HBD Kailash Kher Dainik Gomantak
मनोरंजन

HBD Kailash Kher : बिझनेसमधलं नुकसान, मनाचा कोंडमारा आणि डोक्यातले आत्महत्येचे विचार...कैलाश खेरचे ते भयाण दिवस...

गायक कैलाश खेरचा आज 50 वा वाढदिवस.. आज पाहुया त्याच्या त्या दिवसांबद्दल जेव्हा तो पार मोडून पडला होता..

Rahul sadolikar

Singer Kailash Kher 50th Birthday : प्रसिद्ध बॉलिवूड गायक कैलाश खेरचा आज 50 वा वाढदिवस साजरा करत आहे. 'तेरी दीवानी' आणि 'सैया' सारख्या गाण्यांनी स्वत:ला यशाच्या शिखरावर पोहोचवणाऱ्या कैलाश खेरचे चाहते सर्व वयोगटातील लोक आहेत.

आज कैलाश खेरला कुठल्याही नव्या ओळखीची गरज नाही ;पण कैलाश खेरचा सुरूवातीचा काळ खूप भयंकर होता. कैलाश खेर त्याच्या आयुष्यात इतका निराश झाला होता कि त्याने आत्महत्येचाही विचार केला होता, चला पाहुया कैलाशच्या आयुष्यातले ते संघर्षाचे दिवस.

कैलाश खेरने गायली 300 पेक्षा जास्त गाणी

7 जुलै 1973 रोजी मेरठ, यूपी येथे जन्मलेले कैलाश खेरचे वडील पंडित मेहर सिंह खेर हे पुजारी होते आणि ते घरातील कार्यक्रमात गाायचे. वडील संगीताशी निगडीत असले तरी संगीतातच यश मिळवणे कैलाश खेरसाठी इतके सोपे नव्हते. 

विशेषतः बॉलीवूड गायक होण्याचे स्वप्न साकार करणे खूप कठीण होते. आज 18 भाषांमध्ये कैलाश खेरने जवळपास 300 गाणी गायली आहेत.  

कुटूंबियांशी संघर्ष

वयाच्या १३ व्या वर्षी कैलाश खेर यांनी कुटुंबाविरुद्ध बंड करून मेरठहून दिल्लीचा रस्ता धरला आणि दिल्लीत आल्यानंतर संगीत शिकायला सुरुवात केली. यासोबतच त्यांनी पैसे कमावण्यासाठी छोटेखानी कामही सुरू केले, ते परदेशी लोकांना संगीत शिकवून पैसे कमवत असत. 

बिझनेस बुडाला

दिल्लीत बराच वेळ घालवल्यानंतर, 1999 पर्यंत, कैलाश खेल यांनी एका कौटुंबिक मित्रासोबत निर्यात व्यवसाय करण्यास सुरुवात केली, परंतु तोट्यामुळे भांडवलही संपत आले, त्यामुळे कैलाश खेर नैराश्याचे बळी ठरले. त्याला आत्महत्याही करायची होती. मात्र, वेळ निघून गेला आणि कैलास पैसे कमावण्यासाठी सिंगापूर आणि थायलंडला निघून गेला. 

साधुंच्या सानिध्यातले दिवस

6 महिन्यांनंतर, कैलाश खेर सिंगापूर आणि थायलंडमधून भारतात परतला आणि ऋषिकेशला गेला आणि तेथे त्यांनी संतांसोबत वेळ घालवला आणि गाणी गायली. येथे साधूंनी त्यांच्या गायनाचे खूप कौतुक केले, त्यामुळे कैलाश खेरला आत्मविश्वास पुन्हा आला. 

त्याचे गायक होण्याचे स्वप्न पुन्हा उफाळून आले आणि तो मुंबईत आला. मात्र, येथे मोठा संघर्ष त्याची वाट पाहत होता. पैशाच्या बाबतीत, परिस्थिती इतकी वाईट होती की तो तुटलेली चप्पल घालून स्टुडिओमध्ये फिरत असे. एके दिवशी राम संपतने त्याला जाहिरातीचे जिंगल गाण्यासाठी आणले आणि त्यासाठी त्याला 5000 रुपये देण्यात आले. 

अल्लाह के बंदेने दिली वेगळी ओळख

वर्षानुवर्षे संघर्ष केल्यानंतर कैलाश खेर यांना चित्रपट शैलीत ब्रेक मिळाला. कैलाशने चित्रपटातील 'रब्बा इश्क ना होवे' हे गाणे गायले होते, जे लोकांना खूप आवडले होते. पण वैसा भी होता है या चित्रपटातील 'अल्ला के बंदे हम' या गाण्याला त्यांनी आवाज दिला, तेव्हा लोक त्यांना ओळखू लागले. 

आज कैलाश खेर यशाच्या शिखरावर असून त्यांना डझनभर पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. 2009 मध्ये त्यांनी मुंबईत राहणाऱ्या शीतलशी लग्न केले आणि दोघांना कबीर नावाचा मुलगा आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime: धक्कादायक! वडिलांवर धारदार शस्त्राने वार करून मुलाने संपवले जीवन; उसगावात खळबळ

Rashi Bhavishya 14 November 2024: व्यवसायातून खास फायदा होईल, आपल्या दिलदार स्वभावामुळे लोकं प्रसन्न राहतील; जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस

Cash For Job Scam: 'मुख्यमंत्र्यांनी नोकरीत घोटाळा करणाऱ्यांवर तात्काळ कारवाई करावी', नरेश सावळ यांचे आवाहन

Cuncolim IDC: कुंकळ्ळी औद्योगिक वसाहत होणार दुर्गंधीमुक्त! पोलाद कारखाना, वृक्ष लागवडीसाठी होणार सांडपाण्‍याचा पुनर्वापर

'Cash For Job' ची दिल्लीत चर्चा! नोकर भरतीसंदर्भात श्‍वेतपत्रिका काढा; काँग्रेस सचिव शर्मा कडाडले

SCROLL FOR NEXT