Aryan Khan Drug Case Dainik Gomantak
मनोरंजन

आर्यन खानला क्लीन चिट मिळाल्यावर शत्रुघ्न सिन्हांनी व्यक्त केले मत,म्हणाले...

Aryan Khan Drug Case : क्रूझ ड्रग्ज प्रकरणी आर्यन खानला क्लीन चिट मिळाली आहे. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (NCB) आपल्या आरोपपत्रात आर्यनविरुद्ध कोणताही पुरावा नसल्याचे म्हटले आहे.

दैनिक गोमन्तक

क्रूझ ड्रग्ज प्रकरणी आर्यन खानला क्लीन चिट मिळाली आहे. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (NCB) आपल्या आरोपपत्रात आर्यनविरुद्ध कोणताही पुरावा नसल्याचे म्हटले आहे. आर्यनला ऑक्टोबर 2021 मध्ये क्रूझवर छापा टाकल्यानंतर एनसीबीने अटक केली होती. सुमारे महिनाभर तो तुरुंगात होता.

आर्यनला क्लीन चिट मिळाल्यानंतर आता तपास यंत्रणेवर प्रश्न उपस्थित होत आहेत. या संपूर्ण प्रकरणावर ज्येष्ठ अभिनेते शत्रुघ्न सिन्हा म्हणाले की, या सगळ्याला खूप उशीर झाला आहे. शाहरुखचा मुलगा असल्यानं आर्यनला टार्गेट करण्यात आलं होतं.

ते पुढे म्हणाले की, ते शाहरुख आणि आर्यन दोघांनाही सपोर्ट करतात. या प्रकरणात स्टारकिडने मोठी किंमत मोजली आहे. मी आर्यनलाच नाही तर शाहरुख खानलाही पाठिंबा देतो. सरकारची ही कृती किंवा प्रतिसाद नक्कीच खूप स्तुत्य आहे पण त्याच बरोबर मला असे म्हणायचे आहे की हे खूप उशीरा झाल्याचे दिसते.

निष्पाप मुलाला फसवणाऱ्या आणि कोणत्याही पुराव्याशिवाय आणि योग्य तपास न करता त्याला तुरुंगात पाठवणाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी. त्यामुळे भविष्यात असे पाऊल उचलण्यापूर्वी त्यांना हजार वेळा विचार करावा लागणार आहे.

NCB अधिकाऱ्यांवर शत्रुघ्न सिन्हा म्हणाले की, 'त्यांनी आर्यनला फक्त भारतातील सर्वात लोकप्रिय अभिनेता शाहरुख खानचा मुलगा असल्यामुळे त्याला जबाबदार धरले. हे सूडाचे राजकारण दिसते. शाहरुख खान ज्या वेदना, यातना आणि असहायतेतून गेला असेल ते मी समजू शकतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: मैदानात फटकेबाजी, गॅलरीत 'ब्लॅक मॅजिक'? चाहत्यानं लिंबू फिरवला अन् चेन्नईला पाजलं पाणी; ललित मोदीने विचारले गंभीर प्रश्न

Japan Earthquake: जपानमध्ये 7.5 रिश्टर स्केलचा शक्तिशाली भूकंप; उत्तर-पूर्वी किनारपट्टीवर त्सुनामीचा हाय-अलर्ट VIDEO

IPL 2026 Points Table: पंजाबचा 'पंजा' भारी! डबल हेडरनंतर गुणतालिकेत 'टॉपर'; मुंबई-चेन्नई अन् कोलकाताच्या गोटात चिंतेचं सावट

Israel Lebanon Map: युद्धविरामानंतर इस्रायलचा मोठा 'गेम'! नकाशाद्वारे लेबनॉनच्या भूभागावर वर्चस्व सिद्ध; हिजबुल्लासाठी धोक्याची घंटा

Vaibhav Suryavanshi Crying: टोपीने तोंड लपवले, डोळे पुसले पण हुंदका थांबेना! राजस्थानचा 'वंडर बॉय' ढसाढसा रडला; '16 सेकंदांचा' व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT