Shubman Gill - Sara Ali Khan DainIjk Gomantak
मनोरंजन

Shubman Gill - Sara Ali Khan : शुभमन गिलची सारा नेमकी कोण? तेंडुलकरांची की नवाब घराण्यातली?

गुजरात टायटन्सचा शुभमन गिल साराच्या प्रेमात पडलाय ;पण ही सारा नेमकी आहे कोण? सारा तेंडूलकर की सारा अली खान

Rahul sadolikar

सध्या IPL चा हा सीजन जोरदार सुरू आहे. सगळी तरुणाई आपल्या आपल्या टीमच्या आणि खेळाडूच्या समर्थनासाठी ईर्षेला पेटली आहे. वेगवेगळे व्हिडीओ आणि मिम्सही व्हायरल होतायत याच काळात खेळाडूंच्या प्रेमकथाही फुलत आहेत. अगदी बरोबर आम्ही बोलतोय गुजरात टायटन्सचा तडफदार फलंदाज शुभमन गिलच्या प्रेमप्रकरणाबद्दल.

शुभमनचे नाव सुरूवातीला सचिन तेंडूलकरच्या मुलीसोबत म्हणजेच सारासोबत जोडलं गेलं होतं दोघांच्या प्रेमप्रकरणाची चांगलीच चर्चा झाली होती ;पण आता हे प्रकरण मागे पडून शुभमनचे नाव एका अभिनेत्रीसोबत जोडले जात आहे, कोण आहे ही अभिनेत्री? चला पाहुया

शुभमन आणि सारा अली खान

बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खानचे नाव गेल्या अनेक दिवसांपासून क्रिकेटर शुभमन गिलसोबत जोडले जात होते. दोघेही रिलेशनशिपमध्ये असल्याची चर्चा होती. 

जेव्हापासून ते दोन-तीन वेळा आउटिंगमध्ये एकत्र दिसले तेव्हापासून त्यांच्या डेटिंगच्या अफवा पसरत होत्या. आतापर्यंत दोघेही त्यांच्या नात्याबद्दल घट्ट बोलले होते, परंतु आता ताज्या बातम्यांनुसार, शुभमन आणि सारा आधीच वेगळे झाले आहेत.

साराला अनफॉलो केलं?

अनेक मीडिया रिपोर्ट्सनुसार, शुभमन गिल आणि सारा अली खान यांनी सोशल मीडियावर एकमेकांना अनफॉलो केले आहे. आता दोघांमध्ये असे काय झाले की ते वेगळे झाले असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. शुभमन आणि सारानेच वेगळं होण्याचा निर्णय घेतला होता, असा अनेकांचा अंदाज होता.

शुभमनने स्पायडर मॅनला दिला आवाज

शुभमनने 'स्पायडर-मॅन: अक्रॉस द स्पायडरव्हर्स'मध्ये भारतीय स्पायडर-मॅन पवित्र प्रभाकरला आवाज दिला आहे. दुसरीकडे, शुभमनने मुंबई इंडियन्ससोबत आयपीएल सामन्यात धडाकेबाज इनिंग खेळली. 

त्यानंतर त्यांची सर्वत्र चर्चा होत आहे. त्याने MI विरुद्ध 60 चेंडूत 129 धावा केल्या. त्याचा संघ 'गुजराज टायटन्स' फायनलमध्ये पोहोचला आहे आणि 28 मे रोजी (रविवार) महेंद्रसिंग धोनीच्या संघ 'चेन्नई सुपर किंग्स'शी सामना होईल.

RCB चे आव्हान संपुष्टात

इंडियन प्रीमियर लीग 2023 स्पर्धेत रविवारी रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध गुजरात टायटन्स संघात सामना झाला. एम चिन्नास्वामी स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात गुजरात टायटन्सने 6 विकेट्सने विजय मिळवला.

गुजरातच्या या विजयाने बेंगलोरचे या हंगामातील आव्हान संपुष्टात आले आहे. तसेच त्यामुळे मुंबई इंडियन्सचा प्लेऑफमध्ये पोहचण्याचा मार्ग मोकळा झाला असून तो प्लेऑफमध्ये प्रवेश करणारा चौथा संघ ठरला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: आधी कौतुकाची थाप, मग दिला धक्का! डॅरिल मिचेलच्या शतकानंतर कोहलीने नेमकं काय केलं? पाहा व्हायरल व्हिडिओ

छ. संभाजी महाराजांनी सांत इस्तेव्हांव किल्ल्यावर हल्ला केला, पोर्तुगिजांना समजायच्या आत जुवे किल्ला घेतला; गोव्यावर औरंगजेबाची वक्रदृष्टी

Russian Tourist Murder: 'त्या' रशियन महिलांचा खून पैशासाठीच, राग आल्यावर 'आलेक्सेई' महिलांना टार्गेट करायचा; तपासात धक्कादायक माहिती समोर

Robbery Attempt: होंडा येथील नवनाथ मंदिरातील दानपेटी फोडण्याचा प्रयत्न

Yashasvi Jaiswal: यशस्वी जयस्वालचा पारा चढला? ध्रुव जुरेलच्या कानाखाली मारायला गेला, नक्की काय घडलं? Watch Video

SCROLL FOR NEXT