Nawazuddin Siddiqui Dainik Gomantak
मनोरंजन

Nawazuddin Siddiqui : अब फैजल क्या करेगा? नवाजुद्दीनच्या पत्नीने निवडला नवा पार्टनर

अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीच्या पत्नीने नवा जोडीदार निवडला आहे, एक पोस्ट शेअर करत तिने स्वत: याची माहिती दिली आहे.

Rahul sadolikar

अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीचा कौटुंबिक कलह शेवटी नात्याच्या शेवटापर्यंत गेला. गेले काही काळ सुरु असेलेला नवाज आणि त्याच्या पत्नीचा वाद शेवटी नातं संपुनच थांबला असंच म्हणावं लागेल.

नवाजुद्दीनच्या आयुष्यात गेल्या काही महिन्यांपासून मोठ्या वादळाला सुरुवात झाली आहे. एवढ्या मोठ्या अभिनेत्याच्या आयुष्यात असं काही होईल याची त्याच्या चाहत्यांना कसलीही कल्पना नव्हती. मात्र या सगळ्या आरोप प्रत्यारोपाच्या प्रसंगात चाहते अभिनेत्याच्या पाठीशी उभे राहिले आहेत.

आलियाची ती पोस्ट

नवाझुद्दीनच्या पत्नीनं आलियानं सोशल मीडियावर काही दिवसांपूर्वी एक पोस्ट केली होती. त्यामध्ये तिनं आता आपल्या आयुष्यात दुसरा कुणीतरी आहे असे सांगून अनेकांना मोठा धक्का दिला होता. त्यानंतर पुन्हा एकदा वेगळ्याच चर्चांना उधाण आले आहे. 

आलियानं नवाजुद्दीनच्या विरोधात भलते सलते आरोप केले होते. त्यानंतर काही करुन आपल्याला आता त्याच्यासोबत राहायचे नाही असेही ती म्हणाली होती. हे प्रकरण कोर्टापर्यत गेले होते.

कोर्ट म्हणालं

कोर्टानं नवाझुद्दीनला आणि त्याच्या पत्नीला तुम्ही तुमच्या मुलांसाठी का होईना एकत्र येण्याचा विचार करावा. असे त्यांना सुनावले होते. यासगळ्यात आलियाच्या त्या पोस्टनं पुन्हा नेटकऱ्यांचे लक्ष वेधले गेले आहे.

त्यात तिनं तिच्या नव्या आयुष्याचा साथीदार आणि नवी सुरुवात याविषयी सांगून अनेकांना धक्का दिला आहे.याशिवाय एक पोस्टही शेयर केली आहे.

माझा बॉयफ्रेंड आणि नवाजसोबतच्या नात्याचा शेवट

आमच्या वैवाहिक नात्याला घरघर लागली यात आपल्या बॉयफ्रेंडचा कोणताही संबंध नाही. असे आलियानं म्हटलं आहे. एका मुलाखतीमध्ये देखील तिनं याविषयी सांगितलं आहे. ती म्हणते, ती व्यक्ती आता माझ्या आयुष्याचा एक भाग झाली आहे.

माझ्या आयुष्यात जे काही चढ उतार आले त्यावर त्या व्यक्तींनं मला आधार दिला आहे. मी दोन वर्षांपूर्वीच नवाझुद्दीनच्या विरोधात घटस्फोटाचा अर्ज दिला होता. हे मला ट्रोल करणाऱ्यांना सांगायचे आहे.

माझ्या आयुष्यात वादळ सुरु आहे

मला काय सुखी- आनंदी राहण्याचा अधिकार नाही का असा प्रश्न आलियानं विचारला आहे. लोक काही विचार न करता बोलून जातात त्यांना मला विचारायचे आहे की, एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यात किती वादळं सुरु आहे याविषयी तुम्हाला काही माहिती असते का, तुम्ही कुणाच्या ऐकण्यावरुन त्यांना जज करता हे चूकीचे आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Shreyas Iyer Record: धावांचा पाऊस आणि विक्रमी विजय! श्रेयस अय्यरने मोडला धोनीचा रेकॉर्ड; बनला नंबर-1 टी-20 कर्णधार

VIDEO: मध्यरात्री 'नाईटी'वाल्या चोरांचा धुमाकूळ! वेल्डिंगने चक्क ATM मशीन फोडली, लाखोंची कॅश घेऊन रातोरात पसार; व्हिडिओ व्हायरल

Virat Kohli Test Retirement: अजित आगरकरांमुळे विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून घेतली निवृत्ती? वसीम जाफर यांच्या विधानाने क्रिकेटविश्वात चर्चेला उधाण

Viral Video: डिलिव्हरी ऑर्डर कोणाची, यावरून वाद अन् थेट हाणामारी! तरुणाला पळवून-पळवून चोपलं, व्हिडिओ व्हायरल

Riyadh Airport Missile Attack: मिसाइल कोसळताच उठला आगीचा मोठा लोळ, रियाद विमानतळावरील 'त्या' थरारक क्षणांचा हादरवणारा व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT