसोबत 'गजराज'नं लुटला क्रिकेटचा आनंद; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

Goa News: अडवलपालमध्ये गढूळ पाण्याचा पुरवठा, 'फोमेंतो' कंपनीच्या रिजेक्शनमुळे समस्या; वाचा गोव्यातील दिवसभरातील ठळक घडामोडी

SCROLL FOR NEXT