Sharmila Tagore Dainik Gomantak
मनोरंजन

Sharmila Tagore Bikini Shoot : शर्मिला टागोर यांच्या त्या काळातल्या बिकीनी शूटवर पती टायगर पतौडी म्हणाले होते....

अभिनेत्री शर्मिला टागोर यांच्या बिकीनी शूटवर त्या काळात बराच वाद झाला होता.

Rahul sadolikar

Sharmila Tagore Bikini Shoot शर्मिला टागोर या 70 च्या दशकातल्या आघाडीच्या अभिनेत्री होत्या. आराधना, अमर प्रेम या चित्रपटातून त्यांनी चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. सौंदर्य आणि अभिनय यांचा सुरेख मिलाप या अभिनेत्रीमध्ये दिसायचा. प्रत्येक कलाकाराच्या बाबतीत येणारा कॉन्ट्रावर्सीचा प्रसंग शर्मिला टागोर यांनीही एकेकाळी अनुभवला आहे.

70 च्या दशकात एखाद्या अभिनेत्रीने तोकडे कपडे जरी घातले तरी प्रेक्षकांच्या भुवया उंचावायच्या आणि शर्मिला टागोर यांनी तर बिकीनी शूट केले होते यानंतर देशभरात मोठाच गोंधळ उडाला होता.

तो काळ होता 1966 सालचा. एखाद्या अभिनेत्रीला तोकड्या कपड्यात पाहणंही लोकांसाठी मोठं आश्चर्य होतं. याच काळात शर्मिला टागोर एक स्टार म्हणुन समोर येण्यासाठी तयार होती. लंडनच्या एका मासिकासाठी याच काळात बिकीनी शूटसाठी तयार झाली.

तिने त्या मासिकासाठी फोटोशूट केलं तेव्हा फोटोग्राफरही हातात कॅमेरा घेऊन कचरत होता. यावर शर्मिला टागोर यांचे पती टायगर पतौडी यांनी काय प्रतिक्रिया दिली यावर एका मुलाखतीत स्वत: शर्मिला टागोर यांनी सांगितलं आहे.

फिल्मफेअर मासिकासाठी शर्मिला टागोर यांच्या या शूटनंतर त्या स्वत: खूप खुश होत्या त्या म्हणाल्या. "या शूटनंतर मी खूप खुश होते पण यावर पहिली प्रतिक्रिया आली तेव्हा मी घाबरले कारण दिग्दर्शक शक्ती सामंता यावर नाराज झाले आणि त्यांनी मला भेटायला बोलावलं.

जेव्हा मी लगेच टेलीग्रामवर पती टायगर पतौडी यांना फोन केला तेव्हा ते म्हणाले नक्कीच तुम्ही या शूटमध्ये सुंदर दिसत असाल" त्यांच्या या प्रतिक्रियेवर मात्र मी खूप खुश झाले"

पुढे बोलताना शर्मिला टागोर म्हणाल्य " हा तो काळ होता जेव्हा हेलन तिला हवे ते कपडे घालू शकत होती ;पण बाकीच्या नायीकांना हे स्वातंत्र्य नव्हतं. व्हॅम्प नायीका आणि अभिनेत्री यात फरक असतोच तो असायला हवा.

मी यातून एक शिकले की तुम्हाला लोकांकडुन आदर हवा असेल तर काही जबाबदाऱ्या तुम्हाला स्वीकाराव्या लागतील. त्यांना काय हवं ते द्यायला हवं आणि मी तो आदर मिळवला".

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT