Shakira India Tour Dainik Gomantak
मनोरंजन

Shakira India Tour: शकीरा इज बॅक! 19 वर्षांनंतर पॉप क्वीनचा भारत दौरा; मुंबई, दिल्लीसह बेंगळुरूमध्ये होणार लाईव्ह परफॉर्मन्स

Shakira India Tour 2026: जागतिक संगीत विश्वातील प्रसिद्ध पॉप गायिका शकीराच्या चाहत्यांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी समोर आली आहे.

Sameer Amunekar

जागतिक संगीत विश्वातील प्रसिद्ध पॉप गायिका शकीराच्या चाहत्यांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी समोर आली आहे. आपल्या तालावर संपूर्ण जगाला डोलवणाऱ्या शकीराचा भारत दौरा निश्चित झाला असून, तब्बल १९ वर्षांनंतर ती भारतीय प्रेक्षकांसमोर पुन्हा एकदा लाईव्ह सादरीकरण करणार आहे. आपल्या जादुई आवाजासोबतच जबरदस्त डान्स मूव्ह्ससाठी ओळखल्या जाणाऱ्या या पॉप आयकॉनची क्रेझ भारतात प्रचंड आहे.

१९ वर्षांनंतर भारतात

शकीराने यापूर्वी २००७ मध्ये भारताचा दौरा केला होता. त्यानंतर आता प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर ती पुन्हा एकदा भारतीय चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. शकीराचे 'वाका वाका', 'हिप्स डोन्ट लाय' आणि 'व्हेनएव्हर, व्हेरएव्हर' ही गाणी पिढ्यानपिढ्या गाजली आहेत.

आता तिचं आवाज थेट ऐकण्याची आणि पाहण्याची संधी भारतीयांना मिळणार आहे. 'फीडिंग इंडिया' आणि 'डिस्ट्रिक्ट बाय झोमॅटो' यांच्या माध्यमातून या दौऱ्याची घोषणा करण्यात आली असून, यामुळे सोशल मीडियावर आनंदाचे वातावरण आहे.

दौऱ्याचे वेळापत्रक

मिळालेल्या माहितीनुसार, शकीराच्या या भारत दौऱ्यात प्रमुख शहरांचा समावेश आहे. १० एप्रिल रोजी मुंबईतील महालक्ष्मी रेसकोर्स येथे तिचा पहिला मोठा कॉन्सर्ट रंगणार आहे. त्यानंतर १५ एप्रिल रोजी दिल्लीतील जवाहरलाल नेहरू स्टेडियममध्ये ती आपला जलवा दाखवेल.

याव्यतिरिक्त बेंगळुरूमध्येही एका भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. या तीन महत्त्वाच्या शहरांमध्ये शकीराचा लाईव्ह परफॉर्मन्स पाहण्यासाठी चाहते आतुर झाले आहेत.

तिकिटांसाठी चाहत्यांची धावपळ

शकीराच्या दौऱ्याची घोषणा होताच इन्स्टाग्राम आणि इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर प्रश्नांचा पाऊस पडू लागला आहे. 'डिस्ट्रिक्ट' ॲपने या दौऱ्याची पोस्ट शेअर करताच चाहत्यांनी तिकीट बुकिंग कधी सुरू होणार, याबाबत विचारणा सुरू केली आहे. अद्याप अधिकृतपणे तिकीट विक्रीची तारीख जाहीर झालेली नसली तरी, लवकरच बुकिंग सुरू होईल अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. कुपोषण आणि भूक यांसारख्या सामाजिक प्रश्नांवर काम करणाऱ्या 'फीडिंग इंडिया' या संस्थेशी हा दौरा जोडलेला असल्याने याला एक सामाजिक बाजूही लाभली आहे.

भारतीय चाहत्यांमध्ये कमालीची उत्सुकता

शकीराची एनर्जी आणि तिचे स्टेजवरील सादरीकरण जगभरात लोकप्रिय आहे. भारतीय चाहते तिच्या डान्सिंग स्टाईलचे मोठे चाहते आहेत. तब्बल दोन दशकांनंतर शकीरा भारतात येणार असल्याने मुंबई, दिल्ली आणि बेंगळुरूमधील हॉटेल्स आणि विमान प्रवासाचे दरही वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. एकूणच, एप्रिल महिना भारतीय संगीतप्रेमींसाठी 'शकीरा मेनिया' घेऊन येणार आहे, हे आता निश्चित झाले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT