शनाया महाले Dainik Gomantka
मनोरंजन

अभिनय स्पर्धेत पटकावले राष्ट्रीय पारितोषिक

हरीयानाच्या के एल थिएटर प्रॉडक्शनने ही स्पर्धा आयोजित केली होती.

दैनिक गोमन्तक

शनायाने आणखीन एक राष्ट्रीय पातळीवरच्या अभिनय स्पर्धेत पारितोषिक मिळवले आहे. हरीयानाच्या के एल थिएटर प्रॉडक्शनने ही स्पर्धा आयोजित केली होती. नाटक, नृत्य, गायन आणि दृश्यकला अशा वेगवेगळ्या विभागात ही स्पर्धा झाली.

प्रत्येक विभागाच्या स्पर्धा चार फेऱ्यात घेण्यात आल्या. स्पर्धा ऑनलाइन असल्याने आपले सादरीकरण चित्रित करून ते युट्युबवर अपलोड करावयाचे होते. नाटक विभागात आलेल्या असंख्य प्रवेशिकामधून पहिल्या फेरीत 80 प्रवेशिका निवडून त्या आयोजकांच्या यूट्यूब चैनलवर अपलोड करण्यात आल्या. दुसऱ्या फेरीत यूट्यूबचे दर्शक आणि स्पर्धेचे परीक्षक यांच्या प्रत्येकी 50 टक्के गुणांवर आधारून दहा स्पर्धकांची निवड करण्यात आली. तिसऱ्या फेरीत स्पर्धकाने आपल्या नव्या सादरीकरणानीशी, नवा व्हिडिओ युट्युबवर अपलोड करणे आवश्यक होते. पुन्हा दर्शक आणि समीक्षक यांच्या गुणांवर आधारून तीन स्पर्धक निवडण्यात आले.

आणि चौथ्या फेरीच्या अंतीम निकाल जाहीर झाला त्यात शनायाला द्वितीय पारितोषिक मिळाले होते. शनायाने या स्पर्धेत ‘आधे अधुरे’ या नाटकांमधील चिन्नी आणि ‘अंधा युग’ या नाटकांमधील गांधारीची भूमिका सादर केली. या स्पर्धेत फिल्म-टेलिव्हिजनचे संचालक राजेश बब्बर, ख्यातनाम नाट्य दिग्दर्शक सुरेश शर्मा आणि हरियाणा कला परिषदेचे संचालक संजय भासिन यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Porvorim Accident: पर्वरीत भरधाव दुचाकीची पादचाऱ्याला धडक; उपचारादरम्यान मृत्यू

Boeing 737 MAX विमानांना सॉफ्टवेअरचा 'धोका'; लँडिंगवेळी मार्गदर्शन प्रणाली बंद होण्याची शक्यता

El Nino Rabi Crops: 'एल निनो'चा रब्बीला मोठा फटका? केंद्रीय कृषी सचिवांचा इशारा; कोरडवाहू भागांसमोर संकट

ODI World Cup 2027 Schedule: क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! 2027 वनडे वर्ल्ड कपचं शेड्यूल 1 ऑक्टोबरला होणार जाहीर

Goa SIR: 'अल्पसंख्याकांना लक्ष्य केलेले नाही'; SIR वादावर मुख्यमंत्री सावंतांचा दावा, विरोधकांचे आरोप तथ्यहीन

SCROLL FOR NEXT